sm logo new

Shark Tank India: भारतीय स्टार्टअप्सना अर्थसंजीवनी देणारा रियॅलिटी शो! | Startup India

shark_tank_india_social_mirror
shark_tank_india_social_mirror

Share

Latest

पाच कोट्याधीश गुंतवणूकदारांसमोर एखादा नवउद्योजक आपल्या मनातील व्यवसायाची, उद्योगाची संकल्पना मांडतो, गुंतवणूकदार त्याला उलट-सुलट प्रश्न विचारुन त्याची परीक्षा घेतात आणि त्याच्या नवउद्योग(स्टार्टअप) मध्ये गुंतवणूकीची तयारी दर्शवतात, नव्हे लगेच पहिल्या हप्त्याचा चेकही देऊन टाकतात!
अगदीच स्वप्नवत असणारी ही कल्पना प्रत्यक्षात आली Shark Tank India या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून!
अमेरिकेत प्रसिध्द असलेल्या शार्क टँक या रियॅलिटी शोचे सोनी एंटरटेनमेंट टेलीव्हिजन या कंपनीने भारतातील प्रसारणाचे हक्क विकत घेतले आणि 22 जून 2021 रोजी या शो ची भारतीय आवृत्ती सुरु झाली.

शार्क म्हणजे गुंतवणूकदारांचे एक पॅनेल की जे या शोमध्ये नवउद्योजकांच्या स्टार्टअपची सखोल माहिती घेतात व त्यांच्या नव्या उद्योगात कोट्यावधींची आर्थिक गुंतवणूक करतात.
या कार्यक्रमातील एकूण सात शार्क म्हणजेच गुंतवणूकदार असून प्रत्येक शोमध्ये किमान 5 शार्क उपस्थित असतात. त्यामध्ये अश्नीर ग्रोवर( सहसंस्थापक-भारत पे, संपत्ती 700 कोटी), अमन गुप्ता( सहसंस्थापक- BoAT,संपत्ती 700 कोटी), अनुपम मित्तल(संस्थापक पीपल ग्रुप-शादी डॉट कॉम,मकान डॉट कॉम.185 कोटी, गझल अलग(सहसंस्थापक-ममाअर्थ 148 कोटी), नमीता थापर(कार्यकारी संचालक- Emcure Pharmaceuticals, 600 कोटी), पीयुष बन्सल(सहसंस्थापक- Lenskart, 600कोटी) आणि विनिता सिंग(सीईओ- शुगर कॉस्मेटिक्स,59 कोटी) यांचा समावेश आहे.

shark_tank_india_social_mirror


या रिअॅलिटी शोचा पहिला सिझन 20 डिसेंबर2021 ते 4 फेब्रुवारी 2022 दरम्यान पार पडला. 65 भागांमध्ये झालेल्या शो साठी भारतातून तब्बल 62 हजार इच्छूकांनी प्रतिसाद दिला. यामधून 198 नवउद्योजकांना प्रत्यक्ष शो मध्ये आपल्या स्टार्टअपची संकल्पना मांडण्याची संधी मिळाली. त्यामधील 67 नवउद्योजकांच्या उद्योगांमध्ये ‘शार्क’ नी गुंतवणूक करुन त्यांना प्रोत्साहन दिले!
अनेक युवकांना नोकरीपेक्षा स्वत: चा उद्योग व्यवसाय असावा आणि तो भरभराटीला यावा असे स्वप्न असते. त्यासाठी त्यांच्या मनात काही नवकल्पनाही असतात. परंतु त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक भांडवलाची गरज असते. शार्क टँक इंडियाच्या माध्यमातून अनेक नवउद्योजकांना अर्थ संजीवनी मिळाली आहे!

FOR YOU