मागच्या लेखामध्ये आपण शेअर मार्केट बद्दल समाजात असणारे काही गैरसमज पाहिले आणि ते दुर केले, या लेखामधे आपण पुढच्या पायरी वर जाऊ आणि शेअर बाजारात गुंतवणूक कशी करायची हे समजावुन घेऊ.
शेअर बाजारात गुंतवणूक मुख्यत: 2 प्रकारे करता येते.
१. प्रत्यक्ष
२. अप्रत्यक्ष
प्रत्यक्ष (Direct) म्हणजे आपण स्वत: हुन आपले D-MAT खाते एखाद्या Broker कडे उघडने आणि आपल्याला हव्या असनार्या companies चे shares खरेदी करणे.
अप्रत्यक्ष (Indirect) म्हणजे Mutual Funds, EPF (Employee Provident Fund), NPS (National Payment Scheme), ULIP (Unit Linked Insurance Product) मध्ये पैसे गुंतवणे.
आज आपण शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची Direct method समजावुन घेऊ. सर्व प्रथम आपले D-MAT खाते SEBI Registered Broker कडे Compulsory आहे.
e.g. ZERODHA, KOTAK SECURITIES, PAYTM MONEY, etc.
D-MAT खाते उघडतानाच तुमचे बॅंक खाते त्याला जोडले जाते. ही पुर्ण प्रक्रिया online आहे आणि पुर्ण होण्यासाठी 2-3 दिवस लागतात. त्यानंतर तुम्ही त्यात पैसे जमा करुन तुम्ही अभ्यास केलेल्या companies चे shares खरेदी करु शकता.
Direct गुंतवणुक करण्याचे फायदे:
१. तुम्ही हव्या त्या companies चे shares हव्या तेवढ्या quantity मध्ये खरेदी करु शकता.
२. हव्या त्या वेळी Profit/Loss book करु शकता.
३. Asset allocation तुमच्या मर्जी प्रमाणे करु शकता.
४. तुमचा Portfolio Hyper Concentrated किंवा Hyper Diversified करु शकता.
Direct गुंतवणुक करण्याचे तोटे:
१. जर तुम्हाला तुम्ही गुंतवणुक करत असलेल्या Company बद्दल व्यवस्थित व पुर्ण माहिती नसेल तर तुमचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
२. एखाद्या company मध्ये केंव्हा गुंतवणुक करावी व केंव्हा ती काढुन घ्यावी याची जर माहिती नसेल, तर तुमचे नुकसान होऊ शकते.
३. फक्त ऐकीव माहिती वर केलेली गुंतवणुक धोकेदायक ठरु शकते.
४. कोणत्या Sector मध्ये किती risk घ्यायची याबद्दल अपुरी माहिती नुकसानदायी ठरु शकते.
५. Valuations बद्दल अपुरी माहिती असेल तर चांगल्या company मध्ये चुकिच्या वेळी केलेली गुंतवणुक काही काळासाठी त्रासदायक ठरु शकते.
या पुढच्या लेखामध्ये आपण Indirect गुंतवणुकी बद्दल समजावुन घेवुया.