sm logo new

भारताचे “Chickens Neck”

social mirror chickens neck
social mirror chickens neck

Share

Latest

भारत देश हा सध्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत आहे. भारत देश आपल्या प्रगतीच्या रूपाने जगाच्या पाठीवर आपली एक अनोखी ओळख निर्माण करत असताना, भारताच्या प्रगतीमध्ये चीन अनेक प्रकारे अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे.
चीनला दक्षिण आशियावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. चीनने भारताचे शेजारी पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांना कर्जबाजारी करून पूर्णपणे उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर येऊ ठाकले आहे आणि आता चीन भारताचे ‘Chickens Neck’ हस्तगत करून भारतात घुसण्याचा प्रयत्न करत आहे.

भारताचे Chickens Neck काय आहे?

१९४७ मध्ये जेव्हा भारत-पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान निर्माण झाले. पूर्व पाकिस्तानचे रूपांतर आता बांगलादेशा मध्ये झाले आहे. याच फाळणी दरम्यान भारताचे ‘Siliguri Corridor’ अस्तित्वात आले. ज्यालाच भारताचे Chickens Neck असे संबोधले जाते.

भारत, बांगलादेश ,नेपाळ, भुतान आणि चीन अशा 5 देशांच्या सीमा एकमेकांना जवळपास याच ठिकाणी भिडतात. भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये (सेव्हन सिस्टर) जाण्याचा एकमेव मार्ग Siliguri Corridor मधून जातो. त्यामुळे ही वाट काबीज करण्याच्या दृष्टीने चीन आपले सर्व डावपेच टाकत आहे.

भौगोलिकदृष्ट्या हे फार मोठे क्षेत्र नाही. केवळ 60 किमी लांबीचे आणि फक्त 20 किमी रूंदीचे हे Corridor आहे. परंतु जर भारताने जर येथील नियंत्रण गमावले तर भारताची ईशान्य राज्ये देशापासुन कायमची वेगळी होतील व भारत हा 21 राज्ये असणारा देश होऊन बसेल.
या कॉरिडॉरच्या उत्तरेला सिक्कीम राज्य व चीन आणि भूतान देश आहे, तर दक्षिणेकडून बांगलादेश, पूर्वेकडून आसाम आणि पश्चिमेकडून नेपाळ आहे.

Siliguri Corridor चे महत्त्व…

दार्जिलिंग ते सिक्कीम असा प्रवास करण्याचा एकमेव रस्ता (NH 31) या Corridor मधून जातो, जो पुढे अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुराला जोडतो. भारताच्या पूर्वेकडील 7 राज्यांमध्ये सुमारे 5 कोटी लोकसंख्या आहे जी भारताच्या अर्थशास्त्र आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजली जाते.
ही ईशान्येकडील राज्ये भारतातील चहा आणि लाकडाचे प्रमुख स्त्रोत आहेत. या राज्यांना जोडणारा रेल्वे मार्गही याच Chickens Neck प्रदेशातून जातो.
Siliguri मधून ईशान्येकडील दोन मुख्य नद्या ‘तीस्ता’ आणि ‘जलधका’ यांचा प्रवाह देखील आहे. ज्या पर्वत कांचनगंगातून उगम पावतात. या नद्या पुढे ब्रह्मपुत्रा नदीला जाऊन मिळतात जी ईशान्येची तसेच बांगलादेशची मुख्य जलदायिनी आहे.

Telegraph

Siliguri Corridor डोकलाम विवादा 2017 मध्ये महत्वाची भूमिका बजावली कारण डोकलाम पठारा मधील ‘चुंपी व्हॅली’ फक्त 130 किमी अंतरावर आहे. जिथे भारत, चीन आणि भूतानच्या सीमा एकमेकांना भिडतात.
या सीमेवरील भारतीय सैन्यदलाला सर्व पुरवठा याच कॉरिडॉर मार्फत केला जातो आणि भारताच्या ईशान्य भागात भारतीय सैन्याला दारूगोळा पुरवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी देखील मदत करते. Siliguri Corridor भारताच्या पूर्वेकडील धोरणासाठी व या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यामध्ये ही महत्वाची भूमिका बजावते.

त्यामुळे भारतातील या अतिसंवेदनशील परिसराला भारताचे गोल्डन गेटच म्हणावे लागेल.

FOR YOU