sm logo new

UPI पेमेंट मध्ये क्रेडिट कार्डची क्रांती !!

social mirror UPI
social mirror UPI

Share

Latest

भारतातील सामान्य जनता सध्या Cashless Transaction कडे वळत आहे. Paytm, phonepe, google pay सारखे apps cashless transactions ला प्रोत्साहन देत आहेत. UPI व्यवहार सुलभ करण्यासाठी ग्राहक त्यांची बचत खाती, चालू खाती आणि डेबिट कार्ड चा वापर करतात. ह्यात CREDIT CARD सुविधा आता पर्यंत उपलब्ध नव्हती. परंतु RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतीच घोषणा केली की, आतापासून UPI ​​चे वापरकर्ते त्यांचे क्रेडिट कार्ड सुद्धा Google Pay, Paytm आणि PhonePe सारख्या लोकप्रिय ऍप्लिकेशन्सशी लिंक करू शकतात.

मे 2022 मध्ये UPI ने 10.40 लाख कोटी रुपयांचे 594.63 कोटी व्यवहार करून एक BENCHMARK सेट केला. ही गती अशीच पुढे सुरू ठेवण्यासाठी, RBI ने UPI मध्ये क्रेडिटकार्ड पर्याय समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

UPI द्वारे Transaction कसे करता येईल?

UPI अॅप्समध्ये क्रेडिट किंवा डेबिट कार्ड जोडून, ​​तुम्ही पेमेंट मशीनवर कार्ड स्वाईप न करता पेमेंट करू शकाल. फक्त QR कोड स्कॅन केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी पेमेंट पद्धत म्हणून जोडलेले क्रेडिट/डेबिट कार्ड निवडून तुम्ही पेमेंट करू शकाल. तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून UPI ​अॅपद्वारे पेमेंट सुरू केल्यानंतर, पेमेंट पूर्ण करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर एक पासवर्ड (OTP) येईल व तो टाकून तुम्ही पेमेंट पूर्ण करू शकाल. परंतु सध्या UPI व्यवहारांसाठी क्रेडिट कार्ड वापरण्याची सुविधा केवळ RuPay क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी मर्यादित असेल, Visa किंवा MasterCard सारख्या इतर क्रेडिट कार्ड असलेल्या व्यक्तींना या नवीन सुविधेचा वापर करण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

भारतात RuPay सुविधा कोणत्या बँका पुरवतात?
Union Bank of India
Bank of Baroda
IDBI BANK
FEDERAL BANK
Saraswat Bank
HDFC BANK
Union Bank, त्याच बरोबर इतर सहकारी बँकांचा ह्या यादी मध्ये समावेश आहे.

UPI मध्ये क्रेडिट कार्डचा व्यापाऱ्यांना कसा फायदा होईल?

UPI आणि क्रेडिट कार्डची जोडणी लहान व्यापाऱ्यांसाठीही खूप फायदेशीर ठरेल कारण आता QR कोडचा वापरून पैसे भरता येईल त्यामुळे महागड्या पेमेंट(POS) मशीनची गरज भासणार नाही.

क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी ग्राहकांनाकडून किती कर आकारला जाईल?

केंद्रीय बँकेने UPI पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड वापरत असताना अद्याप कोणतेही शुल्क जाहीर केलेले नाही.UPI द्वारे पेमेंटसाठी मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) शून्या करण्यात आला आहे.
डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे प्रत्येक व्यवहारासाठी, व्यापाऱ्याला व्यवहारातील काही ठराविक रक्कम भरावी लागते जी नंतर बँका आणि पेमेंट सेवा पुरवणाऱ्या कंपनी मध्ये विभागली जाते. याला MDR म्हणतात. सध्या, क्रेडिट कार्ड दोन ते तीन टक्केच्या दरम्यान सर्वाधिक MDR आकारात आहे. त्यामुळे अशा प्रकारचा MDR दर असताना MASTERCARD किंवा VISA सारख्या जागतिक पेमेंट सर्विस पुरवणाऱ्या कंपन्या भारतात या नगण्य MDR वर कसे टिकतील हे पाहणे महत्वात्वाचे असेल.

FOR YOU