जपान मध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. निवडणुकांच्या प्रचारासाठी फिरत असताना जपानचे ६७ वर्षीय माजी पंतप्रधान शिंझो ॲबे यांची नारा शहरात भाषण देत असताना एका स्थानिक जपानी व्यक्तीने ॲबे यांच्या पाठीत गोळ्या घालून हत्या केली.
कोण आहेत शिंझो ॲबे?
जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान:
२००७ साली त्यांची जपानच्या पंतप्रधान पदी निवड झाली होती. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वाधिक तरुण पंतप्रधान बनले. मात्र पुढच्या वर्षी त्यांनी राजीनामा दिला.
जपानचे सर्वाधिक काळ जपानचे पंतप्रधान असणारे व्यक्ती :
शींझो ॲबे हे जपानचे २०१२ ते २०२० पर्यंत पंतप्रधानपदी राहिले. मात्र २०२० मध्ये प्रकृती खालावली असल्याने त्यांनी आपल्या पदाचा स्वतःहून राजीनामा दिला. तसेच स्थापनेपासून जवळपास नेहमीच सत्तेत असणाऱ्या Liberal democratic party पक्षाचे ते अध्यक्ष म्हणूनही २०१२ ते २०२० पर्यंत काम बघत होते.

भारतासोबतचे संबंध :
भारतासोबतचे ॲबे यांचे संबंध नेहमीच प्रेमाचे, सलोख्याचे आणि गहिरे राहिले आहेत.
भारताच्या प्रजासत्ताकदिनी (२०१४) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ते पाहिले जपानी पंतप्रधान होते. त्याच वर्षी त्यांनी वाराणसी येथील गंगा आरती देखील केली.
भारताच्या act east धोरणाला त्यांचा पाठिंबा होता.
QUAD (क्वाड) गटस्थापनेमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. या गटामुळे भारत अमेरिका संबंध सुधारले.
भारताने शिंझो ॲबे यांना त्यांच्या सार्वजनिक कार्याकरिता भारताचा ‘पद्मविभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.
भारताच्या पंतप्रधानांनी ९ जुलै रोजी जपानी पंतप्रधानांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.

जागतिक स्तरावर प्रतिष्ठा :
जपानची अर्थव्यवस्था जगातील सर्वोत्तम अर्थव्यवस्थापैकी एक बनविण्यात त्यांचा मोठा हात आहे. यातील Womenomics हे स्त्रीपुरूष समानता दर्शविणारे धोरण त्यांनी बनविले ज्याला Abenomics असेही म्हटले जाते.
आशिया-पॅसिफिक भुराजनयाला (Geopolitics) आकार देण्याचे काम त्यांनी केले.
ॲबे यांच्या कारकिर्दीत जपानने जगातील जवळपास सर्व देशांसोबत सलोख्याचे संबंध ठेवले आहेत.