sm logo new

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

socail mirror independence day
socail mirror independence day

Share

Latest

३ एप्रिल १९८४ रोजी जेव्हा राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले. राकेश शर्मा यांनी मॉस्कोमधील अधिकारी आणि तत्कालीन भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमवेत एक संयुक्त टेलिव्हिजन वार्ताहर परिषद घेतली. तेव्‍हा इंदिराजींनी राकेश शर्मांना प्रश्‍न विचारला- “उपर से आपको भारत कैसे दिखता है?, तेव्हा राकेशजींनी कोणताही संकोच न करता उत्तर दिले, “सारे जहां से अच्छा!”

भारत देश आज आपल्या स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव साजरा करत आहे. याच दरम्यान देशाच्या विविध शहरांमध्ये आणि गावंमध्ये तिरंगा rally चे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी ७५ व्या स्वतंत्र दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ ची घोषणा करत भारतातील नागरिकांना आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर देशातील अनेक धारणांवर राष्ट्रीय झेंड्याच्या रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई देखील केली आहे.

७५ वर्षांपूर्वी २२ जुलै १९४७ रोजी भारताने तिरंग्याला आपला राष्ट्र ध्वज म्हणून स्वीकारले. जो आज १५ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर डौलाने फडवला जातो. या सोहळ्यासाठी दरवर्षी जगभरातून अनेक मोठ्या हस्तींना आमंत्रित केले जाते, पण या वर्षीचे पाहुणे जरा अधिक खास आहेत.

अमेरिकन गायिका Mary Millben भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी सांस्कृतिक राजदूत म्हणून अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार आहे.

भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी अधिकृतपणे आमंत्रित केलेली अमेरिकन गायिका Mary Millben कोण आहेत?
भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवादरम्यान भारताच्या राष्ट्रगीताची त्यांची आभासी कामगिरी आपल्यापैकी अनेक भारतीयांना अजूनही आठवते.
2020 मध्ये देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या राष्ट्रगीताच्या व्हर्च्युअल परफॉर्मन्सदरम्यान भारताला पहिल्यांदा Millben यांच्या प्रतिभेबद्दल माहिती मिळाली.

Millben हे United States चे प्रतिनिधीत्व करणारे अधिकृत पाहुणे असतील. भारताच्या स्वातंत्र्याच्या या महत्त्वाच्या दिवशी त्यांची भेट United States आणि भारत यांच्यातील लोकशाही युतीवर प्रकाश टाकेल असे सांगत, Millben म्हणाल्या भारत आणि जगभरातील भारतीय समुदायांसोबतचे त्यांचे अर्थपूर्ण नाते साजरे होत आहे.
Millben यांनी सलग तीन अमेरिकन अध्यक्षांसाठी गायन केले आहे – जॉर्ज डब्ल्यू. बुश, बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प. त्यांनी जागतिक नेत्यांसाठी आणि आंतरराष्ट्रीय रॉयल्टीसाठी देखील गाणे गायले आहे.

शेवटी आपल्या tweet मध्ये भारताच्या महानतेचे वर्णन करताना Millben म्हणतात- “इतर देशांमध्ये मी पर्यटक म्हणून जाऊ शकते, पण भारतात मात्र मी एक भाविक म्हणून येते आहे. जय हिंद

भारतीय स्वातंत्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

FOR YOU