sm logo new

भारतामधील राष्ट्रपतीपदाची निवडणूक | Presidential Election in India

social_mirror presidential election in india
social_mirror presidential election in india

Share

Latest

भारत जगातील सर्वात मोठे ‘लोकशाही’ व्यवस्था असलेले राष्ट्र आहे. भारताची लोकशाही व्यवस्था ही ‘प्रजासत्ताक’ असल्या कारणामुळे भारताच्या पाहिले नागरिक असलेल्या आणि ‘राष्ट्रप्रमुख’ असलेल्या पदाची देखील नियुक्ती न करता निवड केली जाते. मात्र जगामध्ये अशी बरीच राष्ट्रे आहेत ज्यांचे राष्ट्रप्रमुख हे वंशपरंपरेनुसार पदावर दावेदारी दाखवितात. जसे की भारतावर १५० वर्षे राज्य केलेल्या इंग्रजांचा राजा किंवा राणी तिथले राष्ट्रप्रमुख आहेत आणि त्यांच्या नावे राज्य चालविले जाते.

निवडणूक पद्धती कशी आहे?

राष्ट्रपती पदासाठी जनतेमधून मतदान होत नाही, कारण भारताने राष्ट्रपती पदाकरिता ‘प्रमाणशीर प्रतिनिधित्व एकल संक्रमणीय पद्धती’ (PRSTV) या पद्धतीचा स्वीकार केला आहे.

या पद्धतीमध्ये मतदान प्रक्रियेत केवळ निवडून दिलेले आमदार आणि खासदार भाग घेतात. म्हणजे आमदार आणि खासदार मतदान करू शकतात. राज्यपालांनी नियुक्त केलेले आमदार आणि राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले खासदार मतदान करू शकत नाहीत.

या पद्धतीमध्ये आपण जसे ज्याला वाटते त्याच्या नावासमोर असलेल्या बटणावर दाबून केवळ त्यालाच मत देतो असे नसते. येथे या सर्व आमदार आणि खासदारांना प्राधान्यक्रम द्यावा लागतो. जसे, ‘अबक’ आणि ‘तथद’ नावाचे व्यक्ती निवडणुकीत उमेदवार असतील तर मतदान करणारा या दोघांमधील एकाला पहिला तर उरलेल्याला दुसरा क्रमांक देऊन आपला प्राधान्यक्रम देतो. यानंतर या सर्व प्राधान्यक्रमाचा विचार करून उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.

मतदानात कोण सहभागी होऊ शकते?
१. राज्य विधिमंडळात निवडून गेलेले आमदार
२. संसदेत निवडून गेलेले खासदार

निवडणुकीची पात्रता :
१. भारताची नागरिक असावी.
२. वय वर्षे किमान ३५ वर्षे असावे.
३. लोकसभेवर निवडून येण्यास ती व्यक्ती पात्र असावी.
४. उमेदवाराने इतर कुठेही शासकीय लाभाचे पद धारण केलेले नसावे.

या सर्व अटी पूर्ण करून ५० मतदार निवडणूक अधिकाऱ्यांकडे नावाचा प्रस्ताव ठेवतात. आणि आणखी ५० मतदार निवडणूक अधिकाऱ्यांकडे नावाचे अनुमोदन देतात. याकरिता ₹१५,००० अनामत रक्कम (deposit) म्हणून देखील RBI कडे जमा करावी लागते. ही रक्कम निवडणुकीनंतर परत केली जाते.

राष्ट्रपतींचा पगार किती असतो?
राष्ट्रपतींना भारताच्या संचित निधीमधून ₹५ लाख प्रति महिना इतका पगार दिला जातो. याव्यतिरिक्त भत्ता म्हणून आणखी रक्कम पुरविली जाते. राष्ट्रपती पदाची ५ वर्षे संपल्यानंतर पगाराच्या निम्मे पेन्शन देखील पुरविले जाते.

FOR YOU