sm logo new

भारतीय सैन्य दलासाठी “अग्निपथ” | AGNIPATH

social mirror agnipath
social mirror agnipath

Share

Latest

“Wars Are Fought With Weapons But Won By Men” ‘युद्ध ही शस्त्रांनी लढली जातात पण ती वीर पुरुषांनी जिंकली जातात.’ ऐन तारुण्याच्या वयात आल्यानंतर देशातील अनेक तरुणांची भारतीय सैन्य दलात भरती होण्याची इच्छा असते. हे स्वप्न अनेक युवक पाहतात. परंतु खूप कमी जणांचे स्वप्न पूर्ण होते. Covid-19 मुळे मागील दोन वर्षांपासून सैन्यदलात कोणत्याच पदासाठी भरती झालेली नाही. याच पार्श्वभूमीवरती भारत सरकारने “अग्निपथ” (AGNIPATH) योजनेची घोषणा केली आहे.
‘अग्निपथ’ योजना अनेक युवकांना आपले भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करणार आहे. या योजने अंतर्गत १७.५ ते २१ वयोगटातील उमेदवार भरतीसाठी पात्र असतील. १०वी व १२वी पास विद्यार्थी या भरतीत सामील होऊ शकतात. भारत सरकारने केलेल्या घोषणे नुसार परीक्षेद्वारे व ट्रेनिंग नंतर दर वर्षी ४६ हजार अग्निवीर भरती केले जातील. ह्यामध्ये मुलींनाही संधी दिली गेलेली आहे. भारतीय सैन्यदलातील ARMY, NAVY आणि AIRFORCE ह्या तिन्ही WINGS साठी भरती असेल.
AGNIPATH योजने अंतर्गत भरती झालेल्या CANDIDATES चा कार्यकाळ हा ४ वर्षाचा असणार आहे. म्हणजेच भारतीय सैन्यदलात ते ४ वर्षासाठी काम करतील व त्यानंतर १० आठवडे ते ६ महिन्यांचे विशेष प्रशिक्षणाद्वारे केवळ २५% उमेदवारांना पुढील १५ वर्षे सैन्यदलात राष्ट्रसेवा करण्याची संधी दिली जाईल आणि इतरांना “SEVA NIDHI” ने सन्मानित करून सेवा निवृत्त केले जाईल.

चार वर्ष सर्व्हिसचा काय फायदा होईल?

भारत सरकारच्या मते ह्या योजनेने भारतात शिस्तप्रिय आणि राष्ट्रप्रेम असणारी नवीन पिढी निर्माण होण्यास हातभार लागेल.त्याच बरोबर कामाचा अनुभवही मिळेल. याशिवाय या स्किममुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील व सैनिकांना नवीन तांत्रिक कौशल्येही आत्मसात करता येतील. आणि Maturityची भावना बिंबवली जाईल. ह्या व्यक्तिरिक्त करियर मध्ये एक तगडा CV तयार होण्यास मदत होईल.

वेतन श्रेणी

ह्या चार वर्षात ३०,००० ते ४०,००० हजार पर्यंत पगार दिला जाईल व ३०% रक्कमही Agniveer समूह निधी मध्ये जमा केली जाईल. चार वर्षानंतर सेवा निधी स्वरूपात रिटायर्ड अग्निवीर ला ११ लाख ७१ हजार रुपये दिले जातील जे पूर्णतः tax free असतील. त्याच बरोबर ४८ लाख पर्यंत life insurance cover ही दिला जाईल. युद्धा दरम्यान शहीद जवानांच्या परिवारास एकूण १ कोटी पर्यंत compensation दिले जाईल. चार वर्षाच्या सेवेनंतर कोणत्याही प्रकारची पेन्शन दिली जाणार नाही.
वयाच्या २६-२७व्या वर्षी रिटायर झाल्यानंतर अग्निविरांना राज्य पोलीस दलात काम करण्याची संधीही प्रदान केली जाऊ शकते. अधिक माहितीसाठी तुम्ही WWW.joinindianarmy.nic.in या website ला भेट देऊ शकता.
भारतीय संरक्षण सेनेत सेवा करणे हे सन्मान, निष्ठा आणि ओळखीचे प्रतीक आहे. असे म्हणतात- एक चांगला व अनुभवी सैनिक होण्यासाठी सुमारे 7 ते 8 वर्षे लागतात. त्यामुळे ही योजना जाहीर केल्यानंतर प्रश्न पडतो की भारतातील तरुण या अग्निपथसाठी तयार आहेत का?

FOR YOU