दिवस रात्र, वेगवेगळे ऋतू ह्यात निसर्गचक्र बदलत जात असते. पंचमहाभुतांनी बनलेल्या निसर्गात ज्या गोष्टी आहेत, त्याच आपल्या शरीरात आहेत . ऋतुबदलाचा हाच नियम मानवी शरीरात देखील दिसून येतो, त्यामुळे स्त्रियांमध्ये दर महिन्याला नियमित येणाऱ्या चक्राला ऋतुचक्र असे देखील म्हणतात.
मासिक धर्म अर्थात पाळी ह्यात वापरण्यात येणारी विविध साधने आज बाजारात उपलब्ध आहेत. पाळीत घ्यायची काळजी विशेषतः स्वच्छता, त्याबद्दलचे समज गैरसमज, ह्याबद्दल असणारी मानसिकता पूर्वीपेक्षा बरीच बदलली आहे. वापरायला सोपे, विल्हेवाट लावायला सोपे असे पर्याय महिला निवडू लागल्या आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा धुवून वापरले जाणारे घरगुती कापड ते एकदा वापरून फेकून देता येणारे Sanitary Pads, त्याहून पुढे जावून Tampon आणि Menstrual cup पर्यंत अनेक जणींनी मजल मारली. हे सगळे असले तरी अजूनही 90% मुली आणि महिला ह्या sanitary pads च वापरतात. ह्याला बरीच कारणे आहेत, एक म्हणजे ते वापरायला सोपे, कमी त्रासदायक, विल्हेवाट लावायला सोपे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वस्त आणि खूप सहज उपलबद्ध आहेत. जाहिरातीत दाखवले जाणारे विविध ब्रँडचे pad आपल्याला सहज मिळतात आणि एकदा वापरून झाले की आपले काम संपते. पण अनेक स्त्रियांना ह्या काळात मांड्यांना rash येणे, खाज येणे, घर्षणाने सूज येणे तसेच पाळी नंतर इन्फेक्शन होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. आपण Pad विकत घेतो तेव्हा तो कशा पासून बनला आहे? त्यात कुठले केमिकल आहेत का? हे आपण पाहण्याच्या फंदात पडत नाही. मेडिकल मध्ये जावून कूठल्याशा पिशवीत किंवा पेपर मध्ये लपवून तो आणायचा आणि वापरून झाले की तसाच लपवून फेकून द्यायचा. तो फेकल्यानंतर त्याचे काय होते हा विचारही आपण करत नाही.

तर बाजारात मिळणारे म्हणण्यापेक्षा जाहिरातीत दिसणारे, परदेशी बनावटीचे Pad हे कॉटन पासून नाही तर Rayon ( Semi Synthetic Fibre)पासून बनलेले असतात. ज्यामुळे त्यांची स्त्राव शोषून घेण्याची क्षमता वाढते. आणि हे pads शुभ्र दिसावे म्हणून शेवटच्या टप्प्यात Bleach केले जातात. ह्याप्रकियेत Dioxin नावाचे by product रलिज होते. Dioxin मध्ये अनेक प्रकारचे इतरही हानीकारक केमिकल असतात जे आपल्या प्रतिकारशक्ती प्रणाली मध्ये बिघाड करून कॅन्सर म्हणून आपले काम करतात. साध्या भाषेत सांगायचे तर अशाप्रकरच्या प्लास्टिक सदृश्य Rayon Pads मूळे आपण कॅन्सर सारख्या आजाराला नकळतपणे आमंत्रण देत आहोत आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हे Pad अनेक वर्ष कुजत नाहीत, त्यांचे विघटन होत नाही. तज्ञांच्या मते अनेक वर्ष म्हणजे जवळपास ५००-८०० वर्षे. एका घरातून एका महिलेचे एका महिन्याला येणारे Pad ह्यांची मोजणी केली तर प्रचंड मोठ्या लोकसंख्येचा विघटन न होणाऱ्या कचऱ्याच्या रुपात पर्यावरणाला किती मोठा धोका आहे. स्त्रियांमध्ये गर्भ पिशवीचे कॅन्सर होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. आरोग्याचे आणि पर्यावरणाचे नुकसान करणारे प्लास्टिकसारखे Pads वेळीच कालबाह्य करायला हवेत. पण मग करणार कोण आणि कसे?
आज नवनवीन संशोधनातून Eco friendly, नैसर्गिक वस्तू जसे Cotton, Alovera, Sago powder, Anion strips असलेले Pads देखील तयार होत आहेत. कॉटन असल्याने ज्यांचे पूर्णपणे विघटन होते आणि Anion strips असल्याने आरोग्याला देखील धोका राहत नाही.
आता Anion Strips म्हणजे काय?
शाळेत असताना रसायनशास्त्र मध्ये आपण Anion आणि Cation हे शब्द ऐकले आहेत. Anion म्हणजे ऋणभार असलेले ज्यात इलेक्ट्रॉनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा जास्त होतो. ह्याच anion चा उपयोग जेंव्हा sanitary pad मध्ये केला जातो तेंव्हा योनिमार्गाला ऑक्सिजनचा पुरवठा जास्त झाल्याने Bacterial Infection होत नाही.
मुळात योनीमार्ग आणि जननेंद्रिय हे प्रकाश आणि हवा यांपासून वंचित असतात. त्यात पाळीत होणाऱ्या स्त्रावाच्या ओलेपणामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी Anion strips चे Sanitary pad खूप फायदेशीर ठरतात. Negative ion strips चा दुसरा फायदा म्हणजे, दुर्गंधी कमी होते, प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत होते आणि पाळीच्या कठीण काळात देखील आपण फ्रेश राहू शकता.
हल्ली मिळणारे जवळपास सगळेच Anion Strips Pad हे जैविक आणि विघटन होणाऱ्या पदार्थापासून बनवले जातात. ज्यामुळे पर्यावरणाचा तोल सांभाळणे देखील सोपे होते. आरोग्य आणि पर्यावरण उपयोगी असे Anion Strip युक्त पॅड हे सध्याच्या काळात गरचेचे आहे.
सॅनिटरी पॅड पाळीत वापरायचे एकमेव साधन जरी नसले तरी देखील सर्व पर्यायांपेक्षा जास्त वापरले जाणारे साधन आहे त्यामुळे त्याची निवड देखील काळजीपूर्वकच व्हायला हवी, नाही का???