sm logo new

शेअर मार्केटबद्दल काही मूलभूत मुद्दे | Some Basic Points About Share Market

social mirror share market sensex
social mirror share market sensex

Share

Latest

आज बऱ्याच जणांना शेअर मार्केटबद्दल कुतूहुल असते. शेअर मार्केटमधून आपणही पैसा मिळवावा आणि आपणही इतरांप्रमाणे सुखसोयींनी युक्त असे आयुष्य जगावे असे अनेकांना वाटते. मात्र शेअर मार्केट बद्दल माहिती कमी पडते आणि केवळ चुकीच्या मार्गदर्शनातून घेतलेल्या निर्णयामुळे आपल्या गुंतवणूकीवर पाणी सोडावे लागते.
आपण जर आपल्या आजुबाजुला पाहिले तर आपल्या लक्षात येते की, साधारणतः उत्पन्नाचे साधन म्हणुन नोकरी आणि व्यवसायाकडे पाहिले जाते. पण आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात उत्पन्नाचे साधन म्हणून आणखी एक स्त्रोत अगदी सहजरित्या पुढे येत आहे, तो म्हणजे शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक (Trading & Investing). तर आजच्या लेखात मध्ये आपण याबद्दल काही मूलभूत (basic) गोष्टी समजून घेऊया.

Financial Express

शेअर मार्केट बद्दल काही गैरसमज :

१. आपल्या समाजात शेअर मार्केट म्हणजे मोफत (free) पैसे कमावण्याची मशिन आहे, एका रात्रीत लखपती-करोडपती बनवणारा मंच आहे.

२. लोकांना वाटते की, इथे पैसे कमावण्यासाठी फक्त नशीबच लागते ज्यामुळे शेअर मार्केट हा बऱ्याच जणांना जुगार आहे असे वाटते.

३. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एक तज्ञ व्यक्ती असायला हवे असा देखील गैरसमज समाजात पसरलेला आढळतो.

४. शेअर मार्केटमध्ये लाखो कोटी रुपये गुंतवले तरच काय तो नफा होतो हा देखील एक मोठा गैरसमज आहे.

५. अतिप्रमाणात जोखीम घेतली तरच मोठा नफा होईल असे काही नवगुंतवणूकदारांना वाटते. मात्र बहुदा हे त्यांना एका मोडक्या सांकवावरून नदीपलिकडे घेऊन जाण्याईतके त्रासदायक ठरते.

६. अजून भरीत भर म्हणून की काय आपल्याकडील काही चुकीच्या जाहिरातबाजींमुळे आपण काही वरवरच्या महितीआधारे देखील शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकतो असे आपल्याला वाटते पण ते पुर्णपणे चुकीचे आहे.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून पैसा कमावणे ही देखील एक पूर्णवेळ नोकरीप्रमाणे किंवा व्यवसायाप्रमाणे आपल्या आकलनशक्तीच्या जोरावर पुढे जाण्याची नामी संधी बनली आहे. आज भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी पाहिली तर आपल्याला मुकेश अंबानी, गौतम अदाणी, राधाकिशन दमानी, राकेश झुनझुनवाला, फाल्गुनी नायर अशा बऱ्याच उद्योजकांची नावे सर्वात वर दिसतात. मजेदार गोष्ट म्हणजे या सर्व व्यक्तींमध्ये एक समानता आढळून येते. यांची खुप मोठी मालमत्ता ही शेअर बाजारामुळेच आहे. ही लोकं काही एका रात्रीत, नशीबाच्या जोरावर अथवा जुगार करुन करोडपती झालेली नाहीत. तर त्यांनी रात्रंदिवस कष्ट करुन, स्वत:च्या क्षेत्राचा अभ्यास करुन आणि मुख्यतः त्यात प्रावीण्य मिळवून मोठी झाली आहेत. आपणही प्रावीण्य मिळविण्यासाठी आणखी एक पाऊल टाकू. चला तर, आजच्या लेखाबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि आणखी मूलभूत माहिती जाणून घेण्यासाठी पुढचा लेख नक्की वाचा.

FOR YOU