sm logo new

युरेनस आणि नेपच्यूनवर पडतोय हिऱ्यांचा पाऊस ? Diamonds raining on Uranus and Neptune?

social mirror uranus and neptune daimond raining
social mirror uranus and neptune daimond raining

Share

Latest

आपल्या सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, अनेक छोटे ग्रह, धूमकेतू, कुईपर (kuiper) आणि असंख्य ताऱ्यांचा समावेश होतो. याच सौरमालेत असणाऱ्या आठ पैकी प्रत्येक मुख्य ग्रहाची स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यातीलच दोन मुख्य ग्रह म्हणजे युरेनस आणि नेपच्यून. युरेनस हा सूर्यापासून सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे. तर नेपच्यून हा आठव्या स्थानावर आहे. ते जवळजवळ समान आकाराचे आहेत. पृथ्वीवर जसा पाऊस पडतो तसाच ह्या ग्रहांवर सुद्धा पडतो. पण फरक फक्त इतकाच की युरेनस आणि नेपच्यून ह्या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस पडतो!! हो बरोबर वाचलंत…. “हिऱ्यांचा पाऊस” !!!

हिऱ्यांचा पाऊस कसा पडतो हे समजून घेण्यासाठी युरेनस आणि नेपच्यूनवरील वातावरण आपण समजून घेतले पाहिजे. युरेनस व नेपच्यून यांना बर्फाचे महाकाय ग्रह म्हंटले जाते कारण त्यांच्या कोअर मध्ये ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन आणि सल्फरचे प्रमाण जास्त आहे. हे सर्व घटक साधारण -१७३⁰C तापमानाला गोठतात. ह्या घटकांमध्ये अमोनिया आणि मिथेनचाही समावेश आहे. या दोन्ही ग्रहांवर असलेल्या निळसर छटा त्यांच्या वातावरणात असलेल्या मिथेन वायूमुळेच आहेत.

bgr

हिऱ्यांचा पाऊस नाक्की कसा पडतो?

हिरे बनण्यासाठी उच्च दाब आणि उच्च तापमानाची गरज असते. पृथ्वीच्या गर्भात हिरे बनतात तेव्हा साधारण ९००⁰ C ते १३००⁰C तापमान आणि ८,२५,००० पौंड प्रति चौरस इंच एवढा प्रचंड दाब असतो. युरेनस आणि नेपच्यून यांच्या कोअर मधील तापमान साधारण ६,७२७⁰C असून व पृथ्वीच्या वातावरणापेक्षा हवेतील दाब ६ दशलक्ष पटीने जास्त आहे. (पृथ्वीवरील हवेचा दाब हा १४.७ पौंड प्रति चौरस इंच आहे). कार्बनचे अणू एका विशिष्ठ प्रकारे एकत्र येऊन हिरे बनतात. युरेनस व नेपच्यून यांच्या वातावरणात असलेला मिथेन ह्या उच्च तापमानाला वेगळा होऊन कार्बन आणि हायड्रोजन मध्ये रूपांतरित होतो. यातून मिळालेला कार्बनचे अणु एकत्र येऊन एक क्रिस्टल रचना (Crystal structure) तयार करतात. ज्यालाच आपण हिरा असे म्हणतो. हेच हिरे पावसाच्या स्वरूपात आकाशातून कोसळतात आणि युरेनस आणि नेपच्यूनवर हिऱ्यांचा पाऊस पडतो.

हे हिरे पृथ्वीवर आणले तर?

नाही. हे हिरे पृथ्वीवर आपण घेऊन येणे शक्य नाही. याचे मुख्य कारण असे की युरेनस पृथ्वीपासून ३ अब्ज तर नेपच्यून हा ४.४ अब्ज दूर आहे. १९८६ आणि १९८९ साली व्हॉयेजर-२ हे युरेनस आणि नेपच्यूनला भेट देणारे पहिले अंतराळयान ठरले. याशिवाय अति उच्च तापमान आणि हवेतील दाबामुळे मनुष्याला तिथे जाणे शक्य नाही. त्यामुळे अगदी हिऱ्यांचा पाऊस जरी पडत असला तरी पण ते हिरे गोळा करणे मानवाच्या नशिबात आता तरी नाहीत ते कदाचित भविष्यात शक्य होईल. तो पर्यंत हा हिरा मौल्यवानच समजावा लागेल

FOR YOU