कृषी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे आणि सध्या भारत हा कृषिउत्पादात जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतात उपलब्ध असलेल्या एकूण नोकऱ्यांपैकी अंदाजे 52 टक्के नोकऱ्या ह्या कृषी संबंधित क्षेत्रावर अवलंबून आहेत. २०२०-२१ नुसार भारताच्या जीडीपी अकाऊंट मध्ये कृषीचे योगदान जवळपास १९.९ टक्क्या पर्यंत आहे. २०१९च्या आकडेवारीनुसार मध्ये, भारतातील ४२.६ टक्के कर्मचारी कृषी क्षेत्रात कार्यरत होते.

भारतीय कृषी क्षेत्राने गेली काही वर्ष लक्षणीय वाढ नोंदविली आहे. अन्नधान्याचे उत्पादन २०११-१२ मध्ये २५० दशलक्ष टनावरून २०१९-२० मध्ये २९७.५ दशलक्ष एवढे वाढले आहे. पंजाब हे भारताचे धान्य कोठार आणि भारताचे ‘Breadbasket’ म्हणून ओळखले जाते.
हरियाणा हा भारताच्या हरित क्रांतीचा महत्त्वाचा भाग होता. जो आता भारतातील सर्वात महत्त्वाचे कृषी राज्य आहे.
मध्य प्रदेश डाळींच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर ते सोयाबीन आणि लसूण पिकविण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. राज्याच्या GDP मध्ये मध्यप्रदेशचा वाटा 14% आहे.
महाराष्ट्र राज्य ज्वारी उत्पादनात देशात आघाडीवर आहे. देशातील एकूण ज्वारी उत्पादनापैकी 52% उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते.

भारतात आसाम हे शेतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. आसाम हे इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी विकसित राज्यांपैकी एक आहे. आसामची अर्थव्यवस्था जवळपास संपूर्णपणे शेतीवर केंद्रित आहे आणि ७०% लोकसंख्येचे जीवनमान कृषी क्षेत्र पुरवते. आसाम राज्य चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
छत्तीसगड राज्याला “मध्य भारतातील तांदळाचे भांडार” म्हणून ओळखले जाते. छत्तीसगरमध्ये 77% जमीन भाताची लागवड करते
भारत दूध, डाळी, चहा आणि मसाल्याच्या पदार्थ उत्पादन करण्यात जगामध्ये पहिल्या स्थानावर आहे, तसेच भात,गहू, कापूस, ऊस, अश्या पिकांबरोबरच फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतातील कृषी क्षेत्रामधील काही ठळक वैशिष्ट्ये:-
१. ग्रामीण भारतातील उपजीविकेचा सर्वात मोठा प्रदाता शेती आहे.
२. भारतातील बहुतांश शेती प्रामुख्याने अजूनही मान्सूनवर अवलंबून आहे.
३. गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पादन वाढीचा वेग नियमित वेगा पेक्षा खुंटला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका :-
- सर्वात मोठे रोजगार देणारे क्षेत्र:- CMIE (Centre for Monitoring Indian Economy), च्या सर्वेक्षणातील डेटा नुसार 2017-18 मध्ये एकूण रोजगारातील शेतीचा वाटा 35.3% वरून 2018-19 मध्ये 36.1% आणि नंतर 2019-20 मध्ये 38% वर गेला आहे.
- भांडवल निर्मितीमध्ये योगदान:- शेतीतील गुंतवणुकीद्वारे भांडवल निर्मितीमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा साठा, साधने आणि उत्पादकता सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची संसाधने, विशेषत: जमीन आणि श्रम यांचा अधिक प्रभावीपणे वापर करता येतो.
- उद्योगांना कच्चा माल पुरवणे :- कापड, साखर, वनस्पती तेल, चहा, कॉफी आणि चामड्याच्या वस्तू ही भारतातील कृषी-आधारित उद्योगांची काही उदाहरणे आहेत. हे उद्योग औद्योगिक उत्पादनात तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देतात आणि लोकांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी रोजगार आणि संधी देतात.
- औद्योगिक उत्पादनांसाठी बाजारपेठ:- कृषी क्षेत्रामुळे ˘ ही वस्तू आणि आदानांमध्ये (inputs) मध्ये झाली आहे, ज्यांच्या वापर अंतिम उत्पादने (final product) बनवण्यासाठी केला जातो. यांत्रिकीकरण, सिंचन उपकरणे, अश्या अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फळे आणि भाज्यांचे उत्पादन वाढवण्यास मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.

भारत देशाला कृषी क्षेत्रामध्ये आणखी उंचीवर पोहचवण्यासाठी भारत सरकारकडून सुद्धा खूप साऱ्या योजनांचा जसे कि हर खेत पाणी, Soil Health Card, Per drop More Crop,One Nation,One market, पी. एम्. किसान योजना, MSP आणि वेगवेगळी अनुदाने यांचा समावेश आहे. देशाचा विकास होत असतानाच भारतातील शेती विकसित होते आहे. अन्न उत्पादन आणि उपभोगाची पद्धत बदलत आहे. भारतात, अनेक वर्षांपासून लोकसंख्या, उत्पन्न, ग्रामीण/शहरी गतिशीलता आणि ग्रामीण दरडोई उत्पादकतेचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे पुढील 20 वर्षांमध्ये भारताचा दरडोई जीडीपी 320% ने वाढण्याची अपेक्षा आहे. जसजसा वेळ जातो तसतसा ट्रेंडही बदलतो पण कृषी क्षेत्र आणि वर असलेले अवलंबित्व बदलणे किंवा कमी होणे शक्य नाही!