भारतातील जंगल 2 : कान्हा टायगर रिझर्व्ह, मध्यप्रदेश

Share


मध्यप्रदेश मध्ये वसलेले भारतातील सर्वोत्तम जंगल म्हणजे कान्हा नॅशनल पार्क होय. विविध वनस्पतींनी नटलेले, 40 पेक्षा जास्त प्रकारचे प्राणी आणि 200 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी असलेल्या या जंगलात जाण्याचे मी ठरवले. माझा मित्र सत्येन मुंदडा आणि सचिन सुराणा यांच्या बरोबर या जंगलाच्या भटकंतीला गेलो.


सुमारे 950 स्क्वे किमी वर वसलेले हे जंगल मंडला आणि बालाघाट या दोन जिल्ह्यांमध्ये वसलेले आहे. 1955 मध्ये याची स्थापना झाली आणि 1973 टायगर रिझर्व्ह पार्क म्हणून नावारूपास आले. या मोठ्या जंगलाची सफर करण्यासाठी मी 2017 मधील जूनच्या पहिल्या आठवड्यात गेलो. जंगलाची सफारी करायची म्हटले कि मी कधीच ऍडव्हान्स बुकींग केली नाही. त्यामुळे सकाळची बुकींग करायची म्हटले कि मला पहाटे तीनलाच बुकींग खिडकीवर थांबायला लागले. मला पहाटे सहाची सफारी मिळाली. दोघे मित्र दमल्यामुळे ते जंगल जीप सफारीला आलेच नाही पण माझ्याबरोबर इतर तीन टुरिस्ट होते त्यामुळे मला जीप बुकींग अमाऊंट शेअर करणे सोपे झाले. रात्रीची झोप व्यवस्थित झाली नसल्याने मरगळलो होतो पण पहाटेच्या सूर्याच्या कोवळ्या किरणांनी आणि ऑक्सिजन युक्त हवेने शरीरात ऊर्जा आणि उत्साह संचारला गेला.
जंगलामध्ये जस जसे आतमध्ये जाल तसे वनस्पतींच्या पक्षांच्या विविध जाती पाहायला मिळतात. जंगलाचे सौंदर्य इथेच बघायला मिळते. बारशींगा, अस्वल, रानटी कुत्रे, रानटी डुक्कर, सांबर, वर्कींग डिअर, मोर, वानरे जंगलात दिसली. वाघ आजूबाजूला असल्यावर हे सर्व विशिष्ट आवाज करून त्यांच्या सर्व मित्रांना तसेच आपल्याला अलर्ट करतात. मला या जंगलात वाघ बघायला मिळाला नाही परंतु असंख्य वनस्पती, प्राणी आणि पक्षी बघायला मिळाले.


ग्रीन पिजन, ड्रॉगौ, ओरिओल, स्पॉटेड ईगल, नाईट जार सारखे अनेक पक्षी दिसले. स्कॅवेन्जर म्हणून समजले जाणारे किमान 100 गिधाड सुद्धा दिसली. वाघाने केलेली हरिणाच्या शिकारीवर या बहाद्दरांनी ताव मारला हे दृश्य भारीच होते. एकंदरीत कान्हाची सफर भारीच होती.


नागरपूर पासून रोड मार्गे फक्त सहा तास लागतात. ग्रुपने गेल्यास तीन चार सफारी, निवासव्यवस्था, फूड आणि प्रवास खर्च मिळून वीस ते पंचवीस हजार रुपयाला ट्रीप पडते. चार ते पाच दिवसात कान्हा आणि त्याच्या अवतीभोवतीचा प्रदेश पाहता येतो. कोरोना गेल्यांनतर नक्की या जंगलाला भेट द्या.