sm logo new

भारताचे पहिले Dark Sky Reserve – हानले(Hanle)

social mirror dark sky reserve
social mirror dark sky reserve

Share

Latest

खगोलशास्त्र” (Astronomy) आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक महत्वाची भूमिका बजावते. आकाशातील सर्व ग्रह ताऱ्यांच्या स्थितीनुसार आपली जन्म कुंडली ठरवली जाते. परंतु हे ग्रह तारे आता आपल्याला प्रदूषणामुळे दिसत नाही. रात्री आकाशात असंख्य तारे असतानाही आपल्याला फार फार तर बोटांवर मोजता येईल एवढेच दिसतात. आधुनिकतेच्या शर्यतीत आपण रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य विसरलो आहोत. जगातील जवळपास ८०% जीवजंतू हे प्रकाश प्रदूषण (Light pollution) खाली जगत आहे.

असे सर्व होत असताना भारताने क्लिअर स्कायचे महत्व लक्षात घेऊन लडाख मधील ‘हानले’ गावाला dark sky reserve म्हणून घोषित केले आहे. येथील भागात हिमालयाच्या खालील पर्वत रांगांमुळे ढग वर पर्यंत पोहचत नाहीत व निरभ्र आकाश आहे. ज्यामुळे आपण आकाशातील सर्व ग्रह तारे स्पष्टपणे पाहू शकतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स ज्याचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे त्याचीच Astronomical observatory देखील येथे सरासरी समुद्रसपाटीपासून १५००० फूट उंचीवर सरस्वती पर्वतावर स्थित आहे. जेथे दोन मीटर भिंग असलेली घुमटाकार हिमालयीन ‘चंद्र दुर्बीण ‘ (Chandra Telescope) आहे. तथापि, हानले हा हिमालयातील फार दुर्गम आणि आरोग्याच्या न मानवणारा प्रदेश असल्याने नियमितपणे येथे जाणे कठीण आहे, त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा बंगळुरूहून उपग्रहाद्वारे हा telescope ऑपरेट केला जातो. रात्री डोमचे शटर निरीक्षणासाठी उघडले जाते आणि 360⁰ फिरू शकणारा हा telescope रात्रीच्या वेळी डेटा कलेक्शनचे काम करतो. परंतु रात्रीच्या वेळी हानले गावातील कृत्रिम प्रकाशामुळे वेधशाळेतील डेटा संकलनावर परिणाम होत आहे.

iStock

निरभ्र आकाश राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने लडाख प्रशासन, लडाख हिल डेव्हलपमेंट कौन्सिल आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सने हानले गावच्या या प्रदेशाला भारताचा DARK SKY RESERVE म्हणून घोषित केले आहे आणि 1000 लोकवस्ती असलेल्या हानले गावातील लोकांनीही या प्रस्तावाचे स्वागत केले आहे.

या प्रस्तावानुसार, गावाच्या सभोवतालच्या 1000 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये प्रकाश व्यवस्थापन आणि रात्रीच्या वेळी वाहन चालविण्यासाठी योग्य मार्गदर्शक तत्त्वे असतील. रात्रीच्या स्पष्ट दिसणाऱ्या आकाशाचे महत्व सांगण्यासाठी व याबद्दल जनजागृती करण्यासाठी गावात Telescope ( दुर्बीण) बसवून खगोलीय पर्यटन ( Astro Tourism) चालना दिली जात आहे. स्थानिकांना अस्ट्रो गाईड्स (Astro Guides) म्हणून प्रोत्साहन दिले जात आहे. इथल्या मुलांमध्ये अनंत आकाशाबद्दल एक प्रकारची जागरुकता निर्माण करण्यास ही यामूळे मदत होत आहे.

Asian News Channel


एवढेच नाही,
या प्रदेशाचा परिसर अनेक दुर्मिळ प्राणी आणि पक्ष्यांचे घर आहे. स्वच्छ आकाश केवळ फक्त प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास आणि संशोधनास मदत करेल असे नाही तर या प्राण्यांचे संरक्षण देखील करेल. तिबेटीयन गझेल नावाची प्रजाती केवळ हिमालयाच्या या प्रदेशातच आढळते.
अनेक स्थलांतरित पक्षी जसे की, Black Knight Crane आणि Bar Headed Goose जो जगातील सर्वात उंच उडणारे पक्षी आहे तो देखील येथेच आढळतो.

आजच्या बदलत्या जगात, निरभ्र आकाश आता कुठेतरी लुप्त होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत भारताने Dark Sky Reserve म्हणून केलीली हानले गावाची निवड हे योग्य दिशेने उचलेले पाऊल आहे!

FOR YOU