sm logo new

First They Killed My Father…… मन हेलावून टाकणारी एका चिमुरडीच्या आयुष्याची गोष्ट

social mirror first they killed my father
social mirror first they killed my father

Share

Latest

लोकशाही आणि कम्युनिस्ट या मधल्या वादाचा सामान्य माणसावर काय परिणाम होवू शकतो याची साक्ष देणारी ही कहाणी. 70 च्या दशकात अमेरिका आणि व्हिएतनामच्या युद्धाचे काही पडसाद हे बाजूच्याच कंबोडियावर पडू लागतात जेव्हा अमेरिका उत्तरी व्हिएतनाममध्ये हल्ला करायला सुरुवात करते. त्यामुळे कंबोडिया मध्ये युद्ध परिस्थिती निर्माण होते. अमेरिका कंबोडिया मधला आपला दूतावास बंद करते. खेमर(khemr) च्या सैनिकी संस्थेमध्ये काम करत असणारा एक ऑफिसर, उंग, आपली नोकरी सोडून घरी येतो. त्याला सात मुले असतात ज्यात त्याची मुलगी लुंग(loung) असते जी आपल्या वडिलांवर खूप प्रेम करत असते.

Commercial Song

Khemr आपल्या कम्युनिस्ट आर्मीच्या मदतीने शहर रिकाम करायला सुरुवात करतात, हे सांगून की अमेरिका त्यांच्यावर हल्ला करणार आहे आणि तीन दिवस शहर बंद असणार आहे. ऊंग आपली बायको आणि सात मुलांबरोबर khemr आर्मी बरोबर निघतो. लुंग हे सगळं पाहत असते आणि तीन दिवस होतात तरीही ते चालतच असतात. पुढे जाऊन तो आपल्या बायोकच्या भावाला भेटतो आणि ते त्याच्या घरी जाऊन राहायला लागतात. तिचा भाऊ हा सुद्धा khemr ला जाऊन मिळाला आहे आणि म्हणून तो काही दिवसच उंगला तिथे राहून देतो.
काही दिवस पुढे प्रवास केल्या नंतर khemr आर्मी त्यांना बाकीच्या कैद्याबरोबर राहायला लावते जिथे त्यांना स्वतःच घर बांधायचं असतं. त्याचबरोबर त्यांच्यावर अत्याचार तर चालूच असतात. Khemr चे नियम इतके भयानक असतात की तिथे जगणं हीच एक शिक्षा असते. त्यातीलच एक नियम म्हणजे तुम्ही तुमचं अन्न हे सांगेल तेवढंच खायचं आणि बाकी अन्न हे khemr ला द्यायच. हे करत असताना जर कोणी चोरून अन्न खाल्ल तर त्याला शिक्षा दिली जाणार असते. लुंग हे सर्व होत असताना पाहते.
या अत्याचाराबरोबर लहान मुलांना शेतात राबवलं जाणार असत आणि त्यासाठी त्यांनां कुटुंबापासून वेगळं केलं जातं. लुंगचे मोठे भाऊ यांना आर्मीमध्ये घेऊन जातात तसेच वडिलांना बोलावलं जातं. ज्यावेळेस त्यांना घ्यायला येतात तेव्हा तो आपल्या बायकोला सांगतो की मुलांना एकत्र राहायला शिकव. Loung हे ऐकते आणि तिला कळत की आपल्या वडिलांना आता मारलं जाणार आहे. पुढे जाऊन loung ची मोठी बहिण हा शारीरिक अत्याचार सहन न झाल्याने मरते. एकंदरींत सर्व कुटुंब विखुरले जाते आणि राहते loung आणि तिची १० वर्षाची बहिण.
Loung ला लहान मुलांच्या आर्मी मध्ये भरती केल जातं जिथे त्यांना बंदूक चालवणं आणि जमिनीमध्ये बॉम्ब पुरवून ठेवणं या सारखी काम शिकवली जातात. त्याच बरोबर लहान मुलांना व्हिएतनाम विरोधी घोषणा आणि इतर काही कथा सांगून त्याच्यामनावर परिणाम केला जातो. एक दिवस loung ला तिच्या बहिणीला भेटायची परवानगी दिली जाते पण ती जिथे तिची आई असते त्या कॅम्प मध्ये जाते. तिथे तिला समजत की सगळं काही जळून राख झालेलं आहे आणि तिच्या आईला मारून टाकण्यात आलेलं आहे.
काही दिवस जातात आणि loung च्या कॅम्पवर व्हिएतनाम सैन्य हल्ला करतं आणि loung बाकी लोकांबरोबर निघून जाते. पुढे जाऊन तिला तिचे भाऊ आणि बहिण भेटतात. ते सगळे एकत्र राहू लागतात. व्हिएतनाम फोर्स वर पुन्हा khemr सैन्य हल्ला करतं आणि पुन्हा युद्ध सुरू होत. सर्वलोक सैरभैर होतात आणि जंगलात पळून जातात. Loung सुद्धा भावंडपासून पुन्हा एकदा वेगळी होते.

Film Affinity

या सगळ्या घटना होतात आणि शेवटी युद्ध संपते. ७ वर्षाची लुंग आणि तिचे भावंड पुन्हा एकत्र येतात आणि बाकी आयुष्य एकत्र घालवतात. १९७० क्या काळात कम्युनिस्ट आर्मी (khemr) ने कंबोडियन लोकांचे खूप नुकसान केले. लुंग सारख्या अनेक लहान मुलांचे मात्र आयुष्य उद्ध्वस्त झाले. लहान मुलांवर झालेले अत्याचार या चित्रपटात अँजेलिना जोली ने खूप चांगल्या प्रकारे दाखवले आहेत.
कम्युनिस्ट विचाराची अतिशय घातक बाजू दाखवून देणारा हा सिनेमा सुन्न करून तर सोडतोच पण युद्धामुळे एक पिढी कशी बरबाद होते हे ही सांगतो. लहानग्या मुलीच्या अ‍ॅक्टींगसाठी आणि लूंगच्या धैर्यासाठी तर नक्कीच पहा………First They Killed My Father Netflix वर.

FOR YOU