sm logo new

शासन आपले दारी – जिल्हा परिषद वैयक्तिक लाभाच्या विविध योजना 2022 भाग 1

Share

Latest

जिल्हा परिषद वैयक्तिक लाभाच्या विविध योजना 2022 भाग 1
शेतकरी बांधवांसाठी आनंदाची वार्ता, पुणे जिल्हा परिषद, पुणे, कृषी विभाग जिल्हा परिषद निधी अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजना राबवताना शासनाच्या 5 डिसेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार थेट लाभ हस्तांतर (DBT) या पद्धतीने राबवण्यात येणार आहेत. कृषी विभागाच्या विषय समितीने निश्चित केलेल्या अटी व शर्तीनुसार पात्र असणाऱ्या व अंतिमत: मान्यता दिलेल्या पात्र व गरजू लाभार्थ्यांना विहित बाबींचा लाभ देण्यात येणार आहे.
या योजनांसाठी दिनांक 22 ऑगस्ट 2022 पर्यंत विविध मनातील अर्ज कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. तरी विहित नमुन्यातील अर्ज कागदपत्रांसह पंचायत समिती कार्यालयामध्ये मुदतीत जमा करण्यात यावेत.

वैयक्तिक लाभाच्या योजनांचे नाव

 1. 75% अनुदानावर शेतकऱ्यांना सुधारित अवजारे व साहित्य पुरवठा करणे.
 2. नैसर्गिक सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजना/परसबाग उभारण्यास अर्थसहाय्य देणे
 3. शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर सोलर वॉटर हीटर स्वयंत्र 200 लिटर क्षमता.
 4. शारदा शेतकरी माता भगिनी अर्थसहाय्य योजना. 75% अनुदानावर शेतकऱ्यांना सुधारित अवजारे व साहित्य पुरवठा
  1) 3HP ओपनवेल विद्युत मोटार पंपसंच.
  2) 5HP ओपनवेल विद्युत मोटार पंपसंच.
  3) 7HP ओपनवेल विद्युत मोटार पंपसंच.
  4) 2HP इलेक्ट्रिकल कडबा कुट्टी यंत्र मोटरसह (होरिझेंटल मॉडेल).
  5) 5HP डिझेल इंजिन पंपसंच.
  6) प्लास्टिक क्रेट्स 20 किलो क्षमता.
  7) प्लास्टिक ताडपत्री (हूक जॉईंट 66 मीटर)
  8) 75MM PVC पाईप 4 KG/CM2
  9) 90MM PVC पाईप 4 KG/CM2
  10) 75MM PVC पाईप 3.2 KG/CM2 क्लिपसह किंवा क्लिप विरहित
  11) ट्रॅक्टरचलित दोन फाळी सरीरिजर
  12) बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप
  13) होरिझेंटल ट्रिपल पिस्टन स्प्रे पंप ऑईल इंजिनसह.

✅ लाभाचे स्वरूप-

1)विहित मापदंडाचे साहित्य खरेदी केल्यानंतर खरेदी समितीने निश्चित केलेल्या रकमेच्या 75 % अनुदानास पात्र.

2)खरेदी रोखीने किंवा कॅशलेस पद्धतीने करणे आवश्यक आहे.(GST Bill आवश्यक)

✅ अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे-

1) संबंधित शेतकऱ्याने विहित कालावधीत आवश्यक कागदपत्रांच्या (7/12, 8- अ दाखला, आधार कार्ड/ ओळखपत्र) स्वयंसाक्षांकित प्रति सादर करावयाच्या आहेत.

2) लाभार्थ्यांचे धारण क्षेत्र जास्तीत जास्त 10 एकर पर्यंत असावे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य. (8- अ किंवा तलाठी यांचा दाखल)

3) योजनेअंतर्गत लाभार्थ्यास जास्तीत जास्त एका अवजारासाठी लाभ देण्यात येईल.

4) सदर योजनेअंतर्गत पी.व्ही.सी. एच.डी.पी.सी. पाईपचा लाभ प्रतिलाभार्थ्यांस जास्तीत जास्त 20 पाईप (120 मीटर) व प्लास्टिक क्रेट्स याबाबत बाबीसाठी प्रतिलाभार्थ्यास जास्तीत जास्त 30 नगाचा लाभ देण्यात येईल.

5) विद्युत मोटार पंप संचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याने सिंचन सुविधांची नोंद असलेला पुरावा देणे आवश्यक राहील. तसेच लाभार्थ्याने कडबा कुट्टी यंत्र याबाबीसाठी विजेची सोय असल्याबाबत वीज बिलाची साक्षांकित प्रत देणे आवश्यक राहील.

6)आधार कार्डशी जोडणी केलेल्या बँक पुस्तकाची छायांकित प्रत.

उर्वरित योजनांबाबत सखोल माहिती पुढील भागात देण्यात येईल. प्रत्येक लाभार्थ्याला फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार असल्यामुळे संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय अर्ज करू नये.

FOR YOU