sm logo new

NASA च्या “James Webb” ची अंतराळ सफर…

james webb space telescope_social mirror
james webb space telescope_social mirror

Share

Latest

अमेरिकेच्या NASA SPACE Agency ने नुकतेच अंतराळ दुर्बीण (Space Telescope) James Web द्वारे घेतली गेलेली ४ छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

ABC News

James Webb ने घेतलेली पहिली प्रतिमा पूर्वी हबल दुर्बिणीने घेतलेल्या SMACS 0723 ची छायाचित्र आहे. James Webb टेलिस्कोपच्या इन्फ्रारेड कॅमेराने दूरच्या आकाशगंगा तीव्र फोकसमध्ये आणल्या आहेत, ज्यामुळे ताऱ्यांचा समूह आणि डिफ्यूज वैशिष्ट्यांसह, पूर्वी कधीही न पाहिलेल्या लहान, अस्पष्ट संरचना दिसू लागल्या आहेत. चित्रात दिसणारी आकाशगंगा ही BigBang नंतर केवळ एक अब्ज वर्षांनंतरची आहे.

Wikipedia

दुसरे छायाचित्र हे साऊथ रिंग नेब्युला ची प्रतिमा आहे, जो एका नष्ट होत असलेल्या ताऱ्याभोवती तयार झाला आहे. चित्राच्या केंद्रस्थानी दोन तारे आहेत. तारा नष्ट होतं असताना तो स्वतः मध्ये सामावलेली धूळ आणि वायू बाहेर टाकत असतो. जे एकत्रितपणे त्या ताऱ्याच्या भोवती गोळा होतात ज्यालाच नेब्युला असेही म्हंटल जात.

AnnesAstronomy News

तिसरे छायाचित्र हे Stephan’s Quintet चे आहे जे एखाद्या अंतराळ दुर्बिणीने घेतलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे छायाचित्र आहे. Stephan’s Quintet हे ५ आकाशगंगांचा एकत्रित समूह आहे. खरतर ह्या सर्व घटना आणि गोष्टी आपल्या पासून खूप लांब अंतरावर घडत आहेत. परंतु James webb सारख्या अत्याधुनिक दुर्बिणीमुळे एवढ्या दूरवर होणाऱ्या कॉस्मिक घटना आपण अगदी स्पष्टपणे पाहू शकतो.
जरी या आकाशगंगा ५ एकत्रित दिसत असल्या तरी, केवळ चार आकाशगंगा एकमेकांच्या जवळ आहेत. सर्वात डावीकडील आकाशगंगा ही इतर चार पासून लांब आहे व पृथ्वीपासून सुमारे 40 दशलक्ष प्रकाश-वर्षे दूर आहे तर इतर चार सुमारे 290 दशलक्ष प्रकाश-वर्षे दूर आहेत.

flickr

NASA द्वारे जारी केलेले चौथे चित्र हे NGC 3324 नावाच्या Carina Nebula ची आहे. ज्या मध्ये तारा जन्म घेत असतानाची त्याची स्तिथी आणि त्यावेळी असणाऱ्या भौतिक परिस्थिती दर्शवित आहे. आणि

NASA

पाचव्या चित्रात एक graph द्वारे सूर्यासारख्या दूरवर फिरणाऱ्या उष्ण महाकाय ग्रहाच्या सभोवतालच्या वातावरणात ढग, धुके आणि पाणी असल्याचे पुराव्यासह दर्शवले आहे.

परंतु ही चर्चेत असलेली James web दुर्बीण आहे तरी काय?

NASA चे प्रशासक जेम्स वेब ज्यांनी अपोलो मिशनचे नेतृत्व केले होते त्यांच्या नावाने हा टेलिस्कोप ओळखला जातो. NASA ने २४ डिसेंबर २०२१ ला अंतराळात आपले James Web नावाची अंतराळ दुर्मीन ५ रॉकेट्सच्या मदतीने लाँच केली. जी याआधी कार्यरत असणाऱ्या Nasa च्या हबल दुर्बिणी ऐवजी काम करत आहे. ३० दिवसाच्या प्रवासानंतर पृथ्वीपासून १.५ दशलक्ष km वर आपल्या निश्चित जागेवर james web स्थित झाला आहे.

हबलच्या तुलनेत अधिक कार्यक्षम असलेली James Webb अंतराळ दुर्बीण ही इन्फ्रारेड किरणांच्या मदतीने छायाचित्रे कैद करते. यामुळे आता पृथ्वीपासून दूरवर असणारे ग्रह , तारे, असंख्य आकाशगंगांचा अभ्यास करणे मानवासाठी सोपे होत आहे. यामुळे मानवाने मनाशी ठरवले तर काहीही अशक्य नाही! असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

FOR YOU