शेतकरी बांधवांसाठी आनंदाची वार्ता ‘महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019’ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने दिनांक 27 जुलै 2022 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अल्पमुदत पीक कर्ज, पुनर्गठीत पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत लेखाशीर्षक (GR)दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
✅ या शेतकऱ्यांना मिळणार लाभ-
▪️ 30 सप्टेंबर रोजी थकित असलेले कर्ज व दिनांक 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज होणार माफ!
▪️ कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरणार!
▪️ राष्ट्रीयकृत, व्यापारी, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार!
❎ यांना लाभ मिळणार नाही-
▪️आजी व माजी मंत्री आजी व माजी आमदार खासदार
▪️ केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक 25 हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थ श्रेणी वगळून)
▪️ महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक 25 हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थ श्रेणी वगळून)
▪️ सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक 25 हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी
▪️ 25 हजार रुपये पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेणाऱ्या व्यक्ती
▪️ ती उत्पन्न व्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती
✅ सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती-
▪️ आपला आधार क्रमांक बँकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्ज खात्याशी संलग्न करावा.
▪️ मार्च 2020 पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचनाफलक तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील.
▪️ या याद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल.
▪️ शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोबत आपल्या दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेऊन ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात जाऊन आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पाडताळणी करावी.
▪️ भारताने नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा होईल.
✅ यादीमध्ये दर्शविलेली थकीत कर्ज रक्कम आपणास मान्य नसल्यास अथवा आपला आधार क्रमांक चुकीचा असल्यास आपण तक्रार नोंदवावी. मात्र यासाठी तुमचा अचूक आधार क्रमांक देऊन प्रामाणिककरण करावे. तुमची तक्रार पोर्टल द्वारे जिल्हा समितीकडे जाईल आणि समिती अंतिम निर्णय घेईल. त्यानुसार कर्जमुक्तीची रक्कम नियमानुसार निश्चित होईल.
✅ बँकांकडून सर्व कर्ज खात्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर लाभार्थींची अंतिम यादी लाभारकमेसह आपल्या ग्रामपंचायत चावडीवर, आपले सरकार कार्यालय आणि बँकेमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. आणि तदनंतर तुम्हाला कर्जमुक्ती प्रमाणपत्र देण्यात येईल.
संदर्भ -दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यामध्ये प्रसिद्ध केलेला लेखाशीर्षक (GR)