sm logo new

पोटच्या गोळ्याला वर्षभर गणित शिकवलं पण निकाल बघताच बाप ढसाढसा रडला.

social mirror father crying
social mirror father crying

Share

Latest

चीनमधील एक घटना सध्या Instagram वर खूपच viral होत आहे. चीनच्या या बापाला चक्क पोटच्या मुलामुळेच रडण्याची वेळ आली.

स्पर्धेच्या वाढत्या जगात प्रत्येक आई वडिलांना वाटत की माझ्या मुलाने शाळेतील परीक्षेत खूप चांगले गुण मिळवावे आणि जे त्यांना आयुष्यात साध्य करता नाही आल ते त्यांच्या मुलाने साध्य करावं. ही एकट्या मुलाची परीक्षा नसून त्याच्या आईवडिलांच्या त्यागाची देखील परीक्षा असते. पण शाळेमधील परीक्षेत सगळ्यांचा मेंदू काम करीलच असे नसते.

सोशल मीडियावर सध्या एक चायनीज व्हिडिओ खूपच viral होत आहे. एक तिशीतला माणूस डोळे चोळत रडत आहे. कारण त्या दिवशी त्याच्या ६ वर्षीय मुलाचा शाळेचा निकाल आला. नव्हते घडायचे तेच घडले! त्याच्या मुलाला १०० गुणांपैकी केवळ ६ गुण आले. ज्यामुळे बापाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्याला रडू कोसळलं.

या viral व्हिडिओ मध्ये अस लिहिलं आहे की या चायनीज बापाने मुलाला वर्षभर गणित शिकवलं होत आणि त्याच्याकडून उजळण्या सुद्धा करून घेतल्या मात्र काहीही फायदा झाला नाही. या बापाच्या मेहनतीला मुलाने होत्याच नव्हतं केलं.

नेटिझन्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या बापाची तर काही जणांनी मुलाची देखील बाजू उचलली. एका नेटिझन ने असे लिहिले की “मुलाच्या क्षमतांवर बोट ठेवणे योग्य नाही. शार्क माशाची क्षमता तो झाडावर चढतो की नाही यावरून ठरविता येत नाही”. या viral व्हिडिओ ने नक्कीच सर्वांना विचार करायला भाग पाडले आहे की अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर कशी हाताळायला हवी.

FOR YOU