sm logo new

Israel – भविष्यातील शेतीचा वेध घेताना…

social mirror israel
social mirror israel

Share

Latest

ते म्हणतात ना गरज ही शोधाची जननी असते. असेच काहीसं Israel (इस्रायल) सोबत घडले आहे.
Israel – आशिया खंडामध्ये middle east भागात स्थान असलेला एक छोटासा देश. मूर्ती लहान, कीर्ती महान ह्या म्हणीला पूर्णतः न्याय देणारा हा देश आहे. जगात क्वचितच एखादा देश असेल जेथे इस्राएलचे नाव घेतले जात नसेल, आणि त्याची कारणे ही तशीच आहेत. लांब पर्यंत पसरलेले वाळवंट आणि ओसाड डोंगरांनी व्यापलेल्या ह्याच प्रदेशात जगातील सर्वात आधुनिक शेती केली जाते. इस्रायल हा वाळवंटाने व्यापलेला देश असल्याने ह्याठिकाणी भारताच्या तुलनेत अत्तिशय कमी पाऊस पडतो, येथे माती पेक्षा वाळू जास्त प्रमाणावर सापडते, प्रखर सूर्यप्रकाश आणि तीव्र तापमान व वनस्पतींच्या वाढीसाठी अयोग्य हवामान परिस्थिती येथे आहे. तरीही Israel जगाच्या पाठीवर Agriculture hub म्हणून ओळखला जातो. Israelची एकूण लोकसंख्या ही केवळ ८ .७ दशलक्ष असली तरी आपल्या गरजे पेक्षा १० पटीनेअधिक लोकसंख्येलासाठी पुरेल इतक्या भाजीपाल्याचे उत्पादन येथे घेतले जात आहे. पण प्रश्न असा पडतो कि एवढ्या सर्व विपरीत गोष्टी एकत्र असताना Israel मध्ये शेती कशी केली जात असेल?

Israel मधील शेती ?

येथील रेताड जमीन शेतीसाठी अजिबात पोषक नाही. तरीही यावरती उपाय शोधात रेताड जमिनीवर पोषक मातीचा नवीन थर लावून शेतीचे नवनवीन प्रयोग केले जातात. परंतु शेती करत असताना फक्त पीक लागवड करून चालत नाही त्या पिकाला वेळच्यावेळी पाणी पुरवठाही करावा लागतो. पाणी नसेल तर पीक उत्पादन घेणें शक्य होईल का? या प्रश्नाचे उत्तर शोधत Israel मध्ये सर्व प्रकारच्या पिकांचे व भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते.परंतु या साठी पाणी कसे व कुठून उपलब्ध होईल हा प्रश्न पडतो? याचेच निवारण करण्यासाठी वापरलेल्या पाण्यापैकी वाया जाणारे 80 टक्के पाणी पुन्हा वापरले जाते. भूघर्भात सापडणाऱ्या खाऱ्या पाण्याचे desalination करून ते शेतीसाठी शुद्ध करून वापरले जाते . ठिबक सिंचन (ज्याचा शोध Israel मध्ये लागला ) सारखे आधुनिक तंत्रन्यान वापरुन पिकांची तहान भागवली जाते.
सीड टेकनॉलॉजी सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सीडलेस फ्रुटस त्याबरोबर हायब्रीड टेकनॉलॉजिचा वापर करत दर्जेदार उत्पादन Israel घेत आहे. यासाठीच संशोधनाला अधिक प्रोत्साहन देत येथे अनेक Agriculture Reasearch Institues ची स्थापना केली गेली. नैसर्गिक संकटाशी झुंज देत असताना पॉलीहाऊस , ग्रीनहाऊस सारखे तंत्रज्ञान वापरत Controlled Agriculture Israel करत आहे.

wayofzion

इस्राएल मधील कृषी तंत्रज्ञान व कृषी मालाची विक्री -Israel भारता बरोबरच इतर जगात कृषी कामासाठी लागणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान व मशीन्स निर्यात करतो. यातून Israel ला मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे. त्याचबरोबर येथील खजूर, झुचीनी, खरबूज, चेरी टोमॅटो,काकडी अश्या अनेक फळ -भाज्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आकाराने लहान असला तरीही जगाचे पोषण करण्याची ताकत Israel देशा मध्ये आहे. येथील चेरी टोमॅटो संपूर्ण जगात आपल्या चवीसाठी आणि उच्च पौष्टिक मुल्ल्यांसाठी ओळखले जातात. पीक उत्पादन घेत असताना सर्वात महत्वाचे असते पीकव्यवस्थापन. पिकांवर होणारा वेगवेगळ्या कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांना नापसंती दाखवत – bioinsecticides आणि biopesticidesचा वापर शेतीसाठी केला जात आहे. precision agriculture चा वापर करत Drones आणि Sensors सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पारंपरिक शेती ऐवजी ऍडव्हान्स contactless farming Israel करत आहे. भारतातील शेती मध्ये प्रामुख्याने मनुष्यबळाचा वापर अधिकतम केला जातो. याचाच विरोधाभास इस्राएल मध्ये पाहायला मिळतो. शेतीतील ९०% कामेही मशीन्स आणि रोबोट्सच्या मदतीने केली जातात. यामुळे वेळ आणि पैसा दोघांची बचत होते.
कृषिक्षेत्राला जोड म्हणून येथे पशुपालन केले जाते. इस्रायलची दूध उत्पादकता जगात सर्वोच्च आहे. येथील गाय एका वेतामागे 11 हजार लिटर दूध देते. आपल्याकडे 3 हजार लिटर! उच्च संशोधनातून हे शक्य झाले आहे. येथे एकाच वेळी १०० ते १००० गायींचे पालन अगदी सहज पद्धतीने केले जाते. आणि ते ही कमी खर्च व अल्पशा मनुष्यबळ वापरून. शेती आणि पशुपालनाच्या जोरावर Israel Agriculture क्षेत्रात संजीवनीचे काम करतो आहे.
अश्या प्रकारे आपल्याला आलेल्या संकटांकडे एक आव्हान म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन इस्राएल संपूर्ण जगाला आपल्या कार्यातून दाखऊन देत आहे. भारतातील शेतकऱ्यांनीही ह्यातून बोध घेत शेतीमध्ये आवश्यक बदल नक्कीच करायला हवे. यातूनच भारतामध्ये दुसरी हरितक्रांती उदयास येईल. कारण जर इस्राएल सारखा देश करून दाखवू शकत असेल तर मग आपण का नाही?

FOR YOU