sm logo new

‘Raincoat’ and ‘Suncoat’ on your skin…

social mirror skin care
social mirror skin care

Share

Latest

Skin आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव, जे केवळ आपले बाह्य सौंदर्यच नाही तर शरीरातील प्रक्रियांचे काम दर्शवते.
त्वचेचे तीन मुख्य थर ( layers ) आहेत.
१. Epidermis
२. Dermis
३. Subcutaneous tissue

आता आपण ह्या तीन मुख्य थरांची (layers) माहिती घेऊ.

Epidermis

त्वचेचा सर्वांत वरची layer जी शरीर आणि बाहेरील वातावरण ह्यात एक भिंत म्हणून उभी असते. ऊन, पाणी, वारा, वातावरणातील घातक पदार्थ ह्या पासून ही layer आपले रक्षण करते. स्पर्शज्ञान देखील याच layer द्वारे आपण अनुभवू शकतो. मृत त्वचा झडण्याची प्रक्रिया देखील याच layer वर होते.
Epidermis मध्ये अजुन ५ layers असतात. ज्यांना sub layers असे म्हणतात.
त्यात सर्वात महत्वाच्या दोन layers म्हणजे-
Stratum Corneum Epidermis ची पहिली किंवा सगळ्यात वरची layer. ज्याला आपण शरीराचा raincoat असे म्हणू शकतो. आपण रोज अंघोळ करतो, पोहायला जातो, पावसात भिजतो तेंव्हा आपण बाहेरून ओले होतो पण शरीर आतून कोरडे असते. ह्याच वेळेला त्वचेची स्निग्धता टिकवून ठेवण्यासाठी हवी तेवढी आद्रता धरून ठेवण्याचे काम देखील केले जाते. आपले बाह्यरूप जे सर्वांना दिसते ते म्हणजे stratum corneum.

Stratum basale

त्यानंतर दुसरी महत्त्वाची layer म्हणजे stratum basale. Epidermis ची सर्वात खालची किंवा शेवटाची layer. आपल्या त्वचेचा रंग ठरवणारी, सफेद डाग किंवा काळे वांगा सारखे डाग त्वचेवर निर्माण करण्यासाठी कारणीभूत असणारी layer अर्थात stratum basale. त्वचेतील रंगद्रव्य म्हणजे melanin pigment याच थरात बसलेले असते. हे melanin pigment आपल्या त्वचेचे, त्या खालील स्नायूंचे घातक अतिनील किरणांपासून रक्षण करते. ह्या layer ला त्वचेचा suncoat असे देखील म्हटले जाते. ज्यामुळे आपली त्वचा रापते, tan होते ज्याला आपण sun burn, hyperpigmented patches असे म्हणतो.

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, असा suncoat काय कामाचा की ज्यामुळे त्वचा काळवंडते. Tan होणे ही एक protecting process आहे. ज्यामुळे एजिंगला अटकाव केला जातो. तो कसा? तर melanin ची layer अतिनील किरणांना ज्यांना आपण ultra violet rays असे म्हणतो, त्यांना शोषुन घेते ज्यामुळे ही अतिनील किरणे dermis पर्यंत जावू शकत नाहीत. जर ही अतिनील किरणे dermis मध्ये गेली तर collagen fibres ना damage करून सुरकुत्या पडायला सुरुवात होते आणि आपण एजिंगकडे प्रवास करतो. शेतात काम करणारे, उन्हात फिरून काम करणाऱ्यांची त्वचा जास्त काळवंडत जाते तेव्हा त्याची त्वचा खऱ्या अर्थाने सुरक्षित होत जाते. जेवढे जास्त melanin तेवढी जास्त त्वचा सुरक्षित आणि जेवढे जास्त melanin तेवढा त्वचेचा tone देखील डार्क. परंतु आपल्याकडे त्वचेवर डाग किंवा डार्क tone कुणालाच आवडत नाही. सगळ्यांना गोरी नितळ त्वचा हवी असते तर दुसरीकडे परदेशी लोक उन्हात स्किन तापेपर्यंत बसून राहतात. कारण मुळातच त्यांच्याकडे melanin कमी त्यामुळे त्यांची त्वचा collagen damage होण्याची शक्यता जास्त असते.

Dermis

त्वचेची दुसरी मुख्य layer आहे Dermis. जिला ‘True skin’ असे देखील म्हटले जाते. Epidermis ला आधार देणे, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे. Collagen fibres जे त्वचेला tightness देण्याचे काम करते. हे collagen fiber damage झाले तर लवकर सुरकुत्या पडून अकाली वय वाढण्याच्या खुणा आपल्या चेहऱ्यावर दिसतात.
त्यामुळे आपल्या त्वचेचे रक्षण करणाऱ्या या दोन महत्वाच्या layers, stratum corneum आणि stratum basale अर्थात raincoat आणि suncoat यांची काळजी घेणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. ती कशा प्रकारे घ्यावी, त्याबद्दल लवकरच जाणून घेऊ पुढील लेखात.
धन्यवाद.

FOR YOU