sm logo new

आत्महत्या प्रतिबंध – एक सामाजिक जबाबदारी

social mirror suicide prevention
social mirror suicide prevention

Share

Latest

गेल्या आठवड्यात आपण पुण्यातील पिंपरी येथील आत्महत्येची बातमी पेपरला वाचली आणि मधल्या काळात आपल्याला विसर पडलेल्या संवेदनशील विषयाची पुन्हा आठवण झाली. सद्य स्थितीला समाजात अशी अनेक माणसे आहेत, ज्यांच्यासाठी आयुष्य म्हणजे अंधारी वाट, हतबलता आणि नैराश्य आहे. आदिम जगण्याची ओढ संपल्याने आजवर अनेकांनी आपले आयुष्य संपवले, काहींनी तसा प्रयत्न केला किंवा काही जण तसा विचार करत आहेत त्या सगळ्यांसाठी आजचा हा लेख प्रपंच.
विषय जेवढा चिंतनशील आहे तेवढाच गंभीर कारण आता ही एक सामाजिक समस्या होवू पाहत आहे. आत्महत्या ह्या विषयावर खूप गैरसमज, चुकीच्या धारणा किंवा त्या कुटुंबाकडे बघण्याचा चुकीचा दृष्टिकोन ह्या समस्येला हातभार लावतो. हा विषय गंभीर आहे कारण जगभरात दर 40 व्या सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. भारतात हा आकडा साधारण 200 सेकंदाला एक ह्या प्रमाणे एका दिवसात 381 लोकं आत्महत्या करत आहेत. ही आकडेवारी म्हणजे भविष्यात मानवजातीवर येणाऱ्या महाभयंकर संकटाची,धोक्याची घंटा आहे. सामाजिक व मानसिक आरोग्य ढासळल्याचे हे चिन्ह आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना ह्या संकटापासून वाचवायचे असेल तर आपल्या सर्वांना जबाबदारी उचलावी लागेल. त्यासाठी काही गोष्टींची सखोल माहिती करून घ्यावी लागेल. सगळ्यात पहिले आपल्याला आत्महत्येविषयी सणारे गैरसमज दूर करावे लागतील.

Payson roundup
 • आत्महत्येबद्दल आपण कुणाला विचारल्यास, आपण त्याला आठवण करून देतो, पर्याय देतो. त्यामुळे ह्या विषयी आपण बोलूच नये
  असे मुळेच नसून त्याला . बोलव्यासाठी संधी देत आहोत व्यक्त व्हायला भाग पाडतो. त्यामुळे एखाद्या निराश माणसाकडे बघून आपल्याला अशी काही शंका असेल तर आपण योग्य शब्दांचा वापर करत त्याला बोलते केले पाहिजे.
 • उतावळे पणाने घेतलेला निर्णय म्हणजे आत्महत्या-
  फार अल्प प्रमाणात आहे बहुतांशी लोक अशा कृतीचे संकेत देत असतात. त्यांचे वागणे, बोलणे त्यांची देहबोली ह्यातून त्यांच्या मनात येत असणारे असे टोकाचे निर्णय ते आपल्याला सूचित करत असतात.
 • आत्महत्येबद्दल बोलणारे लोक कधीच आत्महत्या करत नाहीत.
  ज्यांनी खरोखर आत्महत्या केली आहे. त्यांची past history पाहिली, तर आपल्याला कळते की ३०-४०% लोकांनी ३/४ वेळा आधी प्रयत्न केलेला असतो किंवा असे विचार बोलुन दाखविणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करू नये.
 • आत्महत्येविषयी धमकी देणारे हे लक्ष वेधून घेण्यासाठी हे करत असतात.
  साफ चुकिचे आहे. याविषयी बोलणे म्हणजे त्या व्यक्तिने मदतीसाठी केलेला आक्रोश आहे मदतीसाठी दिलेली हाक आहे. त्यांना आव्हान करू नये / चॅलेंज करू नये. कदाचित तुम्ही केलेले आव्हान त्यांना कृती करण्यास उपयुक्त ठरेल.
 • मानसिकरीत्या आजारी असलेली प्रत्येक व्यक्ती आत्महत्येचा विचार करते.
  १०-१५% मानसिक आजारी रुग्ण आत्महत्या करतात. त्यामुळे व आत्महत्येविषयी बोलणारे सर्वजण मानसिक रुग्ण नसतात, आणि मानसिक रुग्ण असलेली प्रत्येक व्यक्ती आत्महत्या करत नाही.
 • आत्महत्येचा विचार करणाऱ्या लोकांना कसाही मार्ग सापडतोच, त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही.
  खोल विचार, ‘द्विधा मनस्थितीत, स्वतःच्याच भावनिक गुंतागुंतीत अडकलेले असताना सामाजिक कळकाची त्यांना भिती असते. त्यामुळे या टप्प्यावर कुणी भेटले तर त्यांच्यावर ठपका न ठेवता, कलंक न लावता त्यांना मदत करूया तसे केले तर आपण त्यांना या विचारांपासून निश्चित परावृत्त करू शकतो.
 • एकदा केलेल्या प्रयत्नातून वाचलेले लोक पुन्हा असा प्रयत्न करत नाही.
  उलट अशी माणसे ( high risk group ) मध्ये येतात. ३०-४०% लोकांनी भूतकाळात कधी ना कधी असा प्रयत्न केलेला असतो, पण त्यात ते अपयशी झालेले असतात.
 • कुठल्याही पूर्वकल्पनेशिवाय / पूर्व संकेताशिवाय आत्महत्या घडतात.
  ८०-९०% लोक आपल्या वागण्या बोलण्यातून,आपल्या देहबोलीतून संकेत देत असतात. आपण डोळसपणे त्यांच्याकडे बघायला शिकू या. अशा धोक्याच्या वाजणाऱ्या घंटा आपण ओळखायला शिकू.
 • आत्महत्येपासून रोखण्यासाठी केवळ मानसोपचार तज्ञ हस्तक्षेप करू शकतात.
  प्रत्येक नागरिकाची ह्या प्रती एक स्वतःची जबाबदारी आहे. मानसोपचार तज्ञ आहेतच पण त्याआधी तुम्ही आम्ही आहोत. त्यांच्या पर्यंत जाण्याआधी आपण येतो. त्यामुळे समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून आपली देखील हया कामात महत्वाची जबाबदारी आहे.

पुढील लेखात आपण सर्व सामान्य नागरिक म्हणून काय करू शकतो, जबाबदारी कशी पार पाडू शकतो. ह्या विषयी जाणून घेवू. त्यामुळे उद्याचा लेख वाचायला विसरू नका.

FOR YOU