sm logo new

सेंद्रिय शेती :भविष्याची गरज…

social mirror organic farming
social mirror organic farming

Share

Latest

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताच्या GDP अकाऊंट मध्ये शेतीचा फार मोठा वाटा असून देशातील जवळपास 70% लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे. भारतात शेती म्हंटल की माती आली, पीक आल आणि आली पिकाला लागणार खत पाणीही आलच.
भारतातील बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतात उत्पादन वाढीसाठी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा उपयोग करतो आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. संपूर्ण भारतात युरियाचा वापर प्रामुख्याने केला जातो. एकीकडे सर्व रासायनीक खतांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत परंतु शेतकरी उत्पन्न वाढवण्यासाठी या वाढीव किंमतीमध्ये खते विकत घेतो आहे. आताच्या बदलत्या हवामानाची स्थिती लक्षात घेता काही ठराविक मर्यादेपर्यंत रासायनिक खते वापरने योग्य आहे परंतु इथून पुढे कायम ही महागडी रासायनिक खते वापरणे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे नाही.

खतांच्या किंमती का वाढल्या आहेत?

भारत विविध प्रकारची खते परदेशावून आयात करतो. कॅनडा,इस्राएल,जॉर्डन, यूक्रेन सारखे देश भारताला रासायनिक खतांचा पुरवठा करतात. 2022 च्या सुरुवातीपासून खतांच्या किमती 30% ने वाढल्या आहेत.
पुरवठ्यातील अडथळे, उत्पादनातील अडचणी आणि अलीकडेच रशिया यूक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर खतांच्या किमती वाढत आहेत.
मातीचे आरोग्य आणि पीकच्या संतुलित वाढीसाठी भारतात NPK घटकांचे मान्यता प्रमाण 4:2:1 आहे परंतु भारतात NPK चा वापर सरासरी 8:3:2 आहे. म्हणजेच जवळपास गरजे पेक्षा दुपटीने आपण खत वापरत आहोत! यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी झालेला आहे.

अश्या परिस्थितीत शेतकऱ्याने काय करावे?

१. शेतकऱ्याने वेळो वेळी आपल्या मातीचे परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. आपल्या मातीला काय हवं आहे हे योग्य वेळी लक्षात घेऊन योग्य प्रमाणात द्यायला हवे.
२.ज्याप्रमाणे आपण जेवढी भूक आहे तेवढच जेवण करतो तसेच पिकाला जितकी गरज आहे तितकेच पिकास उपलब्ध करून द्यायला हवे. गरज नसताना भरमसाठ खतांचा अपव्यय टाळायला हवा.
३.पीक वाढीसाठी ऑरगॅनिक खते जसे की cottonseed meal, fish emulsion meal, blood meal आणि FYM सारख्या इतर खतांचा वापर केला पाहिजे.
४. शेतकऱ्यांचा कल रासायनिक खतांकडे का आहे? याचा शोध घेतल्यावर लक्षात आले की रासायनिक खते हि सेंद्रिय खतांच्या तुलनेत त्वरित Result दाखवतात. आज टाकल्यावर उद्या लगेच positive परिणाम देतात. रसायनिक खत जरी आत्ता result देत असली तरी नंतर मात्र ते माती नापीक करतात.
५. या उलट सेंद्रिय खते पिकास मंद गतीने परिणाम दाखवतात पण मातीचे आरोग्य, मातीची सुपीकता, ऑरगॅनिक कार्बन टिकवून ठेवण्यास मदत करतात.

Unsplash

त्यामुळे फक्त वर्तमानाचा विचार करून रासायनिक खते वापरणे योग्य नाही. भविष्याचा विचार करून ऑरगॅनिक शेतीकडे वाटचाल करणे हि आता काळाची गरज आहे!

FOR YOU