sm logo new

Estrogen स्त्री सखा की ढाल

social mirror estrogen
social mirror estrogen

Share

Latest

स्त्री आरोग्याविषयी विशेषतः स्त्रिच्या प्रजननक्षम वयाविषयी जेव्हा आपण बोलतो, तेंव्हा त्या वयाचे तीन मुख्य टप्पे Menstruation, Pregnancy आणि Menopause हे आपल्याला माहिती असतात. यातील सर्वात शेवटचा टप्पा अर्थात Menopause म्हणजेच रजोनिवृत्ती बद्दल फारशी माहिती नसते. पाळी बंद होण्याचा काळ आणि ह्या काळात अनेक स्त्रियांना वेगवेगळ्या त्रासांना सामोरे जावे लागते.

पण हे असे का होते? ह्या बदलांना कारणीभूत कोण? हे जर आपण समजून घेतले तर ह्या बदलांना सामोरे जाणे सोपे होते. तसेच यानंतर घ्यायची खबरदारी देखील घेतली जाते. Menopause ही एक टप्प्याटप्प्याने येत जाणारी अवस्था आहे. साधारण वय वर्षे चाळीसनंतर स्त्री बिजांची संख्या झपाट्याने कमी होत जाते, पाळी अनियमित होत जाऊन एकदिवस पूर्ण बंद होते. ह्या अवस्थेत Estrogen नावाच्या हार्मोनची पातळी खूपच खाली गेलेली असते आणि खाली गेलेली Estrogen ची पातळी अनेक शारीरिक आणि पर्यायाने मानसिक बदलांना कारणीभूत ठरते. अनियमीत स्त्री बीज आणि खालावलेली इस्ट्रोजनची पातळी यामुळे मासिक पाळीची अनियमितता, अंगावरून कमी-जास्त जाणे, परत परत होणारा योनीमार्गाचा जंतुसंसर्ग व कोरडेपणा यासारख्या तक्रारी सुरू होतात. त्याचे इतर परिणाम खालील प्रमाणे आहेत –


१) इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे चेहरा अचानक गरम होतो, घाम येतो, छातीची धडधड वाढते, डोक्यातून, चेहऱ्यावरून गरम वाफा गेल्यासारखे वाटते याला ‘Hot flushes’ म्हणतात. सेकंदापासून 5-10 मी ही भावना टिकून राहते व परत पूर्ववत झाल्यासारखे वाटते.

२) हाडांचा वाढलेला ठीसूळपणा Osteoporosis अर्थात हाडांच्या वाढलेल्या ठिसूळपणामुळे पाठदुखी, सांधेदुखी व मुख्यतः गुडघेदुखी होते क्वचित प्रसंगी शुल्लक कारणामुळे, फ्रैक्चरसारख्या तक्रारी दिसतात. वेदनाशामक औषधे, कॅल्शिअम आणि फिजीओथेरपी सोबत इस्ट्रोजन घेतल तर लवकर आराम पडतो.

३) वारंवार लघवीला इन्फेक्शन होणं, लघवी होताना जळजळ खोकल्यावर अथवा शिकल्यावर आपोआप थोडी लघवी होणे (Stress Incontinence), लघवीला अनावश्यक घाई होणे, अशा तक्रारी इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे होऊ शकतात. औषधोपचारांसोबत इस्ट्रोजनची क्रीम लावल्यास ह्या तक्रारी कमी होतात.

४) इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे (एल्.डी.एल) अर्थात अडचणीचं कोलेस्टेरॉल वाढतं, डिप्रेशन व एकाकीपणामुळे वजन वाढतं. यामुळे उच्च रक्तदाब व हृदय विकाराचे प्रमाण मेनोपॉजनंतर वाढतं.

५) त्वचा सैल पडून सुरकुत्या वाढतात. त्वचा रुक्ष होते.

६) साधारण वयाच्या चाळीशीनंतर खुपशा स्त्रिया एकाकी होतात. त्यातच मेनोपॉजमुळे झालेले भावनिक बदल त्यांच्या शारिरीक तक्रारी वाढवतात. शिक्षणामुळे घराबाहेर पडलेली मुलं व रिकाम घर, सेवानिवृत्तीनंतर आलेल एकाकीपण वयाच्या ह्याच उंबरठ्यावर स्त्रियांच्या आयुष्यात येत. त्यामुळे भावनिक लक्षणांमध्ये लक्षणीय वाढ होते. Mood swings होणे, चिडचिड होणे, चिंता वाटत राहणे हे देखील estrogen च्या कमतरतेुळे होते. त्यात hot flushes जर रात्री येत राहिल्या तर झोपमोड देखील होत राहते.

Ualberta

भारतीय स्त्रियांमध्ये मेनोपॉज लवकर येतो. वयाच्या 35 – 40 मध्ये बऱ्याच भारतीय स्त्रिया मेनोपॉजमध्ये असतात. त्यामुळे स्वाभाविकच ह्या स्त्रियांमध्ये आरोग्य विषयक समस्या जास्त असतात. परंतु आरोग्य विषयक जागरूक राहिल्यास आणि योग्य काळजी घेतल्यास समस्यांची तीव्रता नक्कीच कमी होते. वयाच्या 35 वर्षानंतर सर्व स्त्रियांनी खालील तपासण्या अवश्य कराव्यात.
१) बोन मिनरल डेन्सिटी
२) मेमोग्राफी (स्तनांची तपासणी)
३) पॅप स्मिअर,
४) लिपिड प्रोफाईल.

हे सर्व बदल नैसर्गिक असले तर त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी कुटुंबाच्या मानसिक आधाराची गरज असते. ह्या बदलांचा स्विकार करत, जीवनशैलीत बदल केल्यास हा बदलाचा टप्पा नक्कीच सुखरूप पार पाडता येतो. Estrogen हे स्त्रीआरोग्याची ढाल बनत स्त्री सखा म्हणून देखील काम करते. ही माहिती आपल्याला मिळाली ती इतरांपर्यंत पोहोचवा. Menopause ला सामोरे जाण्यासाठी इतरांना पण मदत करा.
धन्यवाद…

FOR YOU