मित्रांनो, जगाच्या इतिहासात महान नेते आणि त्यांच्या खुलेआम हत्येच्या कहाण्या सर्वश्रुत आहेत. त्यातली एक म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी (JFK) यांची हत्या. आपला आजचा सिनेमा याच हत्येचं गूढ सांगणारा आणि सत्या समोर कोणी मोठं नसत हेच दाखवून देणारा आहे.
चित्रपट सुरु होतो एक शॉर्ट स्टोरी किंवा बातमीने जी अमेरिकी इलेक्शन बद्दल आहे. रिचर्ड गिब्सन यांना पराभूत करून JFK ( जॉन एफ केनेडी) अगदी थोड़क्यात जिंकले आहेत. ही वेळ आहे जानेवारी १९६१ आणि २ वर्षांनी नोव्हेंबर १९६३ मध्ये टेक्सास येथे J F K यांचा खून होतो. जिम गॅरीसन( Garrison ) आणि टीम या केसचा तपास करत असतात आणि यामधे ते डेव्हिड फेरी जो प्रायव्हेट पायलट आहे याची आणि इतर लोकांची चौकशी करतात. परंतु राजकीय दबाव ही केस बंद पाडतो आणि या केस मध्ये Li Oswald ला अटक होते. पुढे जाऊन जॅक रुबी नावाचा माणूस ली (Lee) चा सुद्धा खून करून टाकतो. विशेष म्हणजे हे सगळं अगदी खुलेआम घडत असतं.
१९६६ मध्ये ही केस पुन्हा ओपन होते कारण वॉरन रिपोर्ट, ज्यामधे या केसच्या बाबतीत लिहिलेलं आहे आणि तो चुकीचा आहे आणि ही हत्या दिसते तितकी सरळ नाही अस गॅरीसनला वाटतं. तपास पुन्हा सुरू होतो आणि ज्या लोकांचा संबंध फेरी, Oswald आणि रुबी यांच्याशी असतो या सर्वांची चौकशी होते. यामधे एक व्यक्ती असते “विले ओकफी” जो एक “पुरुष वैश्य” असतो. विले हा पाच वर्ष जेल मध्ये असतो आणि त्याचा संबंध Oswald आणि “क्ले बर्ट्रांड” यांच्याशी आलेला असतो.
गॅरीसन ची टीम जेव्हा जिन हीलची ( जी या घटनेची साक्षीदार आहे) चौकशी करते तेव्हा ती सांगते, की गोळीबार हा एका गार्डन मधून झालेला. परंतु मी जेव्हा हे सुरुवातीला सांगितलं तेव्हा माझ्यावर दबाव टाकण्यात आला आणि माझा जवाब वॉरन कमिशन मध्ये बदलला गेला. Oswald ला जेव्हा अटक झाली तेव्हा त्याने ज्या बिल्डिंग मधून गोळी झाडली त्या बिल्डिंग मध्ये गॅरीसन ची टीम जाते. तिथे ते पुन्हा त्या घटनेचं नाट्य रूपांतर करून पाहतात. त्यांना लक्षात येत की, Oswald साठी इतका अचूक मारा करणं आणि तोही इतक्या लांबून करणं हे शक्यच नाही. गोळी ही दुसऱ्या किंवा अनेक जागांवरून मारली गेली आहे हे त्यांना समजत.
१९६८ मध्ये गॅरीसनला एक व्यक्ती भेटते जी स्वतःची ओळख “एक्स” अशी सांगतो. हा एक्स त्याला सांगतो की,” या हत्येमागे कोणी एक व्यक्ती नाहीये तर सगळे जण आहेत. अमेरिकेची गुप्तहेर संघटना (CIA) , FBI, underworld पासून केनेडी सरकार मध्ये असलेले उप राष्ट्राध्यक्ष आणि आताचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन. प्रश्न हा नाहीये कोणी केनेडी यांना मारलं परंतु त्यांना का मारण्यात आल? ज्या दिवशी हत्या झाली त्याच वेळी किंबहुना त्या आधीच न्यूझीलंडच्या एका वर्तमापत्राद्वारे केनेडी यांची हत्या झाल्याचं कसं सांगण्यात आलं? या लोकांचा त्यात काय फायदा आहे? तो पुढे सांगतो की, केनेडी यांना मारण्यात आल कारण ते अमेरिकी सैन्याला व्हिएतनाम युद्धातून बाहेर काढण्याचे ठरवत होते. “एक्स” गॅरीसनला सांगतो की तू केसच्या खुप जवळ आहेस. तू “क्ले शॉ” या बिजनेसमनची चौकशी कर. त्याचा या हत्येशी खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा शॉ ची चौकशी केली जाते तेव्हा तो oswald, फेरी आणि ओ केफी यांना कधी भेटलो नसल्याचं सांगतो. परंतु त्याच्यावर केनेडी यांचा खून केल्या प्रकरणी केस केली जाते.
या सगळ्या घटनांचा परिणाम गॅरीसनच्या फॅमिली वर होतच असतो त्यात त्याचे काही सहकारी त्याच्या तपास प्रक्रियेवर संशय घेऊ लागतात. त्याच्या घरी निनावी कॉल येतात आणि त्याची बायको लिझ ही सुद्धा नाराज होते. ती म्हणते की, तू शॉ वर यामुळे संशय घेतोय कारण तो समलैंगिक आहे. मीडिया आणि सर्व गॅरीसनच्या बाबतीत छापून त्याच्या मागेच लागतात. यामुळे जे काही साक्षीदार असतात ते घाबरतात आणि केस मधून काढता पाय घेऊ लागतात. फेरी जो साक्ष द्यायला तयार झालेला असतो त्याचा खून होतो.
१९६९ मध्ये शॉ विरुद्ध खटला सुरू होतो. गॅरीसन हे कोर्टात पटवून देतो. ज्या बिल्डिंग मधून केनेडी यांच्यावर गोळीबार झाला त्याचा पूर्ण पुरावा तो देतो आणि हे ही सांगतो की ते का शक्य नव्हतं. Oswald ज्याला अटक झाली आणि नंतर त्याचा खून केला गेला त्याला फक्त यात फसवल गेल होत. गोळी ही बिल्डिंग मधून मारली गेली नव्हती. एवढं होवूनही शॉ ला पुराव्या अभावी सोडण्यात येत.नंतर १९७४ मध्ये, शॉ Lungs cancer या आजाराने मरण पावतो. १९७९ मध्ये रिचर्ड हेलम साक्ष देतो की, शॉ चा संबंध CIA बरोबर होता आणि या हत्येमध्ये सुद्धा त्याचा हात होता. या खटल्या संबंधीत माहिती ही २०२९ मध्ये प्रसिद्ध करण्यात यावी अशी ऑर्डर मिळते आणि खटला थांबतो.
मित्रानो, राजकारण, हे जिथे आपला विचार थांबतो त्याच्या पुढे सुरू होत असत. केनेडी हे अमेरीकचे सर्वात लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष होते. हा चित्रपट संपतो तेव्हा गॅरीसन आपल्या बायको आणि मुलासोबत कोर्टातून निघून जातो पण आपल्या डोक्यातून नाही. केनेडी यांची हत्या हा एका विचाराचा अंत होता. मन हेलावून टाकणारा हा सिनेमा पहाच कारण राजकारण ही किती मोठी दलदल आहे हे नक्की लक्षात येत.
JFK तुम्ही पाहू शकाल Amazon Prime वर.