देश 14: व्हिएतनाम

Share


इतिहास विषयात व्हिएतनाम युद्ध हा धडा आवड म्हणून वाचलेला चांगलाच लक्षात राहिला होता. या देशाला स्वप्नातही मी भेट देईल असे वाटले नव्हते. एकेकाळी गरीब असूनही मागील सात वर्षात व्हिएतनाम ने पर्यटन क्षेत्रात घेतलेली गरुडझेप ऐकल्याने भेट देण्याचे ठरवले. एक हटके देशाची सफर करण्याचे निश्चित केल्यावर राहुल वाणी या मित्राबरोबर व्हिएतनाम ची योजना आखली.
व्हिएतनामचा आठ दिवसाचा व्हिसा काढला आणि हनोई या शहरात आम्ही उतरलो. आम्हाला हनोई आणि कंबोडिया करायचे असल्याने आम्ही फक्त मुंबई हनोई आणि हनोई मुंबई हे परतीचे तिकीट काढून ठेवले. यामधील टूरसाठी सात दिवसाचा गॅप ठेवला. तीन दिवसासाठी हनोई येथील हॉटेलचे चे बुकींग केले होते. त्यामुळे दोन दिवस हनोई येथील पर्यटन स्थळे फिरण्याचे दोघांनी ठरविले .


पहिल्या दिवशी हनोई शहराची सफर केली. हनोई ही व्हिएतनाम देशाची राजधानी असून जगातील प्राचीन राजधानी असे तिला समजले जाते. फ्रेंच वसाहतीमधील वन पिलर पॅगोडा, परफ्युम पॅगोडा, हनोई ऑपेरा हाऊस, इंपिरियल सिटा डेल ही सुंदर ठिकाणे पाहून घेतली. हो ची मीन म्यूझीयम, मेकाँग डेल्टा मधून छोट्या बोटीतील सफर, क्रोकोडाईल पार्क, स्नेक आणि मधुमक्षिका पार्क तसेच युद्ध काळात व्हीएयतनामींनी बनवलेले कुची हे छोटे टनेल ही पर्यटन स्थळे भलतीच भारी होती.
दोन दिवसानंतर कळले कि कंबोडियाला आणि अंकोर वाट जायचे किमान चार दिवस लागतील. तात्काळ प्लॅनच बदलला आणि तीन दिवसात काय शक्य आहे तर होची मिन आणि हालॉंग बे मग तात्काळ तशी विमान तिकीट आणि टूरची व्यवस्था केली. अचानक तिकीटे काढायला लागल्याने थोडीशी महागडी पडली पण ठरवले ना मग मागे हटायचे नाही.
होचिमिन ला विमानाने आम्ही दोघे दीड तासात पोहचलो. सकाळी लवकर पोहचल्याने शहर फिरून घेतले. ऐतिहासिक होचिमिन स्वेअर याला ऐतिहासिक पार्श्ववभूमी असल्याने येथे पर्यटकांची झुंबडच असते.


होचिमिन पासून 5 तासावर ‘हॅलॉन्ग बे’ हे हजारो बेटांचा समूह असलेला सुंदर असा प्रदेश आहे. येथे हँलोन्ग बे च्या एका टोकावर जायचे आणि बोटीने त्या अथांग पसरलेल्या अनेक आकारांच्या बेटांचे सौंदर्य पाहत छोट्या क्रूझ द्वारे पन्नास साठ किमी दूर आतमध्ये पोहचलो. आमची छोटी क्रूझ एका ठिकाणी थांबवली गेली आणि दुसऱ्या छोट्या बोटीने जवळ असलेल्या चुनखडकाच्या गुहा, कायाकिंग आणि एका छोट्या बेटाची सफर घडवली. रात्रीची क्रूझ वरील व्हिएत्नामी फिश फुड आणि स्थानिक नृत्याच्या कलावर आमचीही पावले थिरकली जिसकी गुंज आजही कानो में गुंजती है. हालॉंग बे वरून होचिमिन द्वारे पुन्हा हनोईला आलो आणि एक दिवस हनोई ला शॉपिंग करून भारतात परतलो.


व्हिएतनाम ला जायचे असेल तर सात ते पंधरा दिवस टूर असावी असे मला वाटते. विमान प्रवास, हॉटेल, फूड आणि स्थानिक भटकंतीचा एकूण खर्च किमान 80000 ते 125000 येतो. ऑक्टोबर ते डिसेंबर यावेळी जाणे उचित राहील. मुंबई बंगलोर चेन्नई वरून व्हिएतनामला जाऊ शकता. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या सुंदर देशाला नक्की भेट द्या.