अध्यात्माचं विज्ञान

Share


विषय नेहमीचाच असला तरी काही समज मनात नाही तर अगदी DNA पर्यंत रुजले आहेत असं वाटतं, आणि तशाच एका समजुतीवर आघात करणारा हा विचार. नेहमीची गफलत, विज्ञान शाखेतील एखादी व्यक्ती अध्यात्मामध्ये कार्यरत असलेली पाहिलं किंवा अध्यात्मातील एखादी व्यक्ती विज्ञान शाखेमध्ये उच्च पदवी घेत असताना पाहिलं कि साऱ्यांच्याच मनात सहज निर्माण होणारा प्रश्न म्हणजे, ‘हे असं कसं झालं (?)’; म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य असावं असा प्रश्न पडतो. हा प्रश्न पडण्याचं कारण एकतर अध्यात्माच्याबाबतीत आपण भरपूर समज गैरसमज मनात बाळगून ठेवले आहेत आणि दुसरे म्हणजे विज्ञानाची व्याख्या आपण फार संकुचित, तोकडी करून ठेवली आहे.
विज्ञान म्हंटलं कि फक्त तंत्रज्ञान आपल्या समोर येत, तंत्रज्ञान म्हणजे दृश्य विज्ञानाच्या साहाय्याने भौतिकमध्ये अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ज्यामुळे आपलं आयुष्य सुखकर होईल. मग त्यामध्ये उदाहरण घ्यायचं तर हातातील पंख्या पासून ते आत्ताच्या एअर कंडिशनर चा प्रवास आपण पाहू शकतो. आजूबाजूला प्रत्येक गोष्ट एका क्लिक वर असली पाहिजे असं आपल्याला वाटतं, पूर्वी रिमोट फक्त TV ला असायचा आता अगदी पंख, दिवे, दरवाजे सगळीकडे एका बटनावर आयुष्य हवं अशीच आपुली अपेक्षा आहे , नाही का (?). पण तंत्रज्ञानाचं हे तांडव सुरु असताना, आपण हे विसरूनच गेलो कि पंखा काय किंवा एअर कंडिशनर काय दोन्ही गोष्टी तेव्हाच सुख देऊ शकतात जेव्हा आपलं मन प्रसन्न असेल, मन प्रसन्न असेल तर ताटातील साधी चटणी भाकरी सुद्धा समाधान देते आणि मन चिंतेने ग्रस्त असेल तर समोरील पक्वान्न सुद्धा सुखी करू शकत नाहीत.

चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम् ।
अतोऽभिलाषो यदि ते सुखे स्यात् चित्तप्रसादे प्रथमं यतस्व ॥

आणि बारकाईने विचार केला तर लक्षात येईल कि, बाहेरची प्रत्येक सोय आणि सुविधा हि आपल्याला आतून बारा वाटावं याचसाठी असते. हि आतील जाणीव, आतील यंत्रणा ज्याच्या मार्फत आपण बाहेरील जगातील सुख दुःख समजून घेतो त्या यंत्रणेला अंतःकरण असं म्हणतात. याच अंतःकरणाची चार कामे म्हणजे निवड करणे, चिंतन करणे, निर्णय घेणे आणि हे ‘मी’ करतो आहे याची जाणीव म्हणजे अनुक्रमे मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार.यालाच अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. आपल्या भारतीय संस्कृतीने , ऋषीमुनींनी आणि संतांनी यावर जास्तीत जास्त संशोधन करून सुखाचा समाधानाचा मार्ग हा मुळापासून उपलब्ध करून दिला आहे. ज्या प्रमाणे आयुर्वेदिक औषध हे symptoms वर नाही तर Root Cause वर काम करतं अगदी त्याप्रमाणे संतांचं हे विज्ञान आपल्याला आपल्यातील आनंद बीजापर्यंत, रूट पर्यंत नेतात. सांगा ना यापेक्षा microlevel चं विज्ञान अजून काय असू शकतं. विज्ञानाचा एक अर्थ ‘विशेष ज्ञान’ आहे हे हि विसरून चालणार नाही म्हणूनच गीतेतील सातव्या अध्यायाचे नाव ‘ज्ञान-विज्ञान योग’ असे आहे.
त्यामुळे अध्यात्म आणि विज्ञान याचा संबंध शोधणं म्हणजे चुकीच्या मार्गाने जाणं होईल म्हणून अध्यात्म आणि विज्ञान यांचा संबंध शोधण्यापेक्षा, “अध्यात्माचं विज्ञान” समजून घेणं केव्हाही योग्य. म्हणून व्यक्तीची वृत्ती जितकी वैज्ञानिक, चिकित्सक आणि जिज्ञासू होत जाते तितकीच ती व्यक्ती आंतरिक दृष्टीने “स्व” पर्यंतचा प्रवास पूर्ण करत असते. म्हणूनच कदाचित विज्ञानाच्या जगातील प्रख्यात संशोधक आइनस्टाइन सुद्धा बोलले असतील कि ” The more I study Science, the More I believe in GOD” आणि ते पुढे जाऊन te म्हणतात कि “जेव्हा मी ‘गीता’ वाचतो आणि देवाने हि सृष्टी कशी निर्माण केली असेल याचा विचार करतो तेव्हा मला जगातील प्रत्येक गोष्ट गौण वाटू लागते”

Mob no. 7397881111