sm logo new

Sustainable Agriculture – काळाची गरज

social mirror sustainable agriculture
social mirror sustainable agriculture

Share

Latest

असे म्हटले जात आहे की 2050 पर्यंत पृथ्वीवर असणारी सर्व शेत जमीन संपुष्टात येणार आहे. आत्ताच्या वाढत्या लोकसंख्येला खाऊ घालणे आता काही प्रमाणात कठीण होताना दिसत आहे. बदलते हवामान आणि शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक घटकांचा वाढता वापर यामुळे पीक उत्पादनाला उतरती कळा लागण्यास सुरुवात झाली आहे. असे होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र मिळालेला अन्नाची नासाडी होतानाही दिसत आहे. आकडेवारीनुसार, भारतातील सरासरी व्यक्ती दररोज 137 ग्रॅम अन्न वाया घालवते. दर आठवड्याला 0.96 किलो किंवा प्रति वर्ष 50 किलो अन्न वाया जात आहे. हे असेच चालू राहिले तर आपल्या पुढची पिढीला अन्न खाण्याऐवजी फक्त अन्नाच्या गोळ्याच खाव्या लागतील. त्यामुळे पुढच्या पिढीचा विचार करता अन्नसुरक्षा आणि वाढीव पीक उत्पादन काळाची गरज आहे. त्यासाठी आपण शाश्वत शेती करत, शाश्वत पीक उत्पादन घेणे गरजेचे आहे.

शाश्वत शेती (Sustainable Agriculture) हा शेतीचा असा प्रकार आहे जो भविष्यातील पिढ्यांच्या संसाधन आधाराला हानी न पोहोचवता शाश्वत मार्गाने वर्तमान समाजाच्या गरजा पूर्ण करतो. यालाच जैविक शेती आणि पर्यावरणीय शेती असही म्हणतात. यामध्ये शेतीवरील संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि कृषी परिसंस्थाचे (agro-ecosystem) सांगोपन करण्यास जास्त भर दिला जातो.

Wikipedia

भारतात शाश्वत शेती (sustainable agriculture) ची सध्याची स्थिती…

National Mission for Sustainable Agriculture (NMSA) हे भारत सरकारने 2014-15 मध्ये भारतीय शेतीला अधिक शाश्वत आणि उत्पादक बनवण्यासाठी सुरू केलेली एक योजना आहे. मात्र या योजनेला 5-6 वर्षे उलटूनही शेतकऱ्यांमध्ये ही संकल्पना अमलात आणण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. 2021 मधील आकड्यानंनुसार अमेरिकेमध्ये सुमारे 70% शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीचा पर्याय स्वीकारला आहे. Council on Energy, Environment and Water च्या अभ्यासानुसार 4% पेक्षा कमी भारतीय शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धती आणि प्रणालींचा अवलंब केला आहे.

भारतासारख्या वाढत्या लोकसंख्येच्या (1.39 अब्ज) देशात, शेतकरी अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि नफा मिळविण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, उच्च उत्पादन देणार्‍या बियाणांचा अतिवापर करतात. ज्यामुळे मातीची झीज होणे, मातीतील मायक्रोफ्लोरा आणि जीवजंतूंची संख्या कमी होणे, अन्नाची पौष्टिक गुणवत्ता कमी होणे, इत्यादी समस्या वाढत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी शाश्वत शेतीकडे योग्य पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते. शाश्वत शेतीचे विविध घटक आहेत यात एकात्मिक पोषण व्यवस्थापन, एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन, एकात्मिक तण व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनचा समावेश होतो. भारतात शाश्वत शेतीचे अवलंब वाढवण्यासाठी शेतक-यांनी त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेणे आवश्यक आहे.

शाश्वत शेतीचे फायदे-

1.अन्नाची पौष्टिक गुणवत्ता सुधारते.
अनेक प्रकारच्या रासायनिक खते आणि किटकनाशकांच्या अमर्यादीत वापर केल्यामुळे पिका मधून अनेक घटकांचा ऱ्यास होताना आपल्या पाहायला मिळतो. शाश्वत शेतीला प्रोत्साहन देत यांच्या वापरावर मर्यादा घालून अन्नाची पौष्टिक गुणवत्ता सुधारण्यास नक्कीच मदत होईल.

२. उत्पन्नाचा एक विश्वासार्ह स्त्रोत प्रदान करते.
पारंपारिक शेतीपेक्षा शाश्वत शेती सुमारे 50-60% अधिक फायदेशीर असल्याचे समोर आले आहे. शेतीमध्ये विविध प्रयोग जसे की, Cover Crops, Crop Rotation, आंतरपीक त्याचबरोबर शेतीमध्ये जोड धंदा म्हणून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन इत्यादि संलग्न उद्योगांचा वापर केल्याने नैसर्गिक आपत्ती किंवा हवामानाच्या तीव्रतेमुळे पीक अपयशी ठरले तरी, शेतकरी या स्त्रोतांवर अवलंबून राहून उत्पन्न निश्चित करू शकतो.

३. उत्पादकता टिकवून ठेवते आणि मातीचे आरोग्य सुधारते.
Nitrogen cycle, Sulfur cycle, Carbon cycle, Phosphorus cycle सारख्या नैसर्गिक पोषक चक्रांची कार्यक्षमता वाढवून हे साध्य केले जाते. नैसर्गिकरित्या जमिनीला कार्बन, नायट्रोजन, सल्फर इत्यादी आवश्यक पोषक द्रव्ये प्रदान करण्यास मदत करते. शाश्वत शेतीमुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या विघटनाची क्रिया सुधारून सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण समृद्ध होते.

4.लागवडीचा खर्च कमी होतो
शेती मधून मिळणाऱ्या तांदळाचा पेंढा, गहू पेंढा, तांदळाची भुस अशा अवशेषांचा वापर करून लागवडीचा खर्च कमी होतो, जेणेकरून शेतकर्‍यांच्या लागवडीवर जास्त रक्कम खर्च करण्याची गरज भासत नाही. तसेच शेतकरी ही रक्कम इतर संबंधित उद्योगांची उत्पादकता वाढविण्यासाठी करू शकतो. त्याचबरोबर एकात्मिक तण, कीटक आणि रोग व्यवस्थापनाचा वापर केल्याने महागड्या रासायनिक औषधी आणि कीटकनाशकांवरील खर्च किंमत कमी करण्यास ही मदत होते.

तोटे/मर्यादा –

1.शेतकऱ्यांमध्ये जागृतेचा अभाव.
शाश्वत शेती म्हणजे नक्की काय? ही माहिती मूळात शेतकर्‍यांपर्यंत पोहचलेली नाही.शेतकऱ्याच्या अनेक समस्यांचा उपाय हा शाश्वत शेती आहे हे प्रसारित करण्यासाठी स्त्रोतांची कमतरता आहे. जरी त्यांना माहिती असली तरी रसायनांवरील विश्वासार्हतेमुळे शाश्वत शेतीचे फायदे जास्त दुर्लक्षित केले जातात.

२. रासायनिक खतांच्या संयमित वापरामुळे सुरुवातीच्या वर्षांत उत्पन्न कमी मिळते. मातीला रासायनिक खतांची सवय झाली असल्याने अचानक सेंद्रिय व जैवखत वापरल्याने उत्पादनात घट पाहायला मिळते.

३. शेतकऱ्याकडे एकरी जमीन कमी असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करता येत नाही. पारंपरिक शेतीमधून जास्त उत्पन्न मिळत असल्याने पारंपारिक ते शाश्वत शेतीकडे जाण्याचे प्रमाण फार कमी आहे.

त्यामुळे या सगळ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याला टप्प्याटप्प्याने शाश्वत शेतीकडे वळले पाहिजे. त्यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.

FOR YOU