sm logo new

5G Internet Generation मध्ये प्रवेश करताना…

5g | Social Mirror
5g | Social Mirror

Share

Latest

Internet- सध्याच्या काळातला हा आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे! आपल्यापैकी बहुतांश लोकांचा दिवस हा मोबाईलचे इंटरनेट ऑन करून सुरू होत असतो. मानवाच्या ३ बेसिक गरजांमध्ये आता ४थी गरज म्हणजेच internet चा हि समावेश आहे असे म्हटले तर ते वावग ठरणार नाही. भारतात साधारण १९७० च्या दशकात 1G पासून सुरू झालेला हा Telecom तंत्रज्ञानाचा प्रवास आता 5G पर्यंत येऊन पोहचला आहे. भारतात 5G internet सेवा लवकरच सुरु होईल. याच पार्श्वभूमीवरती बाजारात अनेक कंपन्यांनी आपले 5G durable mobile phones launch केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मे २०२२ रोजी देशातील पहिले 5G टेस्टबेड लॉन्च केले. भारताचे संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी २० मे २०२२ रोजी भारतातील पहिला 5G कॉल वापरण्याचा अनुभव सर्व प्रथम घेतला.

Telecom तंत्रज्ञानाचा १९७० मध्ये 1G पासून सुरू झालेल्या या प्रवासाने अगदी 5G पर्यंत, प्रत्येक पिढीतील मनवाचा एकमेकांशी संवाद साधण्याचा मार्ग अधिक चांगल्या प्रकारे करण्याच प्रयत्न केला आहे.

1G ते 2G

1970 च्या दशकाच्या मध्यानंतर लाँच झालेली, 1G ही मोबाईल Telecom तंत्रज्ञानाची पहिली पिढी होती ज्यामध्ये आपण केवळ व्हॉइस कॉल करू शकत होतो. ज्यामध्ये आवाजाची गुणवत्ता व कव्हरेज कमी होते आणि कोणत्याही रोमिंग सपोर्ट शिवाय आले आहे.
या नंतर १९९१ साली Telecom तंत्रज्ञानाने 2G ची सुरुवात करून मोठी झेप घेतली.
व ग्राहकांना अधिक चांगले कव्हरेज त्यांचं बरोबर रोमिंग सपोर्ट सुविधा उपलबद्ध करून दिल्या होत्या.त्याच बरोबर SMS व MMS सारख्या लहान डेटा सेवा ही ग्राहकांना ऑफर केल्या होत्या.

3G मध्ये प्रवेश.

2001 मध्ये 3G सेवा सुरू करण्यात आली. मोबाईल इंटरनेटच्या प्रवेशासह चारपट जलद डेटा ट्रान्समिशनची सुविधा ग्राहकांना ३G मार्फत पुरवण्यात आली. याच काळात ब्लॅकबेरी फोनची लोकप्रियता वाढायला सुरुवात झाली. याच बरोबर मोबाईल फोनवर E-mails, navigational maps, video calling, web browsing सारख्या सुविधा ग्राहकांना पुरवल्या जाऊ लागल्या.

4G जग

2010 च्या आसपास उच्च गती, उच्च गुणवत्ता, उच्च क्षमतेची व्हॉइस आणि डेटा सेवा – ह्यासर्व सेवा 4G सोबत आल्या,स्टँडर्ड 4G सेवा ह्या 3G पेक्षा पाच ते सात पट अधिक वेगवान आहेत.

भविष्यातील 5G

मोबाईल तंत्रज्ञानाची नवीन दिशा म्हणून ओळखले जाणारे, 5G हे 4G नेटवर्कच्या 50 मिलीसेकंदांच्या तुलनेत केवळ एक मिलिसेकंदच्या विलंबतेने काम करते.

अधिक उच्च दर्जाची cellular bandwidth, blazing speed आणि low latency सोबत अनेक उपकरणांना एकमेकांशी नियंत्रित संवाद साधण्यासाठी व ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ला चालना देण्याचे 5G अधिक गतीने काम करेल.

त्याच बरोबर भविष्यातील 5G ​​जगामध्ये स्मार्ट सिटी इन्फ्रास्ट्रक्चर, सेल्फ-ड्रायव्हिंग कार आणि रोबोटिक शस्त्रक्रियेचा वास्तविक-वापर करणे शक्य होईल. 5G दक्षिण कोरिया, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडासह अनेक ठिकाणी वापरले जात आहे आणि लवकरच भारतात वापरले जाईल यात शंकाच नाही.

6G च्या दिशेने वाटचाल…

5G च्या तुलनेत 6G अजून किती वेगवान असेल हे अजूनतरी माहीत नाही, पण एक्सपर्टसच्या अंदाजानुसार ते 5G पेक्षा 100 पट वेगवान असेल.
स्वायम चलित कार, ड्रोनपासून स्मार्ट शहरांपर्यंत त्याच बरोबर आपल्या मेंदूचे संगणकासह एकत्रीकरण आणि मोठ्या प्रमाणात सुधारित टच कंट्रोल सिस्टम यासारखे sci-fi अनुप्रयोग देखील 6G सोबत येतील.

5G मधून उदयास येणारे 6G तंत्रज्ञान – आणखी Advanced असेल जे, “ computer आणि फोन्सला मानवी विचार आणि कृतीला कनेक्ट करण्यासाठी मानवी शरीरावर बसवलेल्या मायक्रो-डिव्हाइसचा वापर करून रीअल टाईममध्ये आणल्यास मदत करेल.

FOR YOU