sm logo new

पासवर्डलेस भविष्याकडे वाटचाल…

social mirror passwordless technology
social mirror passwordless technology

Share

Latest

तुम्ही कधी तुमच्या facebook अकाउंट किंवा तुमच्या gmail अकाउंटचा पासवर्ड विसरला आहेत का? दररोज डझनभर वेगवेगळ्या ऑनलाइन अकाउंट्ससाठी रोज एक नवीन आणि वेगळा पासवर्ड तयार करत असतो. पण हे सर्व पासवर्ड्स लक्षात ठेवणे एक कठीण काम आहे. परंतु जर प्रत्येकवेळी हा पासवर्ड टाकण्याची गरज पडली नाही तर?

होय, हे शक्य आहे. टेकमधील काही मोठ्या कंपनी सांगतात की पासवर्ड-लेस भविष्य आता शक्य आहे. FIDO Alliance आणि World Wide Web Consortium द्वारे तयार केलेल्या पासवर्ड-लेस साइन-इन मानांकनासाठी Microsoft, Apple आणि Google ने भागीदारी केली आहे. FIDO, “फास्ट आयडेंटिटी ऑनलाइन” ही एक खुली इंडस्ट्री असोसिएशन आहे जी “जगातील पासवर्डवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करते.”

Secure Drives

हे नवीन तंत्रज्ञान कसे काम करेल?

FIDO च्या मते ही नवीन मानांकन वेबसाइट्स आणि अॅप्सना डिव्हाइस आणि प्लॅटफॉर्मवरील सर्व वापरकर्त्यांना सुरक्षित आणि पासवर्ड-लेस साइन इन ऑफर करण्यास अनुमती देईल, असे असोसिएशनने एका प्रकाशनात म्हटले आहे. पासकीज म्हणून ओळखल्या जाणार्‍या मल्टी-डिव्हाइस FIDO credentials वापरकर्त्यांना त्यांचे फेस आयडी, फिंगरप्रिंट्स किंवा डिव्हाइस पिन वापरून साइन इन करण्यास अनुमती असेल, असे मायक्रोसॉफ्टचे VP Vasu Jakkal यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले.
वापरकर्ते त्यांचे FIDO साइन-इन credentials किंवा “पासकी” त्यांच्या कोणत्याही डिव्हाइसवर वापरू शकतात, प्रत्येक वेळी त्यांना नवीन अकाउंटसाठी पुन्हा पासवर्ड टाकण्याची गरज नसेल.
FIDO च्या म्हणण्यानुसार, वापरकर्ते OS किंवा ब्राउझर चालू असले तरीही, जवळजवळ कोणत्याही डिव्हाइस वरील अॅप किंवा वेबसाइटवर साइन इन करू शकतात.

ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा केला जाऊ शकतो?

उदाहरणार्थ, तुम्ही Apple डिव्हाइसवर पासकी वापरून Microsoft Windows वर चालणार्‍या Google Chrome ब्राउझरमध्येही साइन इन करू शकता. यापूर्वी, वापरकर्त्यांना पासवर्ड लेस फिचर वापरण्यापूर्वी प्रत्येक डिव्हाइससह प्रत्येक वेबसाइट किंवा ॲपमध्ये साइन इन करावे लागत असे.

पासवर्डपेक्षा अधिक सुरक्षित तंत्रज्ञान…

हे नवीन फिचर phishing पासून अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकेल आणि FIDO रिलीझनुसार, पासवर्ड आणि SMS वर पाठवलेल्या OTP तंत्रज्ञानाच्या तुलनेत साइन-इन अधिक सुरक्षित आहे. हे नवीन तंत्रज्ञान या वर्षभरात Apple, Google आणि Microsoft प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

FOR YOU