sm logo new

‘Work From Home’ साठी नवीन कायदा

social mirror work from home
social mirror work from home

Share

Latest

२०१९ मध्ये कोरोना महामारीने संपूर्ण जग व्यापले होते. याच दरम्यान जगाबरोबरच भारतातील सेवा (IT) क्षेत्रात ‘Work from Home’ ही संकल्पना वाढण्यास सुरुवात झाली. आज अनेक मोठ्या उद्योगांमध्ये Work from Home ही एक सामान्य दिनचर्या बनली आहे. नेदरलँड हा Work from Home हा कर्मचार्‍यांचा कायदेशीर अधिकार म्हणून घोषित करणारा जगातील पहिला देश ठरला आहे.

भारतातही Work from Home ला प्रोत्साहन देत, भारत सरकारच्या वाणिज्य विभागाने आर्थिक क्षेत्र नियम २००६ (Special Economic Zones Rules 2006) अंतर्गत नवीन ‘कलम ४३ अ’ जोडले आहे.

या नियमानुसार आर्थिक क्षेत्रा (Special economic zones) मधील IT/ITeS कंपनीतील ५०% कर्मचारी हे आता Work From Home करू शकतात. ज्यामध्ये कायमस्वरूपी कार्यरत असलेले कर्मचारी आणि कंत्राटी पद्धतीने काम करणारे कर्मचारी तसेच सतत फिरतीवर असणारे कर्मचारी यांचाही समावेश आहे.

हे कर्मचारी जास्तीत जास्त एका वर्षासाठी ही work from home ची सुविधा वापरू शकतात. तसेच कंपनी किंवा कर्मचाऱ्याला हा कालावधी एका वर्षापेक्षा जास्त वाढवायचा असल्यास या नियमानुसार त्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्राच्या (Special Economic Zones) विकास आयुक्तांची परवानगी अनिवार्य असेल.

घरून काम करत असताना कर्मचाऱ्यांना इंटरनेट, लॅपटॉप वायफाय इत्यादी सारख्या सर्व आवश्यक सेवा कंपनीने पुरवाव्यात असे देखील या नियमात नमूत केले गेले आहे.

Geek wire

विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) म्हणजे नक्की काय?


विशेष आर्थिक क्षेत्र हे असे क्षेत्र आहे जेथे उत्पादन, एक्सपोट्स आणि सेवांशी संबंधित बहुतेक उद्योग असतात. भारताच्या केंद्र सरकारने देशातील ८ प्रमुख क्षेत्रे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत ज्यामध्ये सांताक्रूझ (महाराष्ट्र), कोचीन (केरळ), कांडला आणि सुरत (गुजरात), चेन्नई (तमिळनाडू), विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), फाल्टा (पश्चिम बंगाल) आणि नोएडा (उत्तर प्रदेश) यांचा समावेश होतो.

पियुष गोयल यांनी सांगितल्यानुसार भारतात असलेल्या विशेष आर्थिक क्षेत्राने आता पर्यंत २० लाख नवीन रोजगार संधी निर्माण केल्या आहेत त्याचबरोबर या क्षेत्रात ५ लाख कोटी रुपयापर्यंत नवीन गुंतवणूक झाली आहे आणि भारतातून एकूण ७ लाख कोटी रुपयाची निर्यात झाली आहे.

जानेवारी २०२० पर्यंत भारतात २.५% लोक घरून काम करत होते परंतु हा आकडा आता ७.५% पर्यंत पोहचला आहे. एवढेच नाही तर अमेरिकन व्यावसायिक मासिक फोर्ब्स (forbes) नुसार २०२५ पर्यंत जगभरात ह्या IT सारख्या इतर क्षेत्रात कार्यरत असणारे ७५% कर्मचारी हे आठवड्यातून ५ दिवस work from home करतील.

जग हळूहळू बदलते आहे. बदलत्या जगानुसार काम करण्याची पद्धती मध्येही बदल होतो आहे. भारतात सुद्धा टाटा स्टील, मारुती, मॉंडेलेझ, इन्फोसिस सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनीही ह्या work from home चा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारने नमूद केलेल्या या नवीन नियमाचा सर्वांना फायदाच होईल हीच आशा.

FOR YOU