sm logo new

सोशल मीडिया एक व्यसन

social mirror social media
social mirror social media

Share

Latest

मीडिया म्हणजेच साधन . सोशल मिडिया (Social Media) म्हणजे ज्याच्या माध्यमातुन आपण इतरांशी प्रत्यक्ष हजर न राहता संवाद साधू शकतो , संदेश पाठवु शकतो म्हणजेच थोडक्यात सोशिअली ऍक्टिव्ह राहु शकतो. मग या तंत्रज्ञानाचा शोध लागण्यापूर्वी सुद्धा आपण social होतोच की.पण ते physically म्हणूया .
आता आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात एका क्लिकच्या साहाय्याने सेकंदात पोहोचु शकतो इतकच काय, आपल्या सातासमुद्रापालिकडे राहणाऱ्या नातेवाईकांना पाहू शकतो, बोलू शकतो. तसेच आपला व्यवसाय सुद्धा हवा तेथे पोहचवू शकतो. आता अख्ख जगच डिजिटल झालंय. पण एखाद्या गोष्टीचे फायदे तसे तोटेही.

आज पर्यंत आपण दारू, तंबाखू यांचे व्यसन ऐकत होतोच आता नव्याने जडलेलं व्यसन म्हणजे सोशल मिडियाचं व्यसन. अहो तरुणंच काय लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांना ही भुलवून टाकलय या सोशल मिडियानं.
सतत फोटोज् काढणे व ती अपलोड करणे, आपल्या पोस्टला किती लाईक्स, किती कमेंट येतात हे चेक करणे , मेसेंजर वर गप्पा मारणे थोडक्यात काय प्रत्यक्षात आपल्या आजूबाजूला काय घडतय याचं भानंही कधीकधी राहत नाही .

व्यसन म्हणजे नक्की काय ??

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वापर म्हणजे व्यसन आणि अशी भुरळ घालणारी तंत्रज्ञानं असली की ते जडलं नाही तरचं नवल. पण म्हणून त्यात अती वहावत जायचं का ? हा प्रश्न आपणच आपल्याला विचारूया.
आपण प्रगती करतोय हे निश्चितच. आनंद घेतोय तेही निश्चित .पण गरजेपेक्षा जास्त त्यात गढुन जातोय हेही खरंच. वेळेचा अपव्यय करतोयच पण डोळ्यांवर येणारा ताण, रेडियेशनचा मेंदूवर आणि इतर अवयवांवर होणारा दुष्परिणाम लक्षात घेता यावर वेळीच आवर घालणे अत्यावश्यक आहे.

या सवयींना होमिओपॅथी सारख्या दुष्परिणाम विरहित औषधींचा वापर करून आटोक्यात आणता येईल .वेळोवेळी योग्य समुपदेशन घेता येईल. पण एवढी वेळ येऊच नये ही काळजी घेऊया .आपले अनुकरण आपली पुढची पिढी करते हे खरं.
म्हणून आपण आज तरुण पिढीला, जे देशाच्या पुढचं भविष्य असणार आहेत त्यांना या विळख्यातून सोडवूया. आपणच त्यांच्या सवयी बदलूया .त्यांच्यात जे सुप्त कलागुण आहेत ते ओळखून त्यांना वाव देऊ प्रोत्साहन देऊन योग्य दिशा दाखवू.
त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करू. वाढदिवसाला खेळणी भेट न देता पुस्तक किंवा बुद्धीला चालना देतील असे गेम्स भेट देऊ. कला, संगीत ,क्रीडा विषयक रुची आपण स्वतः आपल्या व तरुण पिढीत निर्माण करु आणि जे सक्षम आहेत अशांना अजून प्रोत्साहन देऊ.
योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यांच्या जोडीने आपण या (social media )सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेल्या आपल्या सगळ्यांनाच बाहेर काढू हे निश्चित.
चला तर मग आजपासूनच जोपासूया आपल्या आवडीचे छंद आणि करूया या सोशल मीडियाच्या जाळ्यातून आपली मुक्तता.

FOR YOU