sm logo new

दिशाहीन संगतीत भरकटणारी पिढी…..

Share

Latest

भर दुपारची वेळ. मी नेहमीच्या घाईतच रस्त्याने जात होते .रस्ता जणू नदीला पूर जसा येतो ,तसा गर्दीने ओसंडून वाहत होता. हॉर्नचे कर्कश्य आवाज, वाहनांचे आवाज ,लोकांची बडबड ,सगळं कानावर अक्षरशः आदळत होतं .बोलणं कानावर पडतच पण त्यात लक्षात राहण्यासारखं नसतं. नेहमीचच सगळ असच म्हणून दुर्लक्षं करत मार्ग काढत जात होते.
अचानक खाडकन मुस्काटात मारल्याचा आवाज आला ,म्हणून वळून पाहिलं तर ,साधारण पंधरा सोळा वर्षाच्या मुलीला वीस-बावीशी तला मुलगा कानशिलात लगावून धमकावत होता .त्याचे शब्द कानात शिशे ओतल्यासारखे तप्त वाटत होते. ” मेरे से ब्रेकअप करके किसके साथ जाने का है रे ?❌❌❌ अगर गयी तो देख मेरे से बुरा कोई नहीं होगा.”अस शिव्या देत धमकावत होता मी क्षणभर थिजूनच गेले .मला वाटलं ती मुलगी तरी मदत मागेल, आजूबाजूला इतके लोक आहेत. आम्ही नक्कीच तिला मदत करू. त्या मवाल्याला धडा शिकवू .पण तो विचार माझ्या मनातच राहिला . क्षणातच ती मुलगी स्वतःचाच मोठा अपराध असल्यासारखी त्याच्या मागोमाग चालू लागली .कशामुळे एवढी हतबल झाली ती?मार खाऊनही काहीही विरोध न करता अशी हिप्नाॅटिझ झाल्यासारखी कशी गेली ती?
नक्की कुठली संस्कृती मूळ धरू पाहत आहे ?की ,सुसंस्कारीत असलेली आपलीच संस्कृती मुळासकट उपटून कोणीतरी बाजूला करत आहे का? असे असंख्य प्रश्न माझ्या डोक्यात फेर धरू लागले.
अचानक वीज चमकावी तसं “लव्ह जिहाद “हे नुकतंच वाचलेलं प्रकरण आठवल.झंजावातासारखं हे वादळ आपल्या सभोवती तर आल नाही ना.?अशी भितीची लहर मनात उमटून गेली. आपल्या आजूबाजूलाच गुन्ह्याची पाळंमुळं रुजली जातात, थोडसं दुर्लक्ष केलं की त्याचं पीक वाढत जातं .खरोखर आपण सर्वांनीच सजग असणं किती गरजेचं आहे .ज्या वयात मुला मुलींनी शिक्षण घ्यायचं, करिअरच्या बाबत बोलायचं ,त्या वयात ब्रेकअप व रिलेशनशिप याचीच चर्चा त्यांच्या वर्तुळात जास्त ऐकू येते. कुठून आलं हे खुळ ???…..प्रेम विवाह आपल्या समाजाला नविन गोष्ट नाही . पण अजाणत्या वयात वाहवत जाणं आणि कोणताही विचार न करता आयुष्याचा सत्यानाश ओढवून घेणं.याला कुठेतरी लगाम असावा ना?

वाढत चाललेलं हे बेशिस्तीचं,बेलगाम वातावरण फक्त या वयापुरतच मर्यादित नाही .लॉकडाऊन नंतर शाळेतल्या अनेक लहान मुलांवर ही असाच काहीसा परिणाम दिसून येतो. सहज खेळता खेळता काही मुले सर्रास शिव्यांचा वापर करू लागली आहेत .बरं हे कोणी शाळेत शिकवत नाही की आई वडीलही नाही शिकवत. मग मुले हे सर्व कुठे शिकतात ?जे कानावर पडतं तेच तर लहान मुलं बोलतात. त्यांना कुठे समज असते चांगल्या वाईटाची .मोठी माणसे देतात, बोलतात म्हणून तेही तेच शब्द बोलतात .या वयातल्या पिढीला सद्गुणाच बाळकडू देण्याला व अपप्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी, शिक्षक, शाळा ,पालक वर्गालाच मोठं काम करावं लागणार आहे. आई-वडिलांची घारीसारखी नजर जर आपल्या मुलांवर असेल ,तर काय बिशाद आहे त्यांचं वाकडं पाऊल पडण्याची ; त्यांना कोणी वाईट वळण लावण्याची आपल्या मुला मुलींचे मित्र मैत्रिणी कोण आहेत ?कुठे राहतात? त्यांच्या सवयी ,कुटुंब यांची माहिती पालकांनी सहज व सतत चौकशी करून माहित करून घ्यायला हवी. कारण आपण पालक मित्रत्वाने व खेळी मिळणे आपल्या मुलांशी बोललो ,तर ती मुले सर्वात आधी प्रत्येक गोष्ट आपल्याशीच शेअर करतील हे नक्की .आईने मुलीची मैत्रीण झालं व बाबा ने मित्र झालं तर “लव्ह जिहाद”ची बळी कोणतीच मुलगी कधीच पडणार नाही. कोणत्याही कुसंगतीत मुले वाहवत जाणार नाहीत .आपली जडणघडण कुटुंब व समाज यानुसार होत असते. आपल्या आजूबाजूचा परिसर व समाजाचा आपल्या जडणघडणीत मोलाचा वाटा असतो .अर्थातच संगतीचा परिणाम हा व्यक्तिमत्त्वावर नक्कीच होतो .मग संगत जर चांगली असेल तर नक्कीच मुलांना चांगली प्रेरणा मिळते . नसेल तर एक कुसंगत जीवन उध्वस्त करायला कारणीभूत होऊ शकते .वेळीच सावध होऊन आपण आपल्या मुला मुलींचे फक्त पालकच नाही ,तर रक्षकही होऊया. “घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी”. अशी घारीची नजर आपल्या मुलांवर ठेवण्याची आज गरज आहे .पूर्ण समज येईपर्यंत या संवेदनशील वयामध्ये ही अबोध मुले स्वतः सक्षम होऊन या जगामध्ये समर्थपणे वावरण्यासाठी पाऊल टाकणार आहेत .तोपर्यंत त्यांना सांभाळायची गरज आहे…….

लीना आढळराव तांबे

FOR YOU