sm logo new

ऊसाचा वापर करून इंधन निर्मिती…| Fuel Production using Sugarcane

social mirror fuel production using sugarcane
social mirror fuel production using sugarcane

Share

Latest

भारतात पेट्रोलच्या दराने १०० ओलांडली आहे. सामान्य जनतेच्या खिश्याला ह्याची झळ बसत असताना electric वेहिकल्स बाजारात आल्या आहेत. अस सर्व होत असताना ५ जुन २०२२- जागतिक पर्यावरण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले की भारताने निर्धारित वेळेच्या 5 महिने आधीच पेट्रोल (Fuel) मध्ये 10% Ethanol blending चे उद्दीष्ट साध्य केले आहे. २०१४ मध्ये हे पेट्रोल मधील ethanol blending जवळपास २ टक्या पर्यंतच होते.

हे Ethanol(इथेनॉल) नक्की काय आहे?

इथेनॉल हे एक प्रकारचे जैविक इंधन आहे जे ऊस, मका अश्या अनेक पिकांपासून बनवले जाते. भारतात प्रामुख्याने ऊसावरती fermentation च्या प्रकिये द्वारे इथेनॉल निर्मिती केली जाते.
इथेनॉल तयार करण्यासाठी, yeast ची मदत घेतली जाते. ह्या yeast ला ऑक्सिजन विरहित वातावरणात साखर खाऊ घातली जाते. ऑक्सिजनपासून वंचित असल्याने, हे yeast anaerobic respiration करते व साखरेचे ऊर्जा आणि कार्बन डायऑक्साइडमध्ये रूपांतर करण्याऐवजी, साखरेचे रूपांतर ऊर्जा आणि इथेनॉलमध्ये करते. यालाच इथेनॉल fermentation असे म्हणतात. ज्या प्रक्रियेतून आपल्याला इथेनॉल नावाचे जैविक इंधन मिळते.

इथेनॉलचे फायदे

१. इथॅनॉलचा वापर केल्याने कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते व पर्यावरणाचे रक्षण होते.
सध्या भारतात पेट्रोल मध्ये 10% इथेनॉल मिश्रणामुळे कार्बन उत्सर्जन 27 लाख टनांनी कमी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे.

२. शेतकऱ्यांचे उत्पन्न
इथेनॉल हे प्रामुख्याने ऊसाचा वापर करून निर्माण केले जाते. त्यामुळे ऊस निर्मिती करून त्याचे इथेनॉल मध्ये रूपांतर करण्यास वापर केल्याने शेतकर्‍यांचे उत्पन्न अनेक पटीने वाढले त्याच बरोबर रोजगार निर्मिती वाढले आणि गुंतवणुकीच्या अधिक संधी निर्माण होतील.

३.आयात अवलंबित्व कमी होईल.
भारत दरवर्षी सुमारे 100 अब्ज डॉलर्स परकीय गंगाजळी खर्च करून 85% तेल आयात करतो. आता मात्र एथॅनॉलचा पेट्रोल मध्ये वापर केल्याने इंधन आयातीवरील परकीय चलन खर्चात देशाची 41000 कोटींची बचत होणार आहे.

इथेनॉलचे तोटे…

  1. वनक्षेत्रात घट
    इथेनॉलचा अधिक वापर सुरु झाल्यास जंगलाचे शेतजमिनीत रूपांतरित होण्यास वेळ लागणार नाही आणि असे झाले तर साखरेचे उत्पादन सोडून सर्वजण उसाचा वापर फक्त इथेनॉल निर्मितीसाठीच करतील. ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करून फक्त इथेनॉल निर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो. ज्यामुळे Brazil मधील वन्यक्षेत्रात घट होण्यास सुरुवात झाली आहे.

इथेनॉलचे इतर स्त्रोत…
सध्या इथेनॉलच्या प्राथमिक स्त्रोतांमध्ये ऊस, मका यासारख्या अन्न स्रोतांचा समावेश होतो. परंतु याचा अन्नपुरवठयावरती परिणाम होऊ नये यासाठी व 10E (१०% Ethanol) इथेनॉलशी संबंधित तोटे दूर करण्यासाठी, आपल्याकडे इथेनॉल निर्मितीचे इतर पर्याय उपलबध आहेत, जसेकी आपण कापणीनंतर शेतात उरलेल्या पालापाचोळा व पाचटापासून इथेनॉल तयार करू शकतो. त्याचबरोबर भाताचा उरलेला भुसा, उसाची पाचट इ. गोष्टींचा वापरही आपण करू शकतो.
याही पलीकडे जाऊन इथेनॉलच्या इतर अनेक स्रोतांवरती सध्या संशोधन सुरु आहे ज्यात आपण सांडपाणी, किंवा खाऱ्या पाण्यात उगवलेल्या शेवाळापासून इथेनॉल मिळवू शकतो.

इथेनॉल वापरामध्ये आघाडीवर असलेले देश…
इथेनॉलच्या वापरामध्ये ब्राझील अग्रेसर आहे, जेथे पेट्रोलमध्ये सरासरी इथेनॉल मिश्रण सुमारे ४८ टक्क्यापर्यंत केले जाते. परंतु सध्या आपल्या वापरात असलेली सामान्य वाहने इथेनॉलच्या एवढ्या उच्च वापरासाठी तयार नाहीत, कारण येथे फ्लेक्स इंधन इंजिन तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे. जे इथेनॉलच्या E96 किंवा अगदी E100% इथेनॉलशीही जुळवून घेऊ शकते. ब्राझीलमध्ये, सर्व वाहनांपैकी 80% वाहने ही फ्लेक्स इंधन इंजिन आहेत.

भारताचे ध्येय
भारत 2025 पर्यंत पेट्रोल मध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये, साखर कंपन्यांना ऊसाचा अतिरिक्त साठा इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यासाठी सरकारने प्रोत्साहन देण्यास सुरुवातही केली आहे. ज्यामुळे भारतातही E४०, E८० क्षमता असलेल्या गाड्या लवकरच आपल्याला धावताना दिसतील.

NewsOnAIR
FOR YOU