sm logo new

JAMES BOND ऑफ इंडिया…

Share

Latest

National security agency चे अजित डोवाल हे एक नाव तुम्ही सतत वर्तमानपत्रातील हेडलाईन्स मध्ये वाचत असतात.
2016 च्या सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 एअर स्ट्राइक ऑपरेशन्समागील मुख्य व्यक्ती. त्‍यांच्‍या अभूतपूर्व कार्यामुळे त्‍यांना ‘भारताचा जेम्स बाँड’ असे ही संबोधले जाते.

प्रारंभिक जीवन

अजित कुमार डोवाल यांचा जन्म 20 जानेवारी 1945 रोजी उत्तराखंडमधील पौरी गावात झाला. त्यांचे वडील भारतीय लष्कराचे अधिकारी होते. सन 1968 मध्ये ते civil service परीक्षा उत्तीर्ण झाले आणि केरळ केडरचे IPS अधिकारी बनले.1972 मध्ये इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये सामील होऊन, तीन दशकांहून अधिक काळ ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कार्यरत राहिले. या नंतर त्यांनी northeast भागात अनेक वर्षे गुप्तहेर म्हणून काम केले. त्याच वेळी, बंडखोरांची माहिती गोळा करण्यासाठी डोवाल यांनी म्यानमार आणि चीनमध्येही सक्रिय काम केले होते.
ईशान्येत, अजित डोवाल यांचे सर्वात मोठे यश म्हणजे त्यांनी लालडेंगाच्या 7 पैकी 6 कॉम्रेड्सवर विजय मिळवून शांतता प्रस्थापित करण्यास मदत केली.

सन्मानित करण्यात येणारा सर्वात तरुण अधिकारी

उत्कृष्ट सेवेसाठी भारतीय पोलीस पदक जिंकणारे अजित डोवाल हे सर्वात तरुण पोलीस अधिकारी ठरले. खरतर निकषानुसार या पदकासाठी सेवेचा अनुभव हा 17 वर्षांचा असावा लागतो परंतु त्यांना केवळ 6 वर्षांच्या सेवेनंतर या पदकाने सन्मानित करण्यात आले, 1988 मध्ये कीर्ती चक्राने सन्मानित होणारे अजित डोवाल हे पहिले पोलीस कर्मचारी आहेत.

Operation ब्लू स्टार…

भारतीय सैन्यासोबत पंजाब मध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांना सुवर्ण मंदिरातून बाहेर काढण्यास मदत करताना डोवाल यांनी 1984 मध्ये लष्कराच्या ऑपरेशन ब्लू स्टारसाठी काम केले. महत्त्वाची गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी ते रिक्षाचालक असल्याचे भासवत सुवर्ण मंदिराच्या आत बाहेर फिरत होते.

पाकिस्तानातील गुप्तहेर

डोवाल यांनी पाकिस्तानमध्ये गुप्तपणे मुस्लीम वेश करून सात वर्षे घालवली आणि देशात सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांची अमूल्य माहिती गोळा केली.
या हेरगिरी दरम्यान एक प्रसंग कथन करताना ते सांगतात –
एकदा एका माणसाने त्यांना सांगितले की ते हिंदू आहे, यावर नकार देत मी मुस्लिम असल्याचे डोवाल म्हणाले. यावर तो माणूस म्हणाला, तुमच्या कान टोचले आहेत जे हिंदू पसंत करतात. तो माणूसही हिंदू होता आणि त्याने डोवाल यांना प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता जी त्यांनी नंतर केली.

विमान अपहरण रोखले

कंदहारला नेलेल्या फ्लाइट IC-814 मधील प्रवाशांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करण्यात डोवाल यांचा सहभाग होता. बातम्यांनुसार, 1971 ते 1999 दरम्यान, डोवाल यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानांचे किमान 15 अपहरण यशस्वीपणे हाताळले होते.

इराकमधून परिचारिकांची सुटका…

2014 मध्ये ISIS च्या उदयामुळे इराकमध्ये प्रचंड अराजकता निर्माण झाली. त्यादरम्यान, डोवाल यांनी तिक्रित, इराकमध्ये अडकलेल्या 46 भारतीय परिचारिकांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणले. बातम्यांनुसार, डोवाल यांनी 2014 मध्ये स्वतः इराकला जाऊन परिस्थिती समजून घेत परिचारिकांच्या सुटकेसाठी इराकी सरकारशी वाटाघाटी केली होती.

Outlook

Man behind सर्जिकल स्ट्राइक…

डोवाल यांची 2014 मध्ये NSA म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2015 मध्ये म्यानमार आणि 2016 मध्ये पाकिस्तानमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या यशस्वी अंमलबजावणीचे श्रेय त्यांना जाते. 2017 मध्ये चीनसोबत डोकलाम मधील वाद संपवण्यातही त्यांनी मदत केली. 2019 मध्ये बालाकोटमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने केलेल्या हवाई हल्या मागेही डोवाल यांचाच हात होता.

भारतमातेच्या सेवेत सदैव तत्पर असणाऱ्या अजित डोवाल यांच्या अश्याच अनेक उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना भरते James Bond म्हणून संबोधणे तर वावगं ठरणार नाही.

FOR YOU