sm logo new

शेतीतील शाश्वत उत्पन्नासाठी मातीचे pH(सामू) व्यवस्थापन..| Soil pH management for sustainable agricultural production

social mirror pH of soil
social mirror pH of soil

Share

Latest

माती म्हणजे काय ?
माती हे गतिशील नैसर्गिक शरीर आहे. ज्याला agricultural language मध्ये dynamic natural body असे म्हणतो.
ज्यामध्ये शेती तर होतेच पण सोबतच इतर सूक्ष्म जिवाणूंचे वास्तव्य असते. आपले जीवन हे माती पासूनच सुरु होते आणि माती (soil) मधेच संपते. यामुळेच मातीची काळजी घेणे ही आता काळाची गरज आहे.
मातीची निगा राखणे म्हणजे नक्की काय करायचे?
प्रामुख्याने पाहिले तर शेतकरी मातीचा वापर पारंपरिक शेती करण्यासाठी करत असतो. ज्यामध्ये बळीराजा तृणधान्य, कडधान्य,डाळी व इतर पिके घेतो. त्या पिकांच्या उत्पादनातुन तो आपले व आपल्या कुटुंबाचे पोट भरत असतो. तसेच भविष्यासाठी पुंजी जमा करून ठेवत असतो. जास्त उत्पन्न मिळाले तर जास्त पैसे मिळतील, अशी एक साधारण भावना त्याची असते. जास्त उपन्न मिळवण्याकरीता तो विविध नवनवीन पद्धतींचा वापर करत असतो. त्यात काही जण सेंद्रिय शेती करतात तर काही जण जास्त उत्पादन घेण्यासाठी हायब्रीड टेक्नॉलॉजीचा वापर करतात. हे सर्व करत असताना शेतकरी रासायनिक खते , किटकनाशके व तणनाशके यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतो, ज्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम हा मातीवर होतो , यामुळेच मातीचा pH(सामू) कमी किंवा जास्त होतो.

मातीचा pH म्हणजे काय आणि तो एवढा महत्त्वाचा का ?
शेतीमधील अतिशय महत्वाचा व परिणाम कारक घटक म्हणजे मातीचा pH मातीच्या pH range चा संबंध हा थेट पिकाच्या वाढ व अंतर्गत प्रक्रियांशी जोडलेला आहे. मातीचा pH हा शेती करताना खूप मह्त्वाचा घटक आहे जो मातीमध्ये असणाऱ्या सूक्ष्म जिवाणू (Bacteria, Fungus ) यांच्यावर ही परिणाम करतो . मातीच्या सुपीकतेवर व मातीच्या पृष्ठभागाच्या रचनेवर मातीच्या pH चा परिणाम हा पहायला मिळतो. अन्नद्रव्य व पोषकद्रव्यांच्या उप्लब्धतेवर सुद्धा मातीचा pH परिणाम दर्शवतो . मातीच्या pH मध्ये होणारे बदल हे थेट पिकांच्या उत्पादनावर परिणाम करतात . pH कमीजास्त झाल्यास इतर सर्वच मूलभूत घटक कमीजास्त होऊ शकतात.

मातीच्या pH वर परिणाम करणारे घटक

 • रासायनिक खते (Chemical Fertilizers) :- रासायनिक खतांच्या अती वापरामुळे मातीच्या pH चे संतुलन बिघडत असते, असंतुलित pH पिकांना मिळणाऱ्या मूलद्रव्यांच्या उपलब्धतेवर परिणाम करतो. त्यामुळे पिकांचे आरोग्य धोक्यात येतेच तसेच उत्पादन क्षमतेतही घट होते . मातीचा Ph कमी झाल्यास जवळपास सर्व मूलभूत व दुय्यम अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होतो व त्याचा थेट परिणाम पिकांच्या आरोग्यावर दिसून येतो.
 • रासायनिक तणनाशके (chemical herbicides)
  शेतकरी त्याच्या शेतातील पिकांबरोबर अन्नद्रव्यासाठी स्पर्धा करणाऱ्या तणाच्या जलद नियंत्रणासाठी रासायनिक तणनाशकांचा भरमसाठ वापर करत असतो. या तणनाशकांचा वापर करत असताना त्यातील हानिकारक रसायने ही मातीमध्ये मिसळत असतात. ज्यामुळे मातीच्या मूळ pH मध्ये बदल होत असतो.
 • रासायनिक कीटकनाशके (chemical pesticides)
  पिकांवर होणारा किड्यांचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी शेतकरी कीटकनाशके फवारत असतो. ज्यामध्ये organophosphate, pyrethroid,carbamate,acaricide, असे कीटकनाशकांचे गट आढळून येतात. यांची फवारणी करत असताना यातील जवळपास ३०% ते ५०% भाग हा मातीवर पडत असतो. हळू-हळू हे सर्व मातीमध्ये एकत्रित होतात ज्यामुळे मातीच्या पृष्टभागाचा pH बदलत असतो.
 • पाणी
  शेतीसाठी वापरले जाणारे पाणी हे जर क्षार युक्त असल्यास जमिनीमधील chlorine चे प्रमाण वाढते. पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ठिबक सिंचनच्या तोंडाजवळ आपल्याला पांढऱ्या रंगाची क्षार युक्त बर (chlorinated powder)तयार झालेली दिसून येते. याचाच अर्थ असा की मातीच्या pH वर chlorine चा प्रभाव होतो आहे.
  त्याच बरोबर कारखान्यातून थेट जल स्त्रोतात सोडले जाणारे दूषित पाणी शेतीसाठी वापरल्यास त्यातील हानिकारक द्रव्य मातीमध्ये मिक्स होऊन मातीच्या सुपिकतेवर व मातीच्या pH बदलास कारणीभूत ठरते.
Agrobest

मातीचे pH range नुसार प्रकार

 1. आम्लयुक्त माती (acidic soil) (कमी pH)
  pH 5.5 पेक्षा कमी असतो यामुळे Aluminium (अ‍ॅल्युमिनियम) व Manganese(मैग्निज) हे जास्त प्रमाणात वनस्पतींना उपलब्ध होतात व ते विषारी बिंदू पर्यंत सुध्दा जाऊ शकतात . तसेच N,P, K ,Ca,Mg हे झाडाला कमी उपलब्ध होतात .
 2. तटस्थ माती (Neutral soil) (5.5 ते 7 मध्ये PH)
  ही माती जवळपास सर्वच पिकांना आदर्श माती आहे .
 3. अल्कधर्मी माती (Alkaline soil)(उच्च Ph)
  जेव्हा मातीच्या pH ची पातळी ही 7 पेक्षा जास्त असते, तेव्हा लोह, जस्त, तांबे, बोरॉन, फॉस्फरस आणि मॅंगनीज सारखे घटक वनस्पतींद्वारे शोषण्यासाठी कमी उपलब्ध होतात.

मातीचा pH कसा नियंत्रित करावा-
~ ‘जास्त खते टाकल्यास जास्त उत्पादन मिळेल’ असे समजून शेतकरी जास्त रासायनिक खतांचा वापर करतो, परंतु तसे न होता त्याचा परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होतो,pH मध्ये बदल घडवणारा सर्वात मोठा घटक हे रासायनिक खते आहेत, आपण जर रासायनिक खतांचा वापर मर्यादित केला तर आपण जमिनीच्या आरोग्या सोबतच pH मध्ये होणारे बदलही नक्कीच कमी करू शकतो. शेतकऱ्यांनी जर माती परीक्षण करून, आलेल्या अहवाला नुसार जेवढे व जे पाहिजे तेच खते व पाहिजे तेवढ्याच प्रमाणात दिले तर आपण मातीचा pH व जमिनीचे आरोग्या सोबतच आपल्या पिकाच्या उत्पादनात कमी खर्चात जास्त वाढ करू शकतो.
~ रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर करणे , जेणे करून माती मधील सेंद्रिय कर्रब सुद्धा वाढतो व मातीचा pH स्थिर राहण्यास मदत होते .
रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा शेतकऱ्यांनी मर्यादित प्रमाणात केला पाहिजे, खराब पाणी वापरणे टाळले पाहिजे. वेळोवेळी आपल्या मातीचे आरोग्य तपासले पाहिजे, माती परीक्षण करून आपल्या मातीचा pH कमी जास्त झाला नाहीना याकडे ही लक्ष्य दिले पाहिजे .

मातीचा pH व भविष्य
जर आपण शेतकऱ्यांनी व औद्योगिक रासायनिक कारखानदारांनी मातीच्या PH बद्दल गांभीर्याने विचार केला नाही तर एक दिवस असा येईल कि मातीची सुपीकता पूर्णपणे संपलेली असेल, जमीन नापिक झालेली असेल व सगळीकडे ओसाड बंजर जमीन पडलेली दिसेल, शेती करण्यासाठी जमीन राहणार नाही. पिके जर आले नाही तर मग आपण सर्वजण काय खाणार? ह्या विपरीत प्रश्नाची विचारण्याची गरज आपल्याला भविष्यात पडू नये यासाठी आताच काळजी घेतलेली बरी. कारण उपचारापेक्षा खबरदारी घेतलेली कधीही चांगलीच…
धन्यवाद !

FOR YOU