sm logo new

राष्ट्रपतीपदाच्या ओडिशातील द्रौपदी मुर्मू तगड्या दावेदार…

social mirror draupadi murmu
social mirror draupadi murmu

Share

Latest

भारत स्वातंन्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. ७५ वर्षाच्या या प्रवासात भारत देशात डॉ.राजेंद्र प्रसाद, डॉ. अ.कलाम, अर्थ तज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग, डॉ. प्रणब मुकर्जी, डॉ. रामनाथ कोविंद यांच्यासारखे होतकरु, हुशार आणि देशावरती जीवापाड प्रेम करणारे राष्ट्रपती होऊन गेले आहेत आणि आता २०२२ च्या जुलै महिन्यात भारताच्या १५व्या राष्ट्रपतींची घोषणा होणार आहे. राष्ट्रपती पदाच्या खुर्चीसाठी तृणमूल काँग्रेस पार्टीचे यशवंत सिन्हा आणि भारतीय जनता पक्षाकडून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मुर्मू निवडून आल्यास भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरतील.

मुर्मू द्रौपदी यांचा जीवन प्रवास…

मुर्मू ह्या ओडिशातील उपरबेडा गावातील संथाल आदिवासी कुटुंबात जन्मल्या आहेत. सर्व अडचणींवर मात करून, त्यांनी भुवनेश्वरमधील रमादेवी महिला महाविद्यालयातून कला विषयात पदवी मिळवली आणि ओडिशा सरकारमध्ये सिंचन आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक (junior assistant) म्हणून काम केले आहे. 1997 मध्ये ओडिशातील रायरंगपूर येथे नगरसेवक म्हणून निवड होऊन त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ओडिशा सरकारमध्ये वाहतूक, वाणिज्य, मत्स्यपालन, पशुसंवर्धन यासारखी अनेक प्रशासकीय खाती हाताळण्याचा त्यांना अनुभव आहेत.
झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पद त्यांनी भूषवलं आहे. ओडिया राज्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या आणि पदाच्या पूर्ण कार्यकाळासाठी सेवा देणार्‍या त्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या ठरल्या होत्या.

OneIndia

भारताच्या राष्ट्रपती पदाचे महत्त्व…

भारताचे राष्ट्रपती हे राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यांना भारताचे प्रथम नागरिक म्हणून संभोधले जाते. एकदा राष्ट्रपती निवडून आला की त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांसाठी असतो. भारतातील मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त, राज्यांचे राज्यपाल आणि इतर महत्त्वाच्या पदांसह प्रमुख पदांवरती नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. परंतु त्यांचे सर्व कार्यकारी(executive), विधायी(legislative) आणि न्यायिक(judicial) अधिकार वापरत असताना- राष्ट्रपतींना स्वतःच्या इच्छेनुसार वागण्याचा अधिकार नाही. कारण भारतात सर्वात उच्च स्थान म्हणजे राज्यघटना आहे आणि राज्यघटनेने राष्ट्रपतींना मंत्रिपरिषदेच्या मदत आणि सल्ल्यानुसार कृती करण्याची आज्ञा दिली आहे.
राष्ट्रपती मंत्रिपरिषदेला अशा सल्ल्याचा पुनर्विचार करण्यास सांगू शकतात परंतु पुनर्विचारानंतर परत पाठविल्यास त्यावर कार्यवाही करण्यास ते बांधील असतील,थोडक्यात सांगायचे तर भारताचे राष्ट्रपती म्हणजेच देशाचे वास्तविक प्रमुख, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा एवढे शक्तिशाली नाहीत.

मुर्मू ह्या राष्ट्रपती पदासाठी इतक्या समर्पक का आहेत?

संविधानाने राष्ट्रपतीच्या पात्रतेसाठी किमान अटी ठेवल्या आहेत आणि बहुतांश नागरिक या पदासाठी पात्र ठरतात. संथाल ही भारतातील तिसरी सर्वात मोठी जमात आहे आणि ब्रिटीश राजवटीच्या क्रूर चेहऱ्यांचा साक्षीदार असलेल्या आदिवासी समुदायातील राष्ट्रपती केवळ संथालांसाठीच नाही तर भारतातील संपूर्ण आदिवासी आणि दलित समाजासाठी प्रेरणादायी ठरतील.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांनी आपले जीवन समाजसेवेसाठी आणि गरीब, दलित तसेच उपेक्षितांच्या सक्षमीकरणासाठी वाहून घेतले आहे. त्यांच्याकडे समृद्ध प्रशासकीय अनुभव आहे आणि त्यांच्याकडे उत्कृष्ट राज्यकारभाराचा कार्यकाळ होता. मला विश्वास आहे की त्या आपल्या राष्ट्राच्या महान राष्ट्रपती असतील.”

जर द्रौपदी मुर्मू निवडून आल्या, तर त्या भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आणि स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती बनतील. V.V Giri गिरी यांच्यानंतर त्या ओडिशा राज्यातील दुसऱ्या राष्ट्रपती असतील आणि प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असतील. यामुळे राष्ट्रपती कोण होणार? सर्वांचे लक्ष आहे.

FOR YOU