Site icon Social Mirror

उन्हाळ्यात घ्यायची त्वचेची काळजी | How to take care of your skin in summer in marathi

आपली त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव असून आपल्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करण्याचे काम त्वचा करते. सध्या तापमान 40 डिग्री पेक्षा जास्त झाल्याने त्वचेला चांगलेच चटके बसत आहेत. उन्हाची दाहकता वाढल्याने त्वचेवर परिणाम झाल्याचे पाहावयास मिळत आहेत.
उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे शरीराचे तापमान वाढुन त्वचा रुक्ष होणे तसेच अतिनिल किरणांमुळे सूर्यप्रकाशात त्वचा काळवंडणे, लाल होणे अशा प्रकारांमुळे त्वचेचे आरोग्य धोक्यात येते
तसेच अतिघामामुळे बुरशीजन्य आजारांचे प्रमाणही वाढते. अशात त्वचेची योग्य ती काळजी न घेतल्यास त्याचा त्रास वाढू शकतो.
त्वचेची काळजी कशी घ्यावी:

1. जास्तीत जास्त फळांचा समावेश आपल्या दैनंदिन आहारात करावा .जसे की संत्री, मोसंबी , कलिंगड , द्राक्षे यात खनिजे मुबलक प्रमाणात असतात तसेच आंबा आणि पपई मध्ये अ हे जीवनसत्त्व भरपूर असल्यामुळे स्किन तजेलदार राहण्यास मदत होईल. पपई चा गर चेहऱ्यावर चोळून टॅन कमी करता येतो. कोकम सरबत, ताक आणि आवळा पन्हे यांचे सेवन करावे.

2 उन्हात जाणे टाळा
साधारणपणे सकाळी 11 ते 5 या दरम्यात सूर्यप्रकाश व अतिनिल किरणे प्रखर असल्यामुळे बाहेर जाताना सनस्क्रीन अत्यावश्यक आहे तेलकट त्वचेसाठी जेल बेस्ड व कोरड्या त्वचेसाठी क्रीम बेस्ड सनस्क्रीम वापरावीत. गॉगल, सनकोट टोपी व स्कार्फ अवश्य वापरावा.
3.उन्हातुन घरी आल्यावर लगेच चेहरा, हात व पाय थंड पाण्याने धुवावेत जेणेकरून शरीराची दाहकता कमी होते व त्वचा काळवंडत नाही. डोळ्यांची आग होत असेल तर ‘एलोवेरा’ चा गर लावावा.
4. कॉस्मेटिक चा अतिवापर टाळावा
स्किन लाईटनिंग क्रीम आपल्या डॉक्टर वा स्किन तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच निवडावीत व ब्लीच करणे टाळावे .त्वचा रुक्ष कोरडी व ताजेलदार राहण्यासाठी पाणी भरपुर प्यावे.

डॉ अपर्णा अमित पित्रे
होमिओपॅथ , आहारतज्ञ , स्किन हेअर स्पेशालिस्ट
डॉ अपर्णा क्लिनिक बाणेर पुणे.

Exit mobile version