sm logo new

Nemo’s Garden- समुद्राच्या तळातील शेती…

social mirror Nemo's Garden
social mirror Nemo's Garden

Share

Latest

आपल्या पृथ्वीतलावरील जवळपास ७१% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे व उरलेले २९ % भूभाग आहे आणि त्यातही फक्त १७% जमिनीचा वापर हा शेती करण्यासाठी केला जातो. परंतु ही १७ % जमीन जगाच्या वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यास पुरेशी आहे का? तर नाही, मग आपल्याकडे असलेल्या ७१% पाण्याचा आपण शेती करण्यासाठी वापर केला तर?
Nemo’s garden, Italy देशात Noil समुद्र किनाऱ्याजवळ असलेले जगातील पहिले आणि एकमेव पाण्याखालील शेती आहे. येथे जवळपास शंभर प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींचे उत्पादन घेतले जाते आणि ते ही पाण्याखाली, होय बरोबर ऐकलत, २०१३ मध्ये एक प्रयोग म्हणून सुरु झालेली ही Ocean Reef Group ची पाण्याखालील शेती आता जगात चर्चेचा विषय ठरती आहे.
या प्रकल्पाचे उद्दिष्ट सुरुवातीला प्रोव्होकेशन देणारे होते, परंतु आता याचे रूपांतर एका महत्त्वाकांक्षी उद्देशात झाले आहे. जेथे पर्यावरण परिस्थितीमूळे किंवा आर्थिक कारणांमुळे ज्या ठिकाणी वनस्पतींची वाढ अत्यंत कठीण आहे अश्या क्षेत्रांसाठी शेतीची एक पर्यायी व्यवस्था तयार करणे आणि उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करणारी प्रणाली तयार करणे जसे की महासागर आणि इतर पाण्याचे स्रोत हे निमोज गार्डनचे उद्दिष्ट आहे.

Nemo’s GARDEN काय आहे?

NEMOS GARDEN या पाण्याखालील शेतात 6 हवेने भरलेले transparent plastic बायोस्फियर आहेत, ज्यांना साखळ्या आणि स्क्रूनच्या मदतीने समुद्राच्या तळाशी attached केले गेलेले आहे. सतत देखरेख ठेवण्यासाठी येथे प्रत्येक बायोस्फियर मध्ये CO2, O2, आर्द्रता, हवेचे तापमान आणि प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी वेगवेगळ्या सेन्सर्सने सुसज्ज आहेत.

नेमोस गार्डन मधील कामकाजावर देखरेख ठेवण्याची किनाऱ्यावर कंट्रोल टॉवर बांधलेला आहे. जे ultrasonic surface communication system ने पाण्याखाली कार्यरत असलेल्या डायव्हर्सच्या संपर्कात सतत राहण्यासाठी वापरले जाते. बायोस्फियर्समधील सूक्ष्म हवामान आणि थर्मल परिस्थिती वनस्पतींच्या वाढीसाठी आणि पीक उत्पादनासाठी ग्रीनहाऊस पेक्षा उत्तम आहेत तरीही येथे कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त ऊर्जा श्रोतांची गरज भासत नाही. हि पाण्याखालील शेती पूर्णतः इको-फ्रेंडली आहे आजूबाजूच्या सागरी वातावरणाशी कसलाही कॉन्टॅक्ट बायोस्फियर ठेवत नाही त्यामुळे सागरातील सजीवांना कोणताही प्रकारचा त्रास होत नाही.

जमिनीवरील शेतीची आव्हाने…

आजच्या विकसित जगात, वनस्पती प्रजनन, कीटकनाशके व रासायनिकखतांसारखी अनेक कृषी रसायने आणि तांत्रिक सुधारणांमुळे लागवडीतून उत्पन्नात झपाट्याने वाढ झाली आहे, परंतु त्याच वेळी पर्यावरणाचे नुकसान आणि मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे. हवामान बदलाच्या प्रभावांना सर्वाधिक संवेदनशील क्षेत्रांपैकी कृषी क्षेत्र आहे.

पाण्याखालील शेती कीटकनाशकांच्या समस्येला ओव्हरलॅप करू शकते. बायोस्फियरच्या आत तयार केलेले वातावरणात हे कीटकांच्या हल्ल्यापासून संरक्षित आहे. कंट्रोल वातावरणात वनस्पतींची पाण्याखाली वाढ होत असल्याने येते कीटकांचा प्रश्नच उरत नाही. कीटकनाशकांचा वापर न केल्याने व समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात नसल्याने सागरी वातावरणावरती कसलाच त्रास होत नाही. खतांबद्दल सांगायचे झाले तर, वास्तविकपणे नैसर्गिक उत्पादनापासून बनववलेले द्रवपदार्थ व वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या एक किंवा अधिक वनस्पती पोषक तत्वांचा पुरवठा विविध सब्सट्रेट्सवर किंवा हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे थेट वनस्पतींच्या मुळांना पुरवला जातो. याही पुढे जाऊन आता समुद्रात सापडणाऱ्या शेवाळापासून खत तयार करण्याचा प्रयज्ञ वैज्ञानिक करत आहेत. आता पर्यंत या शेतीचा वापर करून वेगवेगळ्या वनस्पती, भाज्या, बीन्स, स्ट्रॉबेरी, टोबॅको सारख्या १०० वनस्पतींचे उत्पादन घेतले गेले आहे. तथापि, नक्की अजून कशाचे उत्पादन घेऊ शकतो यावरती संशोधन चालू आहे. पाण्याखालील शेतीसाठी योग्य भाज्यांच्या प्रकारासाठी पुढील संशोधन केले जात आहे. पाण्याखालील शेताला केवळ वनस्पतींच्या वाढीसाठी बाह्य स्रोताची गरज असल्याने, ही प्रणाली उपलब्ध पाण्यापासून (म्हणजे, समुद्र, तलाव, जलचर इ.) दूर असलेल्या ठिकाणांसाठी ही उपयुक्त ठरू शकते.

बायोस्फीअरमधील वातावरण निर्मिती…

बायोस्फीअरमध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी देणारे महत्त्वाचे घटक म्हणजेच तापमान, प्रकाश आणि घरातील आर्द्रता. या सर्व व्हेरिएबल्सचे अंडरवॉटर लॅबमध्ये दररोज 24 तास निरीक्षण केले जाते. बायोस्फियरमधील हवेचे तापमान आणि सभोवतालच्या समुद्राचे पाणी यांच्यातील तापमानाच्या फरकामुळे, बायोस्फियरच्या तळाशी असलेले पाणी बाष्पीभवन होते आणि अंतर्गत पृष्ठभागांवर सहजरित्या कलेक्ट होते. दबाव, तापमान, आर्द्रता इत्यादीमुळे होणारे परिणाम कमी प्रकाशाचा समतोल राखू शकतात. त्याच बरोबर उच्च दाबाच्या परिस्थितीमुळे झाडांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो आणि जर्मिनेशन पटकन होतो असे संशोधनातून समोर आले आहे.
बायोस्फियरच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात ताजे पाणी जमा होते. हे ताजे पाणी, एकदा गोळा केल्यावर त्यात पिकाला आवश्यक खनिजे मिसळली जातात आणि हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने बायोस्फियरमध्ये पुरवली जातात. अश्या प्रकारे पिकाला वाढीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींचा पुरवठा करून निमोस गार्डन मध्ये शेती केली जात आहे.

समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देत मानव अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभे राहणारे प्रश्न सोडवत आहे. भविष्यात निर्माण होणारा अन्नसुरक्षा आणि शेती क्षेत्राची अपुरी पडणारी जागा यांना या तंत्रज्ञानाने तोंड देता येईल आणि भारतासारख्या कृषिप्रधान देशाने संधी म्हणून बघणे अत्यावश्यक आहे. यातून भारतातील कृषिक्षेत्रामध्ये innovation साठी गुंतवणूक वाढवून भारताचा सर्वाधिक असुरक्षित ‘शेतकरी’ समुदाय आधुनिकतेकडे आकर्षिला जाईल.

FOR YOU