sm logo new

पाऊसाचे आणि पाण्याचे अकाऊंट | Rain And Water Account

social mirror rain & water account rain guage
social mirror rain & water account rain guage

Share

Latest

महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर अमुक भागात अमुक सेंटीमीटर पाऊस पडला, अमुक धरणातून अमुक क्युमेक किंवा क्युसेक पाणी (water) सोडले अशा अनेक बातम्या आपण बघत असतो आणि वाचतही असतो. ह्या बातम्या पावसाळा आला की नकळत आपल्या समोर येतात आणि पावसाळा संपत आला की आपणही ही मोजमापे काय असतात ते विसरून जातो. (Rain) पाऊस देखील अनेकदा मिलिमीटर, सेंटीमीटर मध्ये मोजला जातो. तर काय आहेत या संज्ञा?

पाऊस कसा मोजला जातो?

पाऊस पडत आहे अशा मोकळ्या मैदानामध्ये रेन गेज (Rain guage) नावाचे एक स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट (standerd instrument) ठेवले जाते. जेणेकरून इमारत अथवा झाडाचा आडोसा येऊन पाऊस रेन गेज (rain guage) मध्ये पडण्यास अडथळा येणार नाही. हा रेन गेज (rain guage) ८ इंची उंचीचा असतो आणि या गोलाकार नरसाळ्याच्या (circular funnel) आकाराच्या रेन गेज (rain guage) मध्ये एका वेळी २५ मिलिमीटर पर्यंत पाणी साठते. ठराविक वेळेत जितके पाणी रेन गेज (rain guage) मध्ये साठले त्यालाच अमुक मिलिमीटर किंवा अमुक सेंटीमीटर पाऊस झाला असे म्हटले जाते.

सध्या आधुनिकतेने बनविलेल्या अनेक हवामान नोंदणी केंद्रांमध्ये टिपिंग बकेट रेन गेज (tipping bucket rain guage) वापरले जाते. याची क्षमता एका वेळी २०३ मिलिमीटर पाऊस मोजण्याइतकी असते.

Dreamstine

टी.एम.सी. (T.M.C.) म्हणजे काय?

  • टीएमसी चा अर्थ आहे एक अब्ज घनफूट पाणी. आता हे किती असते ते समजून घेऊ.
  • १फूट × १फूट × १ फूट म्हणजे १ घनफूट पाणी.
  • १ घनफूट पाणी म्हणजे २८.३१ लिटर पाणी.
  • २८.३१ लिटर पाणी म्हणजे अंदाजे १० लिटर्स च्या ३ बादल्या.
  • १ दशलक्ष घनफूट पाणी म्हणजे १०,००,००० घनफूट पाणी.
  • आणि १ टीएमसी म्हणजे ‘१००० दशलक्ष घनफूट पाणी.’ म्हणजेच ‘१ अब्ज घनफूट पाणी.’

क्युसेक आणि क्युमेक काय आहे?

क्युसेक (Cusec- one cubic foot per second) म्हणजे एक घनफूट प्रती सेकंद होय.
एक घनफूट म्हणजे २८.३१ लिटर्स पाणी होय. म्हणजेच जेव्हा धरणातून १००० क्युसेक पाणी सोडले जाते याचा अर्थ धरणातून १०००×२८.३१ लिटर्स= २८,३१० लिटर्स प्रति सेकंद दराने पाणी सोडले जाते.

Dainik Prabhat

क्युमेक (Cumec- one cubic meter per second) म्हणजे एक घनमीटर प्रति सेकंद होय. एक घनमीटर म्हणजे १००० लिटर्स पाणी होय. म्हणजेच जेव्हा धरणातून १००० क्युमेक पाणी सोडले जाते याचा अर्थ धरणातून १०००×१००० लिटर्स= १०,००,००० लिटर्स (दहा लाख लिटर्स) प्रति सेकंद दराने पाणी सोडले जाते.

“अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हवामान खात्याच्या website ला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे click करा. “

FOR YOU