sm logo new

The Boy Who Harnessed the Wind | परिस्थिीपुढे न झुकता लढणाऱ्या एका मुलाची कथा

social_mirror_the_boy_who_harnessed_the_wind
social_mirror_the_boy_who_harnessed_the_wind

Share

Latest

जिद्द, चिकाटी, आणि गरज माणसाला अशी ताकद देते जी जगातल्या कोणत्याही अन्नात नाही ..हे पटवणारी आजची आपली कथा. आफ्रिकेतल्या आदिवासी भागातला एक फक्त १३ वर्षाचा मुलगा आपल्या चिकाटी आणि बुद्धीच्या जोरावर असा चमत्कार करतो की त्याच्या लोकांच आयुष्याचं बदलून टाकतो.


कासुंगा, मलावी या आफ्रिकेत असलेल्या दुर्गम भागात जन्माला आलेला “विल्यम कमकावांबा” हा १३ वर्षाचा मुलगा एका गरीब शेतकरी कुटुंबातील आहे. “विंबे” या गावात तो त्याचा वेळ शाळा आणि रेडिओ दुरुस्ती मध्ये घालवतो. त्याच्या घराजवळ एक टाकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा साठा होता जिथे तो नेहमी काही ना काही शोधायचा जे त्याच्या कामाचं असेल. जरी त्याला काही दिवस शाळेतून काढलेलं होतं तरी त्याच्या सायन्स टीचर ला ब्लॅकमेल करून तो शाळेत जात असायचा. त्याला लायब्ररी मध्ये जाण्याची सुद्धा परवानगी त्याच्या टीचर ने दिली होती. Electrical engineering आणि energy production मध्ये त्याचा रस होता आणि त्याचाच अभ्यास तो लायब्ररी मध्ये करत असायचा.


सन २००० चा काळ आला. प्रचंड दुष्काळ आल्यानं विल्यम च्या गावाला अन्न साठा कमी पडायला लागला आणि त्यामुळे गावातील लोक आणि शासन यांच्यात वाद चालू झाले. त्यातच भर म्हणून विल्यमच्याच घरी धान्याची चोरी होते आणि चोर सर्व धान्य गायब करतात. त्याची बहिण सुद्धा त्याच्या सायन्स टीचर सोबत पळून जाते आणि लग्न करते. पळून जाताना तिने एक पत्र आपल्या आईला लिहिलं असतं ज्यात ती म्हणते की आता तुम्हाला एक माणूस कमी खाऊ घालावा लागेल. एवढं असून सुद्धा विल्यमने त्याचा अभ्यास सोडलेला नसतो.
त्याच्यात गावाला दुष्काळ आणि इतर त्रासापासून वाचविण्यासाठी विलियम एक पवनचक्की (विंडमिल)बनवायची ठरवतो. त्याचा एक छोटा नमुना तो त्याच्या मित्रांना देतो. मित्र त्याच्यावर खुश होतात आणि आता त्याला मोठी पवन चक्की बनवायची असते. यासाठी त्याला त्याचे वडील Tyrell याच्या सायकल ची गरज असते. हे खूप अवघड काम होते कारण त्याचे वडील अगोदरच खूप त्रासातून जात होते. Tyrell ची सायकल म्हटलं की गावातली एकमेव सायकल होती आणि त्यासाठी त्याचे वडील ती द्यायला तयारही होतं नाहीत. तो त्याच्या वडिलांशी बोलतो आणि त्यांना सांगतो की मी हे करू शकतो.याने आपल्याला आणि आपल्या गावाला कायमचा या त्रासातून वाचवू शकतो. Tayrell मात्र तयार होत नाही आणि ते चिडतात. शिक्षा म्हणून ते विलियम ला त्यांच्या शेतात कामाला लावतात.
विलियम ची आई मध्ये येते आणि Tayell ला म्हणते की, आपल्याला याच्या शिवाय पर्याय नाहीये. त्याच्यात खूप वेळ वाद होतो आणि शेवटी Tayrell तयार होतो आणि ती सायकल ते विलियायमला देतात. विलियम ने त्याच्या मित्रांच्या मदतीने पुढें कशी पवनचक्की बनवली आहे हे मात्र तुम्हाला पहावं लागेल.


मित्रानो, १३ वर्षाचा मुलगा, तोही आफ्रिकेत अशा ठिकाणी राहतो जिथे आजही काही चांगली परिस्थिती नाहीये. अशा ठिकाणी अनेक संकटांना समोर जाऊन “विलियम कामकवांबा” एक पवनचक्की बनवतो काय आणि गावाचं रूप बदलतो काय.
विलियमचा हा प्रवास पहाल तर कळेल आपल्याला एवढं सगळं असताना आपण किती चिंता करतो. स्वप्न पहात असाल तर पूर्ण करायची ताकद ठेवा आणि लढा हे शिकवणारा हा सिनेमा “ The boy who harnessed the wind” नक्कीच पहा.

ocial_mirror_Kamkwamba_William
FOR YOU