


मलेशिया साऊथ ईस्ट आशिया खंडातील निसर्गसंपतीने नटलेला देश असून या देशातील गरुड पक्षांचे आयलंड म्हणून ओळखले जाणाऱ्या लंकावीला जायचे ठरवले. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, विषववृत्तीय हवामान, रेनफॉरेस्ट आणि लक्ष ग्रीन बीचेसनी मला या ठिकाणी जाण्यास प्रोत्साहित केले. मित्र सुदीप बर्वे, योगेश आणि अभिजीत यांच्या बरोबर या सुंदर शहराची ट्रीप केली.
मलेशिया चा ट्वीन टॉवर आणि शहराची सफरला दोन दिवस खूप होतात मग उर्वरित दोन ते तीन दिवस हे लंकाविला दिलेच पाहिजे असा आम्ही आधीच प्लॅन केला होता. त्यामुळे बिचलगत आलिशान 200 पेक्षा जास्त एकरवर पसरलेल्या बरजाया रिसॉर्ट वर तळ ठोकला. महोगनी लाकडापासून बनलेल्या सुंदर ट्री हाऊस आम्ही बुक केला होता बाजूला गर्द झाडी आणि दूरवर पसरलेला अथांग समुद्र डोळ्याचे पारणे फेडत होता. येथून जवळ असलेल्या स्काय कॅब ने स्काय ब्रीज वर जाण्याचा अनुभव थरारक होता. पारदर्शक कॅब मधून जाताना पायाखालचे गर्द जंगल आणि डोळ्यासमोरील हिरवागार समुद्र जवळ भासत होता. येथिल स्काय ब्रीज/ स्काय वॉल्क वर शाहरुख खान च्या डॉन चित्रपटाचे शुटींग झाले होते.


लंकावी चे सौंदर्य हे येथील मरीन पार्क, चुनखडक गुहा, मॅन्ग्रोव्ह फॉरेस्ट, क्रोकोडाईल पार्क आणि सुंदर समुद्र किनाऱ्यांमध्ये आहे. येथील जंगल युनेस्को ची हेरिटेज साईट म्हणून गौरविलेले आहे. येथील जीवो पार्क बघण्यासारखे आहे. लंकावी आयलंड सफर आणि ईगल स्वेअर ही ठिकाणे मला जास्तच आवडली. मॅन्ग्रोव्ह च्या जंगलातून बोटीद्वारे राईड, ईगल फीडिंग आणि बॅटची गुहा अनुभव सुद्धा मस्तच होता.



लंकावी बरोबर सिंगापूर शहराची सफर करणे उचित राहील. तीन दिवस लंकावी आणि इतर 7 दिवस अशी अकरा दिवसाची टूर करावी. मूंबई वरून कुलांलम्पूर ला जाऊन इतर ठिकणी जाऊ शकता. खर्च 75 ते 145000 खर्च येतो. ओक्टोम्बर ते फेब्रुवारी चांगलाच सिझन होय.
(2019 ला युरोप आणि यावर्षी ऑस्ट्रेलिया कोरोना मुळे राहिलाच पण पुढील वर्षी राहिलेली स्वप्ने पूर्ण करणार, आपण सुद्धा पर्यटन करा आणि पर्यटन वाढण्यास चालना द्या.)
आज सोशल मिरर माध्यमातून वर्ल्ड टूर ही मालिका संपली .

