sm logo new

Single use plastic (BAN) बंदी १ जुलै २०२२ पासून लागू !

SINGLE USE PLASTIC BAN SOCIAL MIRROR
SINGLE USE PLASTIC BAN SOCIAL MIRROR

Share

Latest

काय आहे Single-use plastic?

आपल्या दररोजच्या जीवनात अनेकदा प्लास्टिक सोबत संबंध येतो. किराणा मालाच्या polythene bags, shampoo आणि detergent प्लास्टिक बाटल्या, कॉफी कप आणि बरच काही… Recycling प्रक्रिया करून पुन्हा पुन्हा वापरता न येणाऱ्या प्लास्टिक ला single use plastic असे म्हणतात.

प्लास्टिक निर्मिती उद्योगांमध्ये single use plastic लोकप्रिय आहे. भारतामध्ये ५.६ दशलक्ष मेट्रिक टन single use plastic ची निर्मिती केली जाते. भारतात प्रतिव्यक्ती दरवर्षी किमान ४ किलो प्लास्टिक कचरा करतो. केंद्र सरकारने single use plastic बंदी १ जुलै २०२२ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

News Jani

Single use plastic बंदी मागील कारणे:

Mint

या प्रकारच्या प्लास्टिक ला recycle प्रक्रिया करता येत नाही त्यामुळे हे प्लास्टिक केवळ एकदाच वापरून फेकावे लागते, ज्यामुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होते.
उत्पादकांकडून या प्रकारच्या प्लॅस्टिकची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाल्याने धोका अधिक वाढतो.
मोठ्या प्रमाणात कचरानिर्मिती होते.
माणसाच्या आणि प्राण्यांच्या शरीरात microbeads स्वरूपात ह्या प्लास्टिकचे अंश शास्त्रज्ञांना आढळले आहेत.
वापरानंतर समुद्रात फेकून दिल्याने सागरी प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.

काय आहेत कायद्याच्या तरतुदी?

Single use plastic ची निर्मिती करणे, आयात करणे, साठविणे, विकणे, वापरणे, वाटप करण्यावर निर्बंध आणले गेले आहेत.

पर्यावरण संवर्धन कायदा, १९८६ अनुसार निर्बंधांचे उल्लंघन केल्यास ५ वर्षांपर्यंत कैद आणि १ लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील.

कोणती संस्था प्लास्टिक निर्बंधावर लक्ष ठेवणार आहे?

CPCB म्हणजेच ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केंद्र सरकारला दरवर्षी अहवाल सादर करणार आहे. ज्याआधारे सरकार पुढील आवश्यक पाऊले उचलणार आहे.

नागरिकांसमोर असणारे पर्याय

१. बाजारात अनेक fancy कापडी पिशव्या उपलब्ध आहेत.
२. Bamboo basket चा वापरदेखील अनेकजण करताना दिसून येतात.
३. कॅनव्हास पिशव्या, ज्यूट पिशव्या, पेपर पिशव्या, मसलिन पिशव्यांचा वापर अनेक प्रसिद्ध ब्रँड करीत आहेत.
४. नागरिकांनी स्वतःहून विक्रेत्याची प्लास्टिक पिशवी नाकारून उदाहरण स्थापण्याची गरज आहे.

FOR YOU