विजय आणि अशोक दोघे वर्गमित्र, वय २१ वर्षे. गेली दोन महिने केसांच्या तक्रारीसाठी माझ्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत. follow up ला पण बऱ्याचदा सोबत येतात. मनमोकळेपणे बोलतात, त्यांच्या अडचणी शेअर करतात. काल असेच दोघे सोबत follow upला आले. विजय नेहमीसारखाच जाणवला तर अशोक मात्र नाराज. मला म्हणाला, “मॅडम आम्ही दोघांनी सोबतच treatment चालू केली, विजयला खूप चांगला फरक पडला आणि माझे मात्र अजूनही केस गळतच आहेत. मला पण Effective Medicine द्या ना.” त्याचे ‘Effective Medicine’ हे वाक्य ऐकून मला मात्र थोडे हसू आले. त्याला समजावून सांगितलेल्या गोष्टी आज लेख स्वरूपात तुम्हा सगळ्यांना विशेषतः अशोकच्या वयातील मुलांना सांगत आहे. आधी आपण hair loss आणि hair fall ह्यातील फरक समजून घेवू.
Hair loss म्हणजे केस विरळ होणे, केसांचा volume कमी होणे, जुने केस गळणे आणि नवीन केस उगवून येणे ह्यात असमतोल होणे, विरळपणामुळे केसांच्या खालची त्वचा scalp दिसून येणे. Hair fall म्हणजे केस गळणे. केसांच्या वाढीचा नैसर्गिक चक्रात सुध्दा केस गळतात. मग केस गळणे हे नैसर्गिक आहे की काळजी करण्यासारखे हे कसे समजणार? एका दिवसाला ८०-९० आणि त्या पेक्षा जास्त केस गळणे ही काळजीची बाब आहे. कारण नैसर्गिक रित्या ज्या वेगाने केस गळतात त्याच वेगाने नवीन केस उगवत राहतात. त्यामुळे आपल्याला टक्कल पडत नाही. आणि गळण्याचे आणि उगवण्याचे गणित बिघडले की hair fall हा hair loss मध्ये रुपांतरीत होतो.

अशोकच्या प्रश्नाचा विचार केला तर लक्षात येईल की, विजय आणि अशोक हे एकाच वयाचे एकच अडचण घेवून आलेले असले तरी त्यांना मिळणारा फायदा किंवा रिझल्ट वेगवेगळे होते. ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे आपले केस हे आपल्या शरीरात आणि रक्तात असलेल्या growth factors वर अवलंबून असतात, अर्थात त्यांचे पोषण शरीरातील पोषण मूल्यांवर अवलंबून असते. शारीरिक आरोग्य आणि पिषणयुक्त आहार ही सर्वात महत्वाची पण दुर्लक्षित बात असते. आपण वेगवेगळे oil, shampoo आणि treatment चा विचार करण्यापूर्वी आपल्या शारीरिक आरोग्याकडे बघणे फार गरजेचे असते. Hemoglobin, calcium, vit B12, D3 सारख्या पोषण मूल्यांची कमतरता, इतर मायक्रो nutrients ,vitamines, minerals ची कमतरता, पोटाचे जुनाट विकार, hormonal imbalance विशेष करून स्त्रियांमध्ये असणारे pcod/ Thyroid सारख्या ग्रंथींचे आजार, अपुरी झोप, मानसिक ताणतणाव, चिंता, नैराश्य ही hair fall होवून hair loss घडवून आणणारी मुख्य कारणे आहेत. अनेक पेशंट असे येतात की त्यांना औषधे नको असतात पण तेल आहे का? Serum आहे का? काही लावायला द्या अशी मागणी असते. इथे महत्वाची गोष्ट अशी आहे की, जसे आपण जमिनीला किंवा रोपांना कुठलेही खतपाणी न देता फक्त झाडाचे पाने पुसत राहिलो तर जमत नाही. तसेच केसांना हवे असलेले पोषण त्यांना मिळाले नाही तर फक्त oil किंवा serum लावून खूप फायदा होत नाही.
त्यामुळे hair fall मध्ये सगळ्यांत पहिले आपला आहार, रक्ताच्या काही basic test करून घेणे गरजेचे असते. त्यानंतर आपली life style मध्ये दुरुस्ती करणे महत्वाचे आहे. रक्ताच्या तपासण्या आणि त्यातील रिपोर्ट नुसार योग्य ठिकाणी खात्रीशीर उपाय ही झाली पुढची पायरी.

ह्याच बरोबर आणखी काही महत्वाच्या गोष्टी :
१. धावपळीच्या जगात केसांची निगा राखणे कठीण होत आहे.
२. सुंदर दिसण्याच्या नादात केसांवर विविध प्रकारच्या chemical treatment करून घेतल्या जात आहेत.
३. जाहिरातीतून विकायला असलेले वेगवेगळे shampoo, serum, hair pack, ह्याचा अतिवापर होत आहे.
४. मित्र मैत्रिणीला suit झालेले एखादे तेल किंवा केमिकल treatment, वैद्यकीय सल्ल्याशिवाय सर्रास वापरले जात आहेत.
वरील सर्व दिलेली कारणे त्यासाठी मी सांगेन की, जेवढे आपण नैसर्गिक गोष्टींचा वापर टाळत, chemical चा वापर केसांना लावण्यासाठी करू तेवढे केसांचे नुकसान होत जाते.
रोजच्या जगण्यात आपण केसांच्या निगेसाठी खालील काही गोष्टी जरूर कराव्यात :
१. नियमित व्यायाम ज्यात प्राणायामाचा अभ्यास समाविष्ट असावा.
२. आहार चौरस असावा, protein हा आहाराचा मूलभूत भाग असावा. त्याच्या जोडीला ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, वेगवेगळ्या प्रकरच्या बिया खाव्यात. ऋतूनुसार आहार आणि केसांची निगा ह्यात बदल करावा. अती घट्ट किंवा अती सैल hairstyle टाळावी.
केसांच्या प्रकारानुसार shampoo आणि conditioner चा वापर करावा. केसांच्या रचनेत अधूनमधून बदल करत रहावा. कडक उन्हात किंवा extreme temperature आणि अती जास्त वाऱ्यात केस रुमाल, स्टोल , हेल्मेट ने झाकावे. (केसांचा) scalp चा नैसर्गिक pH हा acidic असतो त्यामुळे खूप जास्त फेस होवून केस मुलायम बनवणारे shampoo टाळावे, त्याने तात्पुरते केसांचा पोत मऊ वाटत असला तरी त्याने केसांची मुळे खराब होतात. गळणारे केस बघून जेवढा जास्त stress घ्याल तेवढे केस जास्त गळत राहणार. त्यामुळे गाळणाऱ्या केसांचा ताण न घेता वर सुचविलेले उपाय आपण करून बघावे.
विजय आणि अशोकच्या बाबतीत सांगायचे तर मुळात दोन भिन्न व्यक्ती, भिन्न स्वभाव, भिन्न शारीरिक प्रकृती आणि केसांची निगा घेण्याची भिन्न पद्धत आणि केस गळण्याचे भिन्न कारणे असणाऱ्या दोघांचा उपचाराला प्रतिसाद देखील भिन्न असणार आहे. केसांच्या समस्येवर सर्वोत्तम उपाय म्हणजे होमिओपॅथीक उपचार पद्धती. ज्यात प्रत्येक वेगळ्या माणसाचा विचार करून त्यासाठी वेगळे उपचार केले जातात. मुळात प्रत्येकाचे केस गळण्याचे वेगळे कारण आहे ते शोधून त्यावर उपचार केले जातात. पोषणमूल्यांची झीज भरून काढण्यासाठी बाराक्षार (twelve tissue remedies) दिले जावून केसांना लावण्यासाठी mother tincture ही दिले जातात.
डोक्यावरचे केस हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे त्याची काळजी घेणे ही तितकेच महत्वाचे. त्यामुळे ह्या केस गळतीचे करू काय? असे म्हणत निराश न होता लेखात दिलेले मार्ग आहेत त्यांची जरूर मदत घ्या…
All The Best…..