sm logo new

1 lakh/Kg ची भाजी!

social mirror hop shoot
social mirror hop shoot

Share

Latest

आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा आपल्याला ताजा आणि स्वच्छ भाजीपाला स्वस्त दरात कसा मिळेल? हाच विचार करत असतो. कांद्याचे भाव ५० रु किलोंच्यावरती गेले, की आपल्या समोर हा कांदा खावा कि नाही? असा प्रश्न निर्माण होतो. परंतु जर एका (Kg) किलोसाठी १ लाख (lakh) रुपये मोजावे लागत असतील तर? आज आपण अश्या भाजीबद्दल जाणून घेणार आहोत जी विकत घेण्यासाठी कदाचित तुम्हाला बँकेत जाऊन लोन काढावे लागेल. होय, वाचण्यास नवल वाटेल परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या भाजीला प्रति किलो १ लाख रु. इतका भाव आहे. “Hop Shoot”( होप शूट) नावाने ओळखली जाणारी हि भाजी जगातील सर्वात महागडी भाजी म्हणून ओळखली जाते. याचा उपयोग मुखतः Beer बनवण्यास त्याच बरोबर औषध निर्मितीसाठी केला जातो.
Germany मध्ये लागवडी करताना सुरुवात झालेली हि भाजी आता थेट भारतात येऊन पोहचली आहे. बिहार मधील औरंगाबाद मध्ये AMRESH SINGH नावाच्या एका ३८ वर्षीय शेतकऱ्याने ह्या भाजीची लागवड आपल्या शेतात यशस्वी रित्या करून दाखवली आहे.

Hop shoot हे (perennial) वार्षिक म्हणजेच वर्ष्याच्या कोणत्याही मोसमात तुम्हाला घेता येणारे पीक आहे. परंतु याची लागवड प्रामुक्ख्यने वसंत ऋतू मध्ये केली जाते. उन्हाळा- या पिकासाठी अदिक पोषक ऋतू म्हणून ओळखला जातो. कारल्या प्रमाणे ह्या hop shoot च्या वेलाला आपापल्या दोरीचा आधार द्यावा लागतो. Hop shoot ची मूळ जमिनीत ४ ते ५ m पर्यंत खोल जातात. इतर पिकांच्या तुलनेत या पिकाची पाण्याची गरजही अधिक आहे. फुल हा वनस्पतीचा मुख्य भाग आहे ज्याची harvesting, लागवडी नंतर ६ महिन्यात केली जाते. प्रौढ फुलाला एक विशिष्ट प्रकारचा गंध येतो जो परिपक्वतेचे लक्षण समजले जाते.

Hop shoot चा वापर कश्यासाठी केला जातो?

१. Beer उत्पादनासाठी
Hop shoot ची फुले ज्यालाच “Hop Cones” म्हंटले जाते चवीला कडवट असतात. ज्यामुळे पूर्ण जगभरात याचा वापर Beer मध्ये कडवटपणा आणण्यासाठी केला जातो. या पासून बनवलेल्या beer ला Craft Beer असे संभोधले जाते.
२. औषध निर्मितीसाठी –
Hop shoot च्या नाजूक फांद्यांचा वापर प्रामुख्याने दाताची ठणक दूर करण्यापासुन ते TB च्या उपचारापर्यंत सर्वत्र केला जातो. यातील humulones आणि lupulones नावाची द्रवे मानवी शरीरातील कॅन्सर सेल्स विरुद्ध देखील वापरले जातात. यातील कडवटपणा antibacterial म्हणून काम करतो. म्हणजेच हानिकारक जंतूंची(microbes) वाढ यामुळे आपल्या शरीरात होत नाही.

Hop shoot ची किंमत लाखोंच्या घरात का आहे?

आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत या वनस्पतीला मोठी मागणी आहे. परंतु पुरवठा त्या तुलनेत कमी असल्याने किंमत लाखोंच्या घरात आहे. तसेच ते बिअर उद्योग आणि औषध निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.
Hop shoot ची फुल आकाराने खूप छोटी असतात आणि हि सर्व लहान फुल एक एक करून हाताने खुडावी लागतात ज्यामुळे काढणीसाठी अधिक मजुरांची गरज लागते आणि उत्पादन खर्चात वाढ होते. यासर्व अडथळ्यांमुळे Hop shoot बाजारात विकरीसाठी येई पर्यंत १ लाख रु प्रतिकिलो या भावतात विकले जाते.

बदलत्या तंत्रज्ञाना बरोबरच शेतकरी हळू-हळू आपल्या शेतात नावीन्य पूर्ण प्रयोग करताना दिसतो आहे. आजचा युवा शेतकरी Risk घेत hop Shoot सारखे अभिनव प्रयोग करत पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. जे प्रगतीच्या दिशेने उचलेले महत्वाचे पाऊल आहे. असेच नावीन्य पूर्ण प्रयोग व भरघोस उत्पादन देणारे पीक जर प्रत्येक शेतकरी घेत असेल तर शेतकऱ्याचे चांगले दिवस लवकरच आलेले आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील!
धन्यवाद!

FOR YOU