sm logo new

भारतात Opium(अफू) उत्पादनासाठी खासगी कंपन्यांना परवानगी…

social mirror opium
social mirror opium

Share

Latest

भारतातील अफू(Opium) प्रक्रियेचा बाजार, हा कठोर नियमांसाठी ओळखला जातो. भारतातील अफू उत्पादन आणि प्रक्रिया ही आतापर्यंत फक्त भारत सरकारच्या नियंत्रणाखाली केली जात असे, परंतु आता अखेर खाजगी कंपन्यांना सुद्धा ही वेदनाशामक, खोकला सिरप आणि कर्करोगाची औषधे बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अल्कलॉइड्स काढण्यासाठी अफूवर प्रक्रिया करून Poppy seed तयार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ‘बजाज हेल्थकेअर’ यामध्ये सहभागी होणारी पहिली खाजगी कंपनी आहे. महसूल आणि नफ्याच्या मार्जिनच्या दृष्टीने प्रचंड क्षमता लक्षात घेता, हे मार्केट गेम चेंजर ठरू शकते, विशेषतः pharmaceutical च्या जगासाठी.

भारतातील अफू उत्पादन –

भारतामध्ये अफूचा व्यवसाय काटेकोरपणे नियंत्रित केला जातो कारण आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (INCB) द्वारे Pharmaceutical उद्योगात अल्कलॉइड्स तयार करण्यासाठी अफूचे उत्पादन करण्यासाठी अधिकृत १२ देशांपैकी भारत एक आहे. जिथे अफूची लागवड कायदेशीर आहे.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधील २२ जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या जमिनीच्या ‘काही भागांमध्येच’ अफू पिकांची लागवड केली जाते.
भारतात उत्पादित होणाऱ्या अफूवर सध्या उत्तर प्रदेशातील गाझीपूर आणि मध्य प्रदेशातील नीमच येथील सरकारी अफू आणि अल्कलॉइड कारखान्यांमध्ये संपूर्णपणे प्रक्रिया केली जाते.

Transform Drug Policy Foundation

अफू नियंत्रणासाठी कायदे –

Opium Act 1857, Opium Act 1878 and Dangerous Drug Act 1930 अशा विविध कायद्यांतर्गत भारतसरकार या अफूचे उत्पादन नियंत्रित करते.
सध्या, भारतात अफूची लागवड आणि प्रक्रियेचे नियंत्रण Narcotic Drugs and Psychotropic Substances (NDPS) Act and Rules अंतर्गत केले जाते.

खाजगी क्षेत्राच्या सहभागामुळे Morphine आणि Codeine सारख्या विविध अल्कलॉइड्सच्या देशांतर्गत उत्पादनाला या निर्णयामुळे चालना मिळू शकते व त्याच्या प्रक्रियेसाठी आधुनिक तंत्रज्ञान भारतात येऊ शकते ज्यामुळे या अल्कलॉइड्सची आयात दर कमी होण्यास मदत होईल.

अफू उत्पादनाचा इतिहास


ऐतिहासिक नोंदीनुसार, भारत किमान १५ व्या शतकापासून अफू ​​पिकवत आहे.
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने जेव्हा मुघल साम्राज्याचा ऱ्हास होत होता तेव्हा अफू लागवडीवर मक्तेदारी निर्माण केली आणि १८७३ पर्यंत एकूण व्यापार सरकारी नियंत्रणाखाली आणला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अफूची लागवड आणि व्यापार भारत सरकारकडे सोपवण्यात आला. जो आता NDPS कायदा आणि नियमांच्या तरतुदींद्वारे नियंत्रित केला जातो आहे.

बजाज हेल्थकेअरला Poppy Straw आणि त्यापासून अल्कलॉइड हा सक्रिय Pharmaceutical घटक (APIs) तयार करण्यासाठी सरकारी निविदा देण्यात आल्या आहेत. सरकारने 19 जुलै रोजी ठाण्यातील एका कंपनीशी वार्षिक ५०० टन अफूच्या डिंकावर प्रक्रिया करण्याचा प्रारंभिक करार केला आहे. आणि पुढील पाच वर्षांत उत्पादन ८०० टन प्रतिवर्ष व्हावे अशी आशा वर्तवली आहे.

FOR YOU