” आयझॅक न्यूटन आणि संत ज्ञानेश्वर महाराज “

Share


भारताने जगाला अनेको गोष्टी दिल्या त्यातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे अध्यात्म. हो, अध्यात्म हे असं रत्न आहे ज्याची तुलना जगात काय तर ब्रह्मांडात कुठल्या वस्तूशी होऊ शकत नाही. हे समजण्यासाठी आपण फक्त आपला भारताच नाही तर इतर देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. आधी पासूनच असं मत आहे कि, भारत तसा विज्ञानाच्या बाबतीत फार पिछाडलेला देश मग त्यासाठी कारणं अनेक आहेत (परकीयांचे आपल्या देशावरील आक्रमण मग त्यासाठी भारतीयांच्या विनम्रपणालाच सारा दोष देणं योग्य नाही, तर आपसात असणारी फूट, एकमेकांवरचा अविश्वास आणि दुसऱ्यांच्या गोष्टीबद्दलचं आकर्षण, आकर्षणाचं नाही तर त्यांचं ते श्रेष्ठ आणि आपला कनिष्ट हे गैरसमज करून घेण्याची वृत्ती, हे असे अनेक मुद्दे पाहावे लागतील.
जास्त दूर न जाता या अध्यात्माची आयुष्यातील भूमिका हि विज्ञानापेक्षा जास्त मोठी आहे हे सांगण्यासाठी एक उदाहरण पुरेसं आहे, ते म्हणजे “आयझॅक नूटन”, ज्याने सोळावे आणि सतरावे शतक आपल्या संशोधनानी गाजवले, ज्याने असे काही शोध लावले ज्या शोधांमुळे लोकांनां वाटू लागला कि या दृश्य जगात जे काही जाणून घ्यायचं आहे ते जाणून झालं, आता काय उरलं आहे नवीन शोधण्यासारखं? अगदी ग्रहताऱ्यांच्या वेगापासून पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीच्या वेगा पर्यंत; ते त्या वास्तूच्या भविष्यातील स्थितीच्या अनुमाना पर्यंत न्यूटनने अनेक तर्क लावले आणि तसे सिध्दांत मांडले, अनेक पुस्तकेही लिहिली. पहिल्यांदा ‘ सर ‘ हि पदवी मिळवलेला त्या काळातील एक ‘ सेलिब्रेटी श्रीमंत शास्त्रज्ञ ‘ म्हणजे ‘आयझॅक नूटन’. भौतिकशास्त्र आणि गणितातच नाही तर राजकारणातही मुद्सद्दी असलेला नूटन स्वतःच्या खऱ्या असयुष्यात मात्र तितकाच दुःखी, अभिमानी आणि चिंतेने व्यापलेला असायचा. असंही म्हणतात कि, आपला प्रत्येक नवीन शोध न्यूटन लपवून ठेवायचा आणि काही काळाने आपलं संशोधन प्रसिद्ध करायचा. सतर्क असूकरक्षिततेच्या भावनेने ग्रस्त असायचा.
विज्ञानाच्या या युगाचा पाया ज्याने रचला तो आयझॅक न्यूटन खऱ्या आयुष्यात स्वतःला तितकाच अपूर्ण समजायचा. सामाजिक पत, श्रीमंती आणि विशेषतः विज्ञान यांचा बादशहा असूनही तो लाचार होता. (न्यूटन प्रेमींना असं वाचून वाईट वाटू शकतं पण इथे चर्चा होते आहे ती स्वभावाची म्हणजे मानसिक स्थितीची आणि मग बौद्धिक स्थितीची, आणि आपण हे मोठ्या मानाने मान्य केला पाहिजे कि हुशारी हा बुद्धीचा गुण आहे आणि समाधान हि मनाची समृद्धी आहे)
आता दुसऱ्या अंगाचं उदाहरण म्हणजे ‘ संत ज्ञानेश्वर महाराज ‘ (माझं हे उदाहरण कदाचित एखाद्या वारकरी व्यक्तीला चुकीचं वाटू शकतं कि, ” का आमच्या माऊलींची तुलना अशी कोणाबरही करायची?”, तर याचं उत्तर आहे जर माउलींनी चर अचारांचा अभ्यास मांडून साऱ्या भिंती तोडून विज्ञान मांडला आहे तर ते विज्ञान पाहण्यासाठी आपल्यालाही देशाच्या (सीमा ) भिंती ओलांडून बाहेर जावं लागेल, ‘ प्रकाशाची किंमत ठरवण्यासाठी, एकदातरी अंधाराच्या गावी फेरफटका मारावा लागेल ‘). ज्ञानेश्वरांना मिळालेल्या ‘ माउली ‘ या उक्तीवरूनच त्यांच्या कारुण्याची, व्यापकतेची, उदारतेची, ममतेची आणि प्रेमाची आपल्याला कल्पना येते. पण या अलौकिक ज्ञानी माणसाच्या ज्ञानाची कक्षा आपल्या बिद्धीच्या व्यासात मावत नाही.
विश्वाला करुणेचा संदेश देणारे, विनम्रतेचा संदेश देणारे. जेव्हा या विश्वाच्या गूढतेचा उलगडा करायला बसतात तेव्हा अचंबित करणारे सिद्धांत आपल्या समोर मांडतात (अनेक पुरोगामी लोक आत्ताही, महाराष्ट्रात किंबहुना भारतात असे आहेत जे म्हणतात कि, ‘ हि अध्यात्मिक लोकं ना उगाच आपल्या संतांचा गवगवा करतात जर यांच्या संतांनी सगळं आधीच सांगितलं असतं तर विज्ञान कुठच्या कुठे गेलं असतं, त्यांना एकंच बोलावसं वाटेल कि न्यूटनला थोर शास्त्रज्ञ मानता आपण, पण त्याने तरी कुठं जगातील सारी रहस्य शोधली ? पण त्याने गतीचा नियम दिला ज्याचा वापर करून आपण पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीची गती मोजू शकतो अगदी तसंच ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपल्याला भौतिक जगाकडे आणि आंतरीक जगाकडे बघण्याची दृष्टी दिली. बीज हे लहानच असतं, मोठा व्याप असतो तो वृक्षाचा, मग जर वृक्ष दिसतो आहे तर नक्कीच बीज तर असणारच ना. म्हणूनच, मानो या ना मानो अपना बाप तो वही है, (कडक भाषेसाठी श्यमा)).
असं म्हणतात कि सूर्य स्थीर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते आहे, या वास्तवाचा शोध वैज्ञानिक कोपर्निकस यांनी लावला पण ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ‘ भावार्थ दीपिका ‘ या ग्रंथात हे आधीच (बाराशेच्या शतकात) सांगितलं आहे कि,
उदय-अस्ताचे प्रमाणे |जैसे न चालता सूर्याचे चालणे |तैसे नैष्कर्म्यत्व जाणे | कर्मींचि असता ||
म्हणजे जीवाचे अकर्ते पण हे त्या सूर्या प्रमाणे आहे म्हणजे हलणारी पृथ्वी आहे सूर्य नाही. अध्यात्मिक सिद्धांत सांगत असताना संत ज्ञानेश्वर सहज (सो कॉल्ड ) विज्ञानाचे दृष्टांत देतात, असे अनेक दृष्टांत आहेत (खाली त्यातील काही दृष्टात ओवीं आणि अर्थ सह दिली आहे )
अध्यात्माचे जगाला अनेक सिद्धांत देणाऱ्या या महापुरुषाने नकळत विज्ञानाचे अनेक नियम सांगून टाकले. कधी कधी असं वाटतं कि संत ज्ञानेश्वरांनी जर ठरवलं असतं तर अनेक रिसर्च आर्टिकल लिहून ठेवले असते पण त्यांना कदाचित असं वाटलं असावं कि ” हे असे भौतिक जगाचं ज्ञान सांगणारे रिसर्च आर्टिकल कदाचित मानवाचं आयुष्य बाह्य अंगाने विकसित करतील पण समाधान, शांती आणि ‘मी’ ची ओळख होण्यासाठी गरज आहे ती आत्मिक ज्ञानाची, आंतरिक ज्ञानाची, अध्यात्माची….!”
आणि जर विज्ञानाच्याच भाषेत सांगायचं झालं तर ‘ मी म्हणतेय म्हणून, कोणी ज्ञानी, प्रसिद्ध व्यक्ती म्हणतेय म्हणून नाही तर स्वतः आपल्या आयुष्यच निरीक्षण, परीक्षण या संसाराच्या प्रयोग शाळेत करून पहा, मगच अध्यात्माची खरी गणित आणि त्याची रासायनिक क्रिया आपल्या लक्षात येईल, You analyse and decide, Do not listen to others, not even to saints, unless and until you get agree with them..!! ‘.
विज्ञान आणि अध्यात्म हे तोलून त्यातील कोणती गोष्ट महत्वाची आणि कोणती गौण हे ठरवत बसण्यात काहीच अर्थ नाही कारण, अध्यात्माला सिद्ध करण्यासाठी विज्ञानाच्या पाठीवर बसावं लागेल आणि विज्ञानाच्या अभ्यासातून मिळणाऱ्या सुखसोयी मिळाल्या नंतर आयुष्य परिपूर्ण करण्यासाठी अंतर मनात डोकावून पाहावं लागेल. कारण बाहेर असणाऱ्या सुखाचा शोध कुठपर्यंत घेत फिरणार (?), जो पर्यंत ‘मी’ चा शोध लागत नाही तोपर्यंत प्रत्येक शोध हा अपूर्णच, म्हणूनच कदाचित न्यूटन त्याच्या अखेरच्या काळात म्हणतो कि, ” एवढे शोध लावून झाल्यानंतरही हा निसर्ग माझ्यापुढे आ वासून उभा राहतो आणि मी किती गौण आहे हे सांगतो…!!”

 • डॉ. निलम पाचुपते
  भावार्थ दीपिकेतील (ज्ञानेश्वरीतील) काही उदाहरणे
  (1) पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा |तरी हा भूगोलचि काखे सुवावा |तैसा विस्तारू माझा पाहावा | तरी जाणावे माते ||
  भूगोल या शब्दाचा उल्लेख भावार्थ दीपिकेमध्ये आहे. आणि पृथ्वी गोल असल्याचे निःसंदिग्ध सांगताना परमाणूचाही Micro-Electron स्पष्ट उल्लेख केलाय.
  (2) तया उदकाचेनि आवेशे | प्रगटले तेज लखलखीत दिसे | मग तया विजेमाजी असे | सलील कायी ||
  पाण्यापासून निर्माण होणाऱ्या विजेचा उल्लेख माउली करत आहेत
  (3) मी सूर्याचेनि वेषे | तपे तै हे शोषे | पाठी इंद्र होवोनि वर्षे | मग पुढती भरे ||
  सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलिकडे शोधून काढली आहे. परंतु माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की, सुर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो व इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो.