बोरीस जॉन्सन यांचा थोडक्यात परिचय :
‘बोरीस जॉन्सन’ हे नाव जरी ब्रिटिश राजकारणाशी संबंध नसला तरी जवळपास प्रत्येक भारतीयाने ऐकलेले आहे. याचे कारण असे की त्यांनी स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे. १९९० च्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यानंतर इंग्लंड चे महापौर बनल्यावर चर्चेत आले होते. दोन वेळा या पदावर बसल्यानंतर युनायटेड किंग्डम च्या कॅबिनेट मध्ये आणि यानंतर २०१९ मध्ये युनायटेड किंग्डम च्या पंतप्रधानपदी त्यांची वर्णी लागली होती.
बोरीस जॉन्सन यांना पंतप्रधानपद मिळण्याचे कारणही ‘ ब्रेक्झीट ‘ ठरले. युरोपियन महासंघातून युनायटेड किंग्डम ने बाहेर पडावे की नाही (ब्रेक्झीट) यासाठी ब्रिटिश लोकांचा जून २०१६ मध्ये कौल घेतल्यानंतर बाहेर पडण्याचे जनमत आले. यांनतर तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा दिला आणि यांनतर पंतप्रधानपदी निवड होऊन थेरेसा मे ब्रिटिश राजकारणात केवळ दुसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या. थोड्या थोडक्या महिन्यांनी ब्रेक्झीट संसदेत मांडता न आल्याने थेरेसा मे यांनीदेखील पायउतार होत अगदी अटीतटीच्या क्षणी बोरीस यांची निवड २०१९ मध्ये पंतप्रधानपदी झाली.
महापौर असताना ‘बोरीस बाईक’, ऑलिम्पिक चे अध्यक्षपद, गार्डन ब्रिज आणि आयलंड एअरपोर्ट सारख्या जगप्रसिद्ध इत्यंभूत पायाभूत प्रकल्प उभे करण्यामागे हात होता.
भारतासोबत बोरीस जॉन्सन यांचा काय संबंध आहे?
बोरीस जॉन्सन हे भारत धार्जिणे नेते आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक भारतीय वंशाच्या नेत्यांना त्यांनी पुढे आणले. त्यांची विभक्त झालेली पत्नी मरिना व्हीलर, जिच्याशी त्यांनी १९९३ मध्ये लग्न केले, ती भारतीय वंशाची आहे. मरिना ह्या भारतीय लेखक आणि संपादक खुशवंत सिंग यांची मुलगी आहे. ते स्वतःला भारताचा जावई संबोधतात.
बोरीस जॉन्सन हे पायउतार होण्याचा भारतावर काय परिणाम होईल?
बोरीस जॉन्सन हे भारताच्या दृष्टीने अत्यंत लाडके ब्रिटिश पंतप्रधान ठरले. त्यांनी भारतासोबत संबंध घनिष्ठ बनविले आहेत.
ते स्वतःला भारतीय पंतप्रधानांचा ‘खास दोस्त’ म्हणत. भारतासोबत व्यापारी संबंध वाढविणे, मुक्त व्यापार करार करण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. यामुळे, पुढील पंतप्रधान भारतासोबत कसे संबंध ठेवतील यावर भारत आणि युनायटेड किंग्डम यांचे संबंध अवलंबून असतील.
पुढील पंतप्रधान दावेदार भारतीय?
ब्रिटन मधील भारतीय वंशाचे ऋषी सूनक हे पंतप्रधान बनण्याच्या स्पर्धेत पुढे आहेत. ऋषी सुनक हे भारतीय उद्योजक आणि इन्फोसिस चे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.