विचार करा, की तुमचा laptop, PC किंवा mobilephone कोणतेही बटन न दाबता operate होत असेल तर? म्हणजेच तुम्ही फक्त मनात विचार करायचा आणि तुमची इलेक्ट्रॉनिक उपकरणे automatically काम करतील! ऐकण्यात जरा विचित्र आहे पण शक्य आहे!
जगप्रसिध्द TESLA आणि Spacex कंपनीचे संस्थापक एलॉन मस्क यांनी 2016 मध्ये न्युरालिंक(Neuralink) कंपनीची स्थापना केली. याच कंपनीचे Neuralink हे तंत्रज्ञान सध्या विकसीत होत आहे जे मानवाला त्यांच्या मेंदूचा वापर करून मशीनशी संवाद साधण्यास मदत करू शकेल, तेही कोणत्याही प्रकारचे टायपिंग किंवा voice command न देता. मानवी मेंदूला इंटरनेटशी जोडण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प व्यावसायिक वापरासाठी रिलीज होण्याच्या टप्प्यावर आहे. एवढच नाही तर Neuralink neuroanatomy and neuroscience क्षेत्रातील अभ्यासांना वर्षानुवर्षे पुढे घेऊन जाण्यास मदत करेल.
हे NEURALINK नक्की आहे तरी काय?
NEURALINK हे एक असे उपकरण आहे जे शस्त्रक्रिये द्वारे तुमच्या मेंदूमध्ये फिट केले जाईल आणि त्याद्वारे तुम्ही मशिनशी संवाद साधून त्याचे नियंत्रण करू शकाल. त्याचबरोबर मेंदूतील सिग्नल्सचा अभ्यास करण्यास आणि विविध वैद्यकीय समस्यांवर उपचार करण्यास हे तंत्रज्ञान मदत करेल.
शर्टच्या बटनाच्या आकाराचे असलेले हे device एक “N1” चिपसेट सह, तुमच्या मेंदूत स्थापित केले जाईल. ज्याचा व्यास 8 मिमी आहे आणि त्यात अनेक wire housing electrodes आणि या वायरसाठी इन्सुलेशन असेल. ह्या wires आणि १००० electrodes ज्या आपल्या मेंदूतील neurons इतक्या जाड आणि आपल्या केसांपेक्षा १०० micrometers नें पातळ असतील ज्या एका blood free operation म्हणजेच आपल्या रक्ताचा एकही थेंब वाया न जाऊ देता मेंदूत अत्याधुनिक robots च्या मदतीने बसवल्या जातील. Elon Musk यांच्या म्हणण्यानुसार इंस्टॉलेशन प्रक्रियेला दोन तास लागू शकतात आणि प्रक्रियेदरम्यान व्यक्तीला भूल देखील दिली जाऊ शकते. ह्याचाही पुढे जाऊन डिव्हाइस मेंदूत बसवून झाल्यानंतर तुमच्या डोक्यातून वायर किंवा अँटेना बाहेर येणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे.
Neuralink कसे काम करेल?
न्यूरालिंक कसे कार्य करते? हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला आपला मेंदू न्यूरॉन्स वापरून शरीराच्या वेगवेगळ्या भागांना माहिती कसा पाठवतो हे समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या मेंदूतील न्यूरॉन्स एकमेकांशी जोडून एक मोठे नेटवर्क तयार करत असतात आणि Neurotransmeter नावाचे रासायनिक signals वापरून संवाद साधतात. ही क्रिया electric field निर्माण करते आणि तुम्ही जवळ electrodes ठेवून ही क्रिया रेकॉर्डही करू शकता. हे electrode नंतर तुमच्या मेंदूतील electric signals समजू शकतात आणि मशीन वाचू शकतील अशा भाषेत त्याचे रूपांतर करू शकतात. अशा प्रकारे neuralink तुम्ही काय विचार करत आहात ते वाचण्यास सक्षम असेल आणि न बोलता मशीनशी बोलण्याचा मार्ग शोधू शकेल.परंतु यासाठी wifi किंवा bluetooth वापरले जाईल हे अजून स्पष्ट केलेले नाही.
कंपनीने सांगितले, की प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य सेवा उद्योगाला मदत करण्यावर भर दिला जाईल. फोन ऑपरेट करणे किंवा कॉम्प्युटरशी संवाद साधणे यासारख्या साध्या कामांमध्ये पॅराप्लेजिक रुग्णांना हे मशीन मदत करू शकेल. त्याच बरोबर हे उपकरण एखादी व्यक्ती दृष्टीहीन झाली असेल तर त्यांची दृष्टी परत मिळवण्यास मदत करेल. आणि मेंदूतील कोणतीही चूक सुधारण्यास हे तंत्रज्ञान सक्षम असेल.
न्यूरालिंकचा उपयोग व्यक्तीची स्मृती, भाषण आणि हालचाल पुनर्संचयित करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.तंत्रज्ञान आणि मानवी मेंदूचे संपूर्ण सहजीवन केल्यानंतर ते मानवांना प्रत्यक्ष बोलण्याची गरज न पडता एकमेकांशी संवाद साधण्यास देखील सक्षम असेल, असे मस्क म्हणाले. यासाठी आम्हाला विशिष्ट भाषा शिकण्याची गरज आहे का हे त्यांनी अजून स्पष्ट केलेले नाही. परंतु अशाप्रकारचा संवाद शक्य होईल असे ते म्हणाले. कल्पना करा, एखाद्याचे मन वाचण्याची क्षमता!
काही काळजीच्या बाबी… Neuralink हा मानवांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पुढील स्तराशी जोडणारा दुवा असू शकतो. आतापर्यंत या तंत्रज्ञानाची मानवांवर चाचणी झालेली नाही. सहजीवन अनुभवणारे पहिले जिवंत नमुने म्हणजे उंदीर आणि माकड. चाचणी दरम्यान माकड त्याच्या मेंदूने संगणक नियंत्रित करू शकला.
- डेटाची चोरी?
जर हे उपकरण इंटरनेटशी जोडलेले असेल तर आपल्या मेंदू मधून थेट डेटा चोरण्याचा प्रयत्न करणार्या हॅकर्सपासून संरक्षण कसे होईल? याची चिंता देखील आहे. - डिव्हाइस तुमच्या डोक्यात किती काळ असेल?Neuralink किमान 10 वर्षांची टाइमलाइन पाहत आहे.
- तुम्हाला नंतर ही चिप काढण्याचा पर्याय उपलब्ध असेल का? मस्क यांनी या प्रश्नाचे “हो.” असे उत्तर दिले आहे. आणि यासारख्या अनेक प्रश्नांवरती आपल्याला लवकरच अधिक स्पष्टता हे device बाजारात लाँच होताच कळेल,
परंतु तोपर्यंत, असे तंत्रज्ञान बाजारात येते आहे हीच आपल्यासाठी फार मोठी बाब आहे.
आपण AI च्या क्षेत्रात प्रवेश करत आहोत आणि ह्यात शक्यता अनंत आहेत! कल्पना करा, लोकांशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला फोन किंवा स्मार्टफोनसारख्या भौतिक साधनाची आवश्यकता लागणार नाही. संवादाचा वेगही अनेक पटीने वाढेल कारण आपण वाक्य टाईप करण्यात आता आपला वेळ वाया घालवणार नाही…..