देश 13 : फुकेत

Share


फुकेत हे एक असे बेट आहे जिथे सूर्योदय आणि सूर्यास्त कधी झाला ते समजतच नाही. नाईट लाईफ आणि शांत सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे येथे दिवसरात्र लोकांचा वावर असतो. दिवसभर शहरालगत असणाऱ्या सुंदर ठिकाणांना भेट द्यायची किंवा आजूबाजूच्या छोट्या आयलंडवर भटकंती करायची आणि रात्री नाईट लाईफ एन्जॉय करायचे हे येथे येणाऱ्या पर्यटकांचे स्वप्न असते.


फुकेतचे सौंदर्याची भुरळ मला तीन वेळा येथे घेऊन गेली. अभिजीत, सुदीप, योगेश, आशिष, आशुतोष आणि बालाजी अशा विविध मित्रांबरोबर मी येथे गेलो. फुकेत हे थायलंडमधील मोठे आयलंड आहे. फुकेत ही पूर्वी थायलंड प्रोव्हींसची राजधानी होती. निळे पाणी, पांढरे शुभ्र वाळूमय बीचेस, स्पाईसी थाई पदार्थ आणि स्नॉर्कलिंग साठी उत्तम समुद्र असल्यामुळे पर्यटकांचा लोंढा फुकेत ला येत असतो. पेंटॉन्ग बिच, बर्ड पार्क, टायगर वर्ल्ड, शूटिंग रेंज, बुद्धाचा पुतळा, फुकेत शहर सफर, फंटासी, हनुमान वर्ल्ड आणि फुकेत वर्ल्ड टाऊन, व्हॉट फारा थोंग, सर्फिंग, जंगल पार्क, डॉल्फिन शो ही पर्यटन स्थळे बघण्यासारखी आहेत. मला तिन्ही वेळेला फुकेत हे वेगळे भासले.


येथील पेंटॉन्ग बीच आणि काही मिनिटाच्या अंतरावर असणारे फीफी आयलंड, जेम्स बॉण्ड आयलंड आणि रे बीच यांची दोन दिवसाची सफर मस्तच आहे. फुकेत टाऊनमधून बोटीच्या साह्याने येथे जाता येते. पहिल्या टूर मध्ये मला येथील बीचेस आणि जंगलातील साहसी क्रीडा प्रकार आवडले तर दुसऱ्या मध्ये किस द वर्ल्डस डेडलिस्ट स्नेक हा शो आणि थर्ड मध्ये प्लेयिंग विथ टायगर खूप आवडले.
फीफी आणि जेम्स बॉण्ड आयलंड खूप मस्त आहेत. येथे जेम्स बॉण्डचा चित्रपट आणि कहो ना प्यार है चे शुटींग सुद्धा झालेले आहे. भारतीयांची येथे चांगलीच गर्दी असते. या आयलंडवर जाऊन स्थानिक फूडचा आस्वाद नक्कीच घ्या कारण थाई फिश फूडचा स्वाद वेगळाच आहे.


फुकेत ची थाई किक बॉक्सिंग आणि सिमरन शो आवर्जून बघावा. फुकेतचे नाईट लाईफ सुद्धा छान आहे. फुकेतचा समुद्र किनारा इतका आवडला कि वाटले काश! यहा अपना घर होता. येथील अंडाटेल हे थ्री स्टार हॉटेल हे घरच्या सारखा फील देते. कमी टेरीफ असल्याने बहुतांशी युवक युवतीं याला पसंती देतात.
फुकेत पासून क्राबी आणि को सा मुई आयलंडची दोन दिवसाची टूर करता येते.
2017 पूर्वी फुकेत ला ट्रॅव्हल करताना बँकॉक वरून कनेक्टीन्ग फ्लाईट ने जायला लागत असे पण मागील तीन वर्षांपासून मुंबईवरून थेट फ्लाईट झाल्याने वेळ आणि पैशात बचत झाली आहे. फुकेतची टूर ही चार ते सात दिवस असावी. ही टूर 45 ते 75000 रुपया मध्ये होते. फिश आणि थाई फूड हे रुचकर तर आहेच पण तितके महाग नसल्याने फूड कॉस्ट चांगलीच कमी राहते. फुकेतचे सौंदर्य मनात कायमस्वरूपी जतन होते त्यामुळे या सुंदर बेटाची सफर नक्की करा.